रविवार, २९ जानेवारी, २०१७

मी लोकांना मूर्ख बनवायला आणि पैसे कमवायला राजकारणात आलोय; मोदी माझे आदर्श'

'मी लोकांना मूर्ख बनवायला आणि पैसे कमवायला राजकारणात आलोय; मोदी माझे आदर्श'
मतांच्या राजकारणासाठी वादग्रस्त किंवा चिथावणीखोर वक्तव्ये करणे, ही गोष्ट उत्तर प्रदेशच्या राजकारणात नवीन नाही. सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असल्याने त्याची पुरेपूर प्रचितीही येत आहे. मात्र, एका अपक्ष उमेदवाराने या सगळ्यावर कडी करणारे विधान केले आहे. आग्रा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या गोपाळ चौधरी या अपक्ष उमेदवाराने मी राजकारणात पैसा कमवायला आलो आहे, अशी जाहीर कबुलीच प्रसारमाध्यमांसमोर दिली आहे.
विशेष म्हणजे यावेळी बोलताना चौधरी यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले आदर्श असल्याचे सांगितले आहे. मोदींनी ज्याप्रमाणे देशातील सव्वाशे कोटी जनतेला मूर्ख बनवले तसेच मलादेखील करायचे आहे. जर एखादा मनुष्य १२५ कोटी लोकांना मूर्ख बनवून पंतप्रधान बनत असेल तर त्याच्यात निश्चितच काहीतरी कौशल्य असेल. मला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवायचे आहे. लोकांना मूर्ख बनवून त्यांच्याकडून मते कशी मिळवायची, याचा मी विचार करेन, असे चौधरी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पुढील महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून ही प्रक्रिया सात टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर ११ मार्चला निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
http://www.loksatta.com/uttar-pradesh-assembly-elections-2017-news/this-candidate-in-up-election-says-he-entered-politics-to-make-money-fool-people-1393410/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा