बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

सध्याचा काळात कुजबुज करून किंवा संदर्भ न देता असे फोटो सोशल मेडीयावर टाकून नेहरूंच्यावर शेरेबाजी केली जाते हि हीन प्रवृत्तीच आहे.

चाचा नेहरू !
#childrens_day_14th_November
#World_Photography_Day_19_August
नेहरू आणि स्त्रिया -

होमई व्यारावाला - भारताच्या पहिल्या फोटोजर्नलीस्ट होमई व्यारावाला यांनी काढलेले हे छायाचित्र आहे.ब्रिटीश हायकमिशनर सिम्पसन यांच्या पत्नीची सिगरेट शिलगावतानाचा हा फोटो त्यांनी नेहरूंच्या सांगण्यावरून काढला (लपूनछपून Paparazzi style ने नव्हे). युरोपियन देशात एखाद्या महिलेची सिगरेट लिट करणे म्हणजे Gentleman's etiquette समजले जात. नेहरूंची अशीच छायाचित्रे जेक्लिन केनेडी सोबतही आहेतच.होमई व्यारावाला यांनी नेहरू,इंदिराजी,गांधी यांसह अनेक नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींची छायाचित्रे काढली, त्यांचा artistic sense हि जबरदस्तच होता.

नेहरू आणि एडविना -

हेन्री कार्टीयर-ब्रेसाँ - लॉर्ड माउंटबॅटन,एडविना आणि नेहरूंचा हा फोटो टिपलाय जगप्रसिद्ध फोटोग्राफर हेन्री कार्टीयर-ब्रेसाँ यांनी,कार्टीयर यांनी काढलेले जवाहरलाल नेहरूंचे गुलाबाचं फूल घेतलेले देखणे फोटो जगप्रसिद्ध आहेत. पण एडविना माउंटबॅटनच्या सोबत,आपलं पदच नव्हे तर देहभानही पुरतं विसरून हास्यविनोद करणारे नेहरू ब्रेसाँने जे काही पकडले आहेत त्याला तोड नाही.तेव्हाचा सर्वसामान्य माणसाला नेहरूंच्या अशा फोटो बद्दल आक्षेप घेण्याचे कारणच नव्हते, कारण त्यांना नेहरूंची जिवनशैली बद्दल पुर्ण कल्पना होती. आणि  एडवीना यांचा जन्म 28 नोव्हेंबर 1901चा आहे तर नेहरूंचा 14 नोव्हेंबर 1889 आहे. याचाच अर्थ असा की जेव्हा जून 1946 मधे नेहरू आणि एडविनाची प्रथम भेंट झाली तेव्हा नेहरू 57 वर्ष 8 महिऩे एवढ्या वयाचे तर एडविना 45 वर्ष 7 महिने वयाच्या होत्या.

हेन्री कार्टर ब्रेसन यांना आधुनिक छायाचित्रणाचे जनक म्हटलं जातं. त्यांनी डिसायसीव्ह मुव्हमेंट नावाची टर्म जन्माला घातली. कोणतीही फ्रेम दिसल्यावर लगेच कॅमेरॅचं शटर दाबण्यापेक्षा अशा एखाद्या प्रसंगाची वाट पहायची ज्यातुन एक कथा तयार होईल. नेहरूंचं छायाचित्र त्यांनी अशाच एका डिसायसीव्ह मुव्हमेंटला काढलय. त्यावरून नेहरूंच्या व्यक्तीमत्वाबद्दल शंका उपस्थित करून त्यांची बदनामी केली जाते

पण सध्याचा काळात कुजबुज करून किंवा संदर्भ न देता असे फोटो सोशल मेडीयावर टाकून नेहरूंच्यावर शेरेबाजी केली जाते हि हीन प्रवृत्तीच आहे.

नेहरू आणि सिगरेट -
त्यावेळेसचे सर्वच जागतिक मोठे नेते , चर्चिल , रूझवेल्ट ,स्टालिन ,क्लेमेंट एटली, नासेर , मार्शल टिटो. मावो, कास्त्रो , चे घेवारा, हो ची मिन्ह अगदी हिटलर ,मुसोलिनी हे सर्व सिगारेट ओढायचे आणि तीसुद्धा सर्वासमक्ष ,बिनदिक्कत . अर्थात भारतात त्यावेळी एकटे नेहरुच सिगारेट ओढत होते असे नह्वे ,देशात बिडी ,चिरुट, गांजा, हुक्का ,गुडगुडी या स्वरुपात धुम्रपान होतेच, आपल्या देशात इतर ही नेत्यांना बिडी ,तंबाखू ,तपकीर ,हुक्का यांचे व्यसन होतेच.

नेहरू आणि शिवाजी महाराज -
Glimpses of World History पुस्तक हे त्यांनी जेल मध्ये असताना लिहिले होते त्याकाळी तुरुंगात फक्त  लेखकांची पुस्तके उपलब्ध होत असत त्यातील काही चुकीच्या संदर्भांमुळे घोळ झाला.
Glimpses of World History  पुस्तकात हा उल्लेख होता जो नंतरच्या सगळ्या एडिशन्स मधून वगळण्यात आला, प्रतापगड वर शिवरायांच्या पुतळ्याचे १९५६ साली अनावरण झाले त्याप्रसंगी नेहरूंनी जाहीर माफी मागितली होती.
त्यांनतर Discovery of India मध्ये शिवरायांचा उल्लेख सर्वोच्च देशाभिमानी असा करण्यात आला होता.

व्यक्तीप्रमाणे Ideologies बदलतात, त्या त्या Ideologies ला follow करणारे लोक असतात, त्यामुळे आपल्या Ideology मध्ये न बसणाऱ्या व्यक्ती वर टीका केली जाते, आणि ते करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. (मी सुद्धा काही गोष्टीबाबत नेहरूंचा टीकाकार आहे ) पण हि टीका करताना आपण कोणत्या थराला जातोय याचेही भान असावे .

नेहरूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा जबरदस्त होती. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाची थोरवी गाणारे लोक रशिया, अमेरिकेत आजही आहेत. ज्या काळात ‘मीडिया’ व ‘सोशल मीडिया’ हा प्रकार अस्तित्वात नव्हता त्या काळातली ही लोकप्रियता आहे.

 देशाच्या पहिल्या पंतप्रधानांची प्रतिमा आपण कुठे नेवून ठेवतोय याचाही विचार करण्याची गरज आज या दिवशी नक्कीच आहे.

“A photograph is neither taken or seized by force. It offers itself up. It is the photo that takes you. One must not take photos.” - Henri Cartier-Bresson

- मालोजीराव जगदाळे
(जुन्या पोस्ट मधील काही कमेंट्स पोस्ट मध्ये वापरल्या आहेत राज कुलकर्णी आणि इंद्रजित खांबे यांच्या )






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा