रविवार, २९ जानेवारी, २०१७

हेमाडपंथी मंदिरांची शैली , खरा मूळ हेमाद्री कोण होता ?

मूळ लेख -Neeraj Salunkhe
हेमाडपंथी मंदिरांची शैली , खरा मूळ हेमाद्री कोण होता ?
महाराष्ट्रात हेमाडपंथी मंदीरे यादवांचा मंत्री हेमाद्री याने बांधली अशी एक थाप /समजूत रुजली /रुजविली गेली आहे. हेमाडपंथी मंदिरे म्हणजे शिवालये ,जी बांधण्यासाठी चुन्याचा वापर न करता एकमेकात अडकवलेले कोरीव दगड वापरून बांधलेले मंदिर शिवालये हे जनमानसात रुजलेले आहे. यादव सम्राट रामचंद्रदेव याचा हेमाद्री हा मंत्री सकलकरणाधिप म्हटला जाई (सासवड जवळच्या पूर गावातील शिलालेख इ.स. १२८५ ). चतुर्वर्गचिंतामणी असे व्रत विषयक ग्रंथ लिहिणारा म्हणून हा हेमाडपंत प्रसिद्ध. २०व्या शतकात महाराष्ट्रात जे इतिहास लेखन केले गेले त्यांनी याला अनेक बाबींचे श्रेय दिले,प्रसंगी याच्या 'यादव सम्राटाला' नाही मात्र अनेक चांगल्या गोष्टींचे श्रेय हेमाडपंत याला दिले गेले. अशी मंदिरे कर्नाटकात जाखणाचार्य याच्याशी संबंधित असली तरी महाराष्ट्रात हे श्रेय हेमाडपंत या ब्राह्मण मंत्र्याचे हे रुजले, इतिहासकारांनी रुजविले, फ़ुलविले. पण थोडासाही मंदिर स्थापत्याचा अभ्यास केलेल्या व्यक्तीला एक विसंगती जाणवे ती ही तेराव्या शतकातील यादवांचा मंत्री हेमाद्रीने ११व्या, बाराव्या शतकातील मंदिरे कशी बांधली असतील ? हा प्रश्न काही जनांना नक्कीच पडला पण याचे उत्तर मात्र कोणी शोधले नाही. सुरुवातीला अर्थातच मी ही अशी मंदिरे बांधणारा हेमाद्री हा यादवांचा मंत्री करणाधिप हेमाद्री असेच माने. मात्र जेव्हा इ.स. १११०ची कल्याणीचा चालुक्य सम्राट षष्ठ विक्रमादित्याची ही मंदिरे पाहण्यात आल्यावर, मी शोध घेऊ लागलो. कन्नड मध्ये 'प' चे 'ह' होते.[उदा पोन-होन , पोयसळ -होयसळ ] त्यामुळे हेम्माद्री/ हेमाडी/पेम्माडी ही रूपे आढळतात. ११-१२ व्या शतकाचा अभ्यास केल्यावर यादव मंत्री हेमाद्रीच्या आधी दोनशे वर्षे अनेक हेमाद्री आढळतात व यातील अनेक राजपुरुष हे षष्ठ विक्रमादित्याचे नातू / नातेवाईक आहेत हे ही लक्षात येऊ लागते., उद. कलचुरी बिज्जल याच्या पित्याचे नाव हेमाद्री होते ( माडगीहाळ लेख ) . कदंब , सिंद ,निकुंब (उदा पाटणादेवी लेख ), गंग ,शिलाहार , सर्व घराण्यात ११-१२ व्या शतकात एक हेमाद्री हा राजपुरुष झाल्याचे दिसते. सामान्य प्रजेमध्ये ही हेम्माद्री हे नाव त्याकाळी आंध्र, कर्नाटक , महाराष्ट्र येथे लोकप्रिय होते इतकेच कशाला एक याच नावाचा काश्मिरी राजा ही आढळतो[षष्ठ विक्रमादित्याने काश्मीर येथील अनेकाना दक्षिणेत आश्रय दिला होता बिल्हण या काश्मिरी कवीने त्याचे चरित्र लिहिले होते . काही वर्षांनी हेमाद्री म्हणजेच षष्ठ विक्रमादित्य हे लक्षात येऊ लागले धर्मापुरी (जि बीड ) येथे सुंदर मंदिर समूह व मूर्त्या आहेत. येथील शिलालेखाचे बारकाईने वाचन केल्यावर सर्व प्रथम षष्ठ विक्रमादित्याचे नाव हेमाद्री होते हे लक्षात आले. षष्ठ विक्रमादित्याने हेम्माडी हे ही नाव धारण केल्याचे उल्लेख अनेक लेखात आहेत उद. संगमनेर तालुक्यात सापडलेल्या आश्वि ताम्रपटात, लातूरचा इ.स. ११२८ चाशिला लेख. .(इ.स. १०७०-११२५)इतका प्रदीर्घ काळ स्थिर राज्य करणारा ,हेमाद्री ही पदवी धारण करणारा षष्ठ विक्रमादित्य चालुक्य हा विपुल व अनेक अश्म रचित मंदिरांचा निर्माता सम्राट असल्याने हेमाद्रीपंथी शैली असलीच तर तीचे श्रेय षष्ठ विक्रमादित्यास द्यावे लागते हा माझा निष्कर्ष आहे.हा निष्कर्ष रुचणारा नसला तरी समकालीन शिलालेखीय पुराव्यांवर आधारलेला आहेया निष्कर्षापर्यंत जाण्यासाठी अनेक शिलालेख उपयोगी पडतात, तो माझाप्रवास मात्र होट्टुऴ पासून सुरु होतो .
The problem of dating of Hemadpanthi style
Hemadri was a minister (sakalKarnadhip) of Yadava Ramchandradev.(epigraph found in Pur village near Saswad,Pune), Generally the rock cut temples built without any binding material by having interlocks are designated as of the ‘Hemadpanthi’ style in Maharashtra. In Karnataka, Jakhanacharya is associated with it. Generally many temples where no definite credential is available, are also declared as Yadava-Hemadpanti temples.
The style is credited with this famous Yadava Minister but problem appears when temples bearing Pre-Yadava credentials, are also known as Hemadpanthi. This discrepancy has been noted by some historians but has not been explored.
But when we look into Yadava or Pre-Yadava(Properly Kalyani Chalukya) period, we came across many Hemmadi, Hemmadridevas and many of them are influential personalities. Many of the commoners with name Hemmadi appear here and there indicating the popularity of that name in that period. A careful analysis also manifests that many of the feudatory families in 11-12th century are having at least one prince with name Hemmadi. All of them are the grandchildren of Vikramaditya VI (1069-1125 A.D.). Vikramadity VI had matrimonial alliances with these families. For example Kalchuri Bijjal’s father was Hemmadi. (Madgihal epigraph) Kadamba, Sind, Nikumbh(Patandevi inscription),Gang, Shilahar all had a Prince with name ‘Hemmadi’. A temple of Hemmeshvar was built during the period at Umrani(tal. Jat Dist. Sangli).
Now why were all feudatories adopting this name? The answer lies with the fact, manifested through epigraphs that Vikramdity VI was also known as Permaadi.(E.g. Dharmapuri inscription) Now the name Permaadi also appears in many families. Permaadi/pemmadi is the same Hemmadi because in Kannad letter “P” becomes “H”. (Hoysal=Poysal, Hon-Pon,). Vikramdity VI had influence from Tamilnadu to Kashmir. He was successful in Chol-Chalukya conflict. He had given shelter to many Kashmir Pandits/Shaiv Pashupatas. The period witnessed pressure from N-W. Bheem, a Kashmiri pandit was his Prime Minister (e.g. Ganeshwadi inscription,Tal. Nilanga or Bhiv ghat inscription near Tasgaon). His biographer Bilhan was from Kashmir(Vikrmaankacharitra) and if we go through Raajtaragini, we come across a Kashmiri king Pemmadi! So we can conclude that the Yadava Minister got the name which was popular for more than a century.
[Before Chalukya, during Rashtrakuta regime, wooden temples had become popular and through many epigraphs, we know that during Chola aggressions many of the temples in Deccan were burnt, where as later period of Vikramdity VI observed blossom of the rock temples, Many Rock Built temples can be dated through epigraphs belonging Vikramadity VI and if there is any Hemadpanthi Rock temple style, the credit of this will go( not to Yadava Minister but )to Vikramditya VI. ही शैली कोरीव काम व दगडांना रचून (अश्म रचनात्मक) केलेल्या वास्तूंशी संबंधित आहे, लोखंडी हत्यारेयांचे काम आवश्यक आहे, पाचव्या शतकातील जेव्हा अशा वास्तू बांधल्या जाऊ लागल्या बदामीला दगडाच्या खाणीत अडकलेलीलोखंडी छिन्नी आता उत्खननात सापडली आहे . दगड रचण्यासाठी मातीकामाचे तंत्र वापरले जाई ते करणाऱ्या औढ जातीवर एक लेख मी लिहिलाय, या वास्तुना व्यापारी, कारागीरउत्पादक ,राजवर्ग (उदा तेली, राजस्त्रिया , अगदी सोलापुरात एका मंदिराला ‘होलेय’ म्हटल्या गेलेल्या जातीचा शेट्टी देणगी देतोय ) इ. संघटना ज्याना श्रेणी म्हटले जाई यांचे आर्थिक पाठबळ असे, काही 'रचनाकार'(architechts ) ज्ञात आहेत, कोरीव काम करणारे कारागीर ही काही ठिकाणी आठवणी ठेवून गेले आहेत
खटाव,जि सातारा येथील बाहेरील दगड पडल्याने हेमाडपंथी शैलीचे अंतरंग व अश्मरचना दर्शविणारे मंदिर (फोटो)(Photo) Peeled view of a rock structured Hemmadi style temple from Khatav(Dist Satara, Mah) giving idea how a hemmadi style temple was built as outer rocks have been separated and inner view, foundation is visible in the photograph.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा