रविवार, २९ जानेवारी, २०१७

"I am A troll" पुस्तकामधून अनुवादीत

By- vaibhav kokate .......

साधवी खोसला,  MBA झालेली तरूणी, अमेरिकेत सहा वर्ष मार्केटींग मधे तिने काम केल्यानंतर ती मायदेशी आली, ट्विटर,ब्लॉगवर ती चांगली अॅक्टीव्ह असते. 5 डिसेंबर 2013 ला तीला तत्कालीन गुजरातचे मुख्यमंञी नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून फोन  आला. "तूमच्या सोशल मिडीयावरच्या लिखाणाने मुख्यमंञी नरेंद्र मोदी प्रभावीत झाले आहेत, आपण भाजप IT सेलला जाॅईन व्हावे असे त्यांचे तूम्हाला विशेष आमञंण आहे" या फोननंतर नरेंद्र मोदी साधवीला ट्विटरवर फाॅलो करू लागले.

भ्रष्टाचार,परिवर्तन, आणि नशामुक्त पंजाब साठी ती ट्विटरवर,ब्लाॅगवर लिखाण करायची, साधवीचे आजोबा सुरेंद्र नाथ खोसला समाना,पंजाब येथून काँग्रेसचे माजी आमदार होते पण "विकास आणि भ्रष्टाचार मुक्त भारत" यासाठी ती भाजपकडे आकर्षित झाली. मोदींच्या विशेष निमंञणानंतर तीने भाजपा IT cell जाॅईन केली, 'चाय पे चर्चा' 'मिशन 272+' यांचा ती एक विशेष भाग झाली. भाजपा IT सेलचे प्रमुख, "मिशन 272+" चे काम ज्यांच्या NDOC या कंपनीला दिले ते अरविंद गुप्ता यांच्या सोबत ती काम करू लागली. भाजपा प्रसिद्धीत आणण्यासाठी त्यांनी रणनिती ठरवली, त्यांनी आधी टार्गेट ठरवले. "गांधी परिवार" सोनिया गांधी,मनमोहन सिंग,राहूल गांधी याचे कार्टून्स बनवून,खोटे मेसेजेस तयार करण्याचे काम NDOC या कंपनीकडे होते.ते नियोजनबद्ध पणे सगळीकडे पोहचवणे हे यांचे काम, एखादा नेता उभा करायचा असेल तर दूसर्या नेत्याची प्रतिमा मलीन करणे हा मार्ग त्यांनी अवलंबिला, यात ते यशस्वी झाले. भाजप इलेक्शन प्रचार हा दिल्लीतून चालायचा, मोदी देशात प्रचारात असताना दररोज राञी आपल्या 'डिजीटल आर्मी' सोबत व्हिडीओ काॅन्फर्सद्वारे संबोधित करायचे. फेक फोटो,फेक माहीती द्वारे ते निवडूणही आले. दोन वर्ष जे सांगेल ते साधवीने केले. तिला आशा होती की निवडून आल्यावर देशाचा विकास होईल.

पण तसे काही झाले नाही, निवडून आल्यावर तिला सगळीकडे द्वेषच द्वेष दिसला, भाजप सरकारच्या विरोधात बोलणार्‍या पञकारांची यादी या डिजीटल आर्मीकडे देण्यात आली. या पञकारांना शिव्या देणे,धमकावणे,अश्लील बोलणे असे काम ही आर्मी ट्विटरवरून करू लागली,यामुळे दोन वर्षापासून रविश कुमारने ट्विटर वापरणे सोडून दिले. दादरी प्रकरण,जेनयु कन्हैया या प्रकरणात तिने भाजपा IT सेलचा नालायकपणा पाहीला, स्मृती इराणीची सोशल मिडीया सांभाळणारी शिल्पी तिवारीने कन्हैयाचा खोटा व्हिडीओ बनवून टाकला, परत तिने तो काढून टाकला. मोदी सोशल आर्मीच्या अंगात मग देशभक्तीचे वारे वाहू लागले. मग यांनी शाहरूख खान,आमिर खान यांच्या विरोधात मोर्चा सुरू केला. साधवीपण अरविंद गुप्ता यांच्या आदेशानुसार शाहरूख,आमिरला विरोध करू लागली, शाहरूख, आमिरला देशद्रोही बोलू लागली.एके दिवशी घरी गेल्यावर तिने विचार केला. गेली 25 वर्ष शाहरूख ला मी 'राज, राहूल' मध्ये पाहीले, आमिरला पण लहानपणापासून पाहत होती पण 25 वर्षात तिला ते कधी देशद्रोही वाटले नाहीत. भाजप सरकार आल्यावरच हे देशद्रोही कसे झाले ? हा प्रश्न तिला पडला. ती फक्त दिलेल्या हूकूमावरून काम करत होती. तिने विकासासाठी दोन वर्ष भाजपा IT सेल सोबत काम केले. तिला निवडून आल्यावर फक्त द्वेषच दिसू लागल्यामुळे तिने भाजप IT सेल सोडली. सोडल्यावर तिला "ट्रोल" करायला पण मोदी आर्मीने मागे पुढे पाहीले नाही.

आपल्या देशाचे पंतप्रधान मोदींना तब्बल अडीच कोटी पेक्षा जास्त लोक ट्विटरवर फाॅलो करतात,तर मोदी फक्त 1641 लोकांना फाॅलो करतात, 1641 मधील 200-250 जण दिवसराञ इतर धर्म-जातीच्या लोकांबद्दल अतिशय घाण लिहतात,पञकार,कलाकारांना मारून टाकण्याच्या, महीला पञकारांना बलात्काराच्या धमक्या देतात, अश्लील टिका करतात. अशा लोकांना मोदी फाॅलो करतात. ऐवढचं नाही तर 1 जुलै 2015 ला यातील 150 जणांना मोदींनी स्वःताच्या दिल्लीतील निवासस्थानी विशेष आमंत्रित करून त्यांना असे करण्यास अजून प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. खोटे वाटत असेल तर मोदी फाॅलो करत असलेले 1641 जण कोण आहेत आणि त्यांचे 2 तीन महीन्यात त्यांनी काय ट्विट केले आहेत ते पहा.

असला खुनसी प्रधानमंञी निवडून दिलाय आपण ?

"I am A troll" पुस्तकामधून अनुवादीत
(पुस्तकाची link  दिली आहे )
http://www.amazon.in/Am-Troll-Inside-Secret-Digital/dp/9386228092

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा