शुक्रवार, ३ मार्च, २०१७

चाफेकर







*दामोदर हरी चाफेकर ** याचे सत्य उलगडणारा लेख

' जातीयवादी '
' धर्मान्धळा '
' समाज सुधारकांवर जीवघेणे हल्ले चढवणारा '
' धर्मशास्त्राविरुद्ध विवाह झाले म्हणून सम्पूर्ण वरातीवर दगड हल्ला करणारा '
' मराठा सरदारांना हिजडे संबोधणारा '
' रँड खटला मुसलमानांवर फिरावा म्हणून खोटे पत्र लिहिण्याचा प्रयत्न करणारा '

*दामोदर हरी चाफेकर ** याचे सत्य उलगडणारा लेख
---------------------
शेंडगोटे सनातनी स्वजातीय माणूस असला कि त्याला अशा काही उपाध्या देतात कि त्याचा महापुरुषच बनवून ठेवतात..
जसा आदिवासी समाजातील राघोजी भांगरे, मांग समाजातील लहुजी साळवे यांचा इतिहास पुढे न आणता बऱ्याच नंतर बंड करणाऱ्या वासुदेव फडकेना आद्यक्रांतिकारक बनविला...
ज्याप्रमाणे भाऊ रंगारी ज्यांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव केला पण त्याचे श्रेय टिळकांना दिले...
भगत सिंग ,आझाद , क्रांतिसिंह नाना पाटील हे खरे स्वातंत्र्य वीर यांना तसे न संबोधता इंग्रजांची माफी मागितलेल्या स्वजातीय माणसाचा स्वातंत्र्य वीर केला..
तसाच यांनी कट्टर ' जातीयवादी ' ' धर्मान्धळा ' दामोदर हरी चाफेकर ला हुतात्मा बनवून ठेवला आहे ..

चला धूर्त, लबाड, कटकारस्थानी सनातनी *दामोदर हरी चाफेकरचे ** सत्य जाणून घेऊ ..
-------------------

*कट्टर धर्मान्धळा आणि प्रतिगामी*

चाफेकरांच्या गावातील काशिनाथ पंत गाडगीळ नावाच्या एका सुधारकाने त्याच्या मुलीचा विवाह धर्मशास्त्राविरुद्ध चिंतामण नारायण यांच्याशी करण्याचे ठरवले होते पण विवाह धर्मशास्त्राविरुद्ध ( मुलीचे सोळा वर्ष पूर्ण झाल्यावर विवाह होत असल्यामुळे ) होत असल्याचे चाफेकरांना समजले तेव्हा त्यांनी त्याला धडा शिकवायचा म्हणुण वरातीवर दगडफेक करून हल्ला चढवला ज्यात अनेक महिलांना दगड लागून इजा झाली होती .
चाफेकराणी हा प्रसन्ग स्वतःच्या आत्मचरित्रात वर्णन केला आहे. पुढे ते म्हणतात कि माझा बाप जरी धर्मशास्त्राविरुद्ध वागला तरी तो आमचा शत्रू ठरेल इथेच त्यांचा धर्मान्धळेपणा दिसून येतो..
----------------

*महाजातीयवादी*

वरील दोनही गृहस्थ गाडगीळ आणि चिंतामण हे चाफेकरांना नात्यात होते.. त्यामुळे सुपारी कार्यक्रमाला त्यांनी चाफेकरांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार ते कशाप्रकारे धर्माविरुद्ध वागतात हे पाहण्यास चाफेकर सुपारीस गेले पण भोजनास थांबले नाहीत याचे कारण त्यांच्याच भाषेत ते काय देतात ते पहा

_<*<* " पानसुपारीस जाण्याचे कारण आपण तेथे गेलो तर त्याचे सर्व धर्मबाह्य वर्तन प्रत्यक्षात पाहण्यात येऊन आपली खात्री होईल(तो धर्मनिष्ठ नसल्याची) असा विचार करून गेलो होतो.. भोजनास गेलो नाही कारण यांची योग्यता मी धेडाप्रमाणे निंद्य करतो ". >*>*_

स्वजातीय धर्मशास्त्राविरुद्ध गेले म्हणून द्वेषातून ते त्यांची धेडांशी तुलना करतात.. मग जे खरोखर धेड दलित असतील त्यांच्याविषयी किती तिटकारा बाळगत असेल हा हुतात्मा ???.......
चाफेकरांनी आत्मवृत्तात गोफण शिकवलेल्या मुलांची नावे दिली आहेत ती सर्वच्या सर्व त्यांची स्वजातीय आहेत.
----------------

*'समाज सुधारकांवर जीवघेणे हल्ले चढवणारा.*

धर्माच्या अनिष्ट चालीरीती विरूद्ध कोरडे ओढणाऱ्या आगरकरांना हा माणूस महापापी म्हणतो...आणि मी त्याच्यावर डोळा ठेवून होतो पण तो सुटला असे आत्मचरित्रात नमूद करतो.
नंतर त्यांच्या मनात आले कि या समाजसुधारकी धर्मबुडव्यांना देहदंड झाला पाहिजे .. पण ते स्वजातीय ब्राह्मण असल्यामुळे चाफेकर काय लिहितात ते पहा

_<*<* " आमचा कोप अनावर होऊन आम्ही सुधारकचे अंक जाळून टाकू लागलो . पण तो काही मन शांत होण्याचा दंड नव्हे. म्हणून आम्ही देहदंड करावयाचा विचार करू लागलो. स्वजतीयपणा मनात आला कि आम्हाला किव येत असे. म्हणून आम्ही असा बेत केला कि यांना देहांत दण्ड न करता साधारण दंड करायचा आणि मग ताकीदपत्र पाठवून त्यांना इशारा करायचा " >*>*_
म्हणजे परजातीय ब्राह्मणेतर असता तर लगेच देहदंड दिला असता.
त्यानंतर नाट्यगृहातून बाहेर पडल्यावर नूतन विद्यालयाचे प्राध्यापक आणि सुधारक श्री कुलकर्णी यांच्यावर चाफेकरांनी डोक्यात प्रहार केला .. त्याचवेळेस सुधारक चे सम्पादक पटवर्धन हेही दुसऱ्या मार्गाने नाटक सुटल्यावर परतत असतानाहि ज्युनिअर चाफेकरांनी लोखंडी शिळेने कणपट्टी आणि डोकयाच्या मध्ये जोरदार प्रहार केला.. याला हा माणूस धर्माची कामगिरी म्हणतो.
असाच एक जीवघेणा हल्ला प्राध्यापक वेलिंगकर यांनी धर्मान्तर केल्यामुळे त्यांच्यावर दामोदर चाफेकरांनी केला होता .. हा हल्ला सुद्धा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात वर्णन केला आहे
....एकूणच धार्मिक कट्टरतेने यांना ग्रासले होते हे सहज स्पष्ट होते.

सुधारक समूहाने " विधवा विवाह प्रतिबंधन निवारक संस्था " विधवा पुनर्विवाहासाठी विधवांसाठी स्थापन केली होती .. पण यांना दहशत बसवण्यासाठी चाफेकरांनी " आर्यधर्म प्रतिबंध निवारक मंडळी " आणि "स्वधर्म जीव घेणार आणि देणार मंडळ " काढली होती.

सुधारकांना लिहिलेल्या पत्रात ते त्यांना धमकी देताना म्हणतात

_<*<* " आमच्या धर्मात कशाही चालीरीती असोत.. त्याच्यात फेरफार करण्याची तुम्हाला गरज नाही. अन्यथा तुमच्या गळ्यावरून तलवार फिरवणे भाग पडेल ".. >*>*_
----------------

*मराठा सरदारांचा अपमान*

त्यानंतर दुसऱ्या बाजीरावाने आपले राज्य ब्रिटीशांच्या घशात ओतले या रावबाजीवरील आरोपांबाबत चाफेकरांना फार राग आहे यातून त्यांनी आपल्या आत्मवृत्तात पुढील वाक्ये लिहिली आहेत.

_<*<* " ज्यावेळेस बाजीरावाने राज्य गमावले त्यावेळेस मराठे सरदार शिंदे,होळकर,गायकवाड,भोसले हे सर्व हातात बांगड्या घालून लुगडे नेसून मराठमोळ्यात लावून बसले होते काय कि मिश्या भादरून हिजडे झाले होते ? " >*>*>_

इतक्या नीच पातळीवर मराठ्यांना बोलायची गरजच काय ?? कि आपल्या स्वजातीय रावबाजीवर आरोप झाले म्हणून द्वेषभावनेतून त्यांनी या शूर मराठा सरदारांविरुद्ध असे उदगार काढले ???...
गोमांस खाणारा दाजी खरे हा मित्र असल्यामुळे आणि टिळक विधवा विवाह समाजाचे सदस्य असल्यामुळे चाफेकर टिळकांना ( ??!!) स्वधर्मनिष्ठ मानत नाहीत.. !!
नंतर सुधारक मंडळींचे लावलेले फलक तोडणे, ते चोरणे कुठेतरी चुकीच्या जागी मुद्दामहून लावणे निव्वळ या आणि इतर कुरापती चाफेकरांच्या आत्मचिरित्रात दिसतात.
--------------

*रॅन्डच्या खुनाचा आरोप मुसलमानांवर फिरावा म्हणून खोटे पत्र लिहिण्याचा प्रयत्न*

रँड चा खून झाल्यावर इंग्रजांचा रोख पुण्याच्या धर्मांद सनातन्यांवर फिरला होता.. आपल्या स्वजातीयांना त्रास होऊ नये आणि मुसलमानांवर आळ यावा म्हणून मुसलमानी मध्ये एक खोटे पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला पण ऐन मोक्याच्या वेळेस ती भाषा जाणणारा पटकन सापडला नाही .. हे स्वतः चाफेकरांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे...
--------------

*रँडच्या खूनामागील सत्य*

रँड ला प्लेग ची साथ नीट थोपवता आली नाही आणि त्याने जनतेवर जुलूम केला असे आजपर्यंत एकच कारण आपल्याला सांगितले जाते आणि पाठयपुस्तकात हि तेवढेच सांगून चाफेलकरला त्याचा वध केल्याचे रंगवून महान बनवण्याचा प्रयत्न केला जातो..
पण सत्य असे आहे
प्लेग साथीत प्लेग संसर्गजन्य असल्यामुळे त्याची लागण आपल्याला होऊन नये म्हणून लोक गावच्या गावं सोडून जात.
साथ नियंत्रणात आणण्यासाठी स्वछ धुतलेले कपडे वापरावेत आणि घरातील अडगळीचे सामान टाकून द्यावे असे मानक तेव्हाही असत आणि रँड तेच अमलात आंणत होता.. पण सनातनी कडव्या विचारांचे असल्यामुळे आपल्या देवघरातील सामानाला हात लावू देत नसत पण इंग्रज दरबारी नियम आणि शिस्तीला धरून जबरदस्तीने हे सामान देवांच्या मुर्तीसककट बाहेर काढले जाई.. ..जातीत फरक न करता सर्वांसाठी एकच कॅम्प लावले जात .. जातीनिहाय प्रेतं वेगळी न करता समूहात ती एकत्रित जाळली जात .. इंग्रज चप्पल घालून देव्हाऱ्यापर्यंत येतो हि आणि अशी मुख्य धर्मभावना दुखावणारी कारणे रँड च्या खुनामागे होती
प्लेग साथीचे त्याचे चुकीचे व्यवस्थापन हे भुलवण्याचे कारण आहे...
एकूणच रँड ची हत्या हि धार्मिक भावना दुखावल्यामुळे केली गेली होती.. याचा दुजोरा पुन्हा चाफेकरांच्याच आत्मवृत्तात मिळतो तो असा..

चाफेकर आत्मवृत्तात एके ठिकाणी म्हणतात

_<*<* " रँड साहेबांचे आणि आमचे काहीएक वाकडे नव्हते त्यांनी जर आमचे धर्मात हात घालण्याकडे दुर्लक्ष केले असते तर आम्हाला असे करण्याचे काम पडले नसते.. "_ >*>*

ते पुढे लिहितात
_<*<* " रँड साहेबास कोणतेही व्यसन नसावे असे आमचे मत आहे. तो कधीही लेडीबरोबर लॉन टेनिस खेळत नसे. असे त्याचे बरेच गुण आमच्या लक्षात आले होते .. पण उपयोग काय ?? तो आमचा धर्मशत्रू बनला होता. त्यामुळे त्याचा सूड घेणे आम्हाला जरूर पडले.." >*>_

चतुरसिंगींच्या मंदिरात चाफेकर एक पद म्हणतात
_<*<* " पुण्य पत्तनी रँड ने धर्म बुडविला सारा ।। त्या मारा अविचारा हात आमुच्या गे आंबे धैर्य दे मज ।। " >*>*_ --- रँड ने आमचा धर्म बुडवला त्यामुळे त्या अविचारीला मारण्याचे बळ दे..

*८ ऑक्टोबर १८९७ ला पोलसांना स्टेटमेंट देताना चाफेकरांनी स्पष्ट म्हंटलय ब्रिटीशानी आंमच्या देवघरातील मुर्त्या तोडल्याने त्याचा बदला म्हणून आम्ही हे खून घडवले...*
असे अनेक पुरावे रँड ची हत्या धार्मिक कट्टरतेतून झाल्याची मिळतात.
------------
------------

जातीयवादी ' ' धर्मान्धळा ' ' सनकि ' ' समाज सुधारकांवर जीवघेणे हल्ले चढवणारा ' ' धर्मशास्त्राविरुद्ध विवाह झाले म्हणून सम्पूर्ण वरातीवर दगड हल्ला करणारा ' ' मराठा सरदारांना हिजडे संबोधणारा ' ' रँड खटला मुसलमानांवर फिरावा म्हणून खोटे पत्र लिहिण्याचा प्रयत्न करणारा '
असा दामोदर हरी चाफेकर शालेय पाठयपुस्तकात एक धडा त्याकरता वाहून आजही शिकवला जातो..

*या माणसापासून खरच आदर्श मिळू शकेल काय ?? आणि मूल घेतील तरी तो कोणता ?*