रविवार, २९ जानेवारी, २०१७

जळगाव येथून प्रसिद्ध होणा-या ‘साप्ताहिक बातमीदार ’मध्ये प्रबोधनकारांनी ४० आणि ५०च्या दशकात भरपूर लेखन केलं. या साप्ताहिकातील त्यांचे ‘वाचकांचे पार्लमेंट ’ हे सदर खूपच गाजले

जळगाव येथून प्रसिद्ध होणा-या ‘साप्ताहिक बातमीदार ’मध्ये प्रबोधनकारांनी ४० आणि ५०च्या दशकात भरपूर लेखन केलं. या साप्ताहिकातील त्यांचे ‘वाचकांचे पार्लमेंट ’ हे सदर खूपच गाजले. राज्यभरातील वाचक प्रश्न विचारत आणि प्रबोधनकार त्यांना मर्मग्राही, मर्मभेदी उत्तरं देत. आत्तापर्यंत पुस्तक रुपानं प्रकाशित न झालेलं हे सदर खास ‘प्रबोधनकार डॉट कॉम ’च्या वाचकांसाठी.
 (मागील अंकावरून पुढें चालू) रामचंद्र वी. प्रधान, पुणे. स०- सहा वर्षांपूर्वी आपल्या एकसष्टीनिमित्त मे. जमशेटजी वाडिया (वाडिया मुविटोनचे मालक) यांनी सत्कार समितीला १५०० रु. देणगीचे जाहीर आश्वासन दिले होते. ती रक्कम त्यांनी दिली का? ज०- मोठेपणाच्या मुरवतीसाठी देणग्या जाहीर केल्या तरी त्या दिल्याच पाहिजेत, असा नियम आहे काय? त्याच वेळी जळगांवकरांच्या वतीने महाशय गो. का. चित्रे यांनीहि १५०० रुपयांचे आश्वासन सत्कार समितीला तांरेने कळविले होते. पैकी १०० रु. समितीकडे आले. बाकीच्यांची नुसती घोषणाच! चालायचेच हे असे. मला काय त्याचे? फुला केशव ठाकूर, लोहारी, ता. पाचोरे

स०- कर्णाचा जन्म कुंतीच्या कानांतून झाला हा अनैसर्गिक चमत्कार कसा घडला?

ज०- चमत्कार कुंतीच्या कानाचा नसून पुराणकारांच्या लांब कानांचा आहे. कन्या अवस्थेत (विवाहापूर्वी) कुंतीला कर्ण झाला. अशा पुत्राला ‘कानीन’ म्हणतात. त्या शब्दावर बसवलेली ही काव्य-कसरत आहे. असले चमत्कार लोक नेहमी कानाआड करतात.

स०- आत्मस्तुती करणे चांगले का वाईट!

ज०- करून पहा. अनुभव येईल तो अक्कलखाती जमा करा. धनजी रावजी पाटील, लोहारी.

स०- निवडणुकीच्या हंगामात आपली अमोल फुली देऊन ... ...

ज०- छे छे छे छे पाटीलभाऊ, येत्या निवडणुकीत फुल्याबिल्या नाही करायच्या नाहीत हो. दर डोई एक मत. त्या मताची एकच चिठ्ठी हातात मिळेल. ती जशीच्या तशी, फुलीबुली काही न करता, उमेदवाराच्या पार्टीची चित्राची निशाणी पाहून त्या पेटीत नुसती टाकायची. लक्षात ठेवा. इतरांना सांगा. आत्माराम उखर्डू खंगार, लोहारी. ओहारी गाव जागा झाल्यासारखा दिसतो. तिघांचे प्रश्न आहेत आजच्या पार्लमेण्टात.

स०- शैक्षणिक दर्जा फारच खालावला. या निनादाने दशदिशा दुमदुमून गेल्या आहेत. ही परिस्थिती कधी नि कशी बदलता येईल?

ज०- गेल्या निवडणुकीत काँग्रेसपार्टीची हकालपट्टी केल्याने.

स०- मूठभर खरा स्वार्थ कोठे आहे नि तो कोणता?

ज०- माणसाच्या पोटात. कशीहि परिस्थिती असो, आपण काटा कूटा न रुपता खुपता शंभर वर्षे जगावे, हा तो स्वार्थ. लक्ष्मीसुत तळवेलकर, तळवेल.

स०- विजयालक्ष्मी पंडित यांची अमेरिकेतील वकीलातीची कचेरी माजविलासी थाटाची आहे. दरमहा लाखो रुपये खर्च होतात. हा भुर्दंड तुम्हाला आम्हा गरिबांच्या बोडक्यावर लादला जातो. असे नाना पाटील एका सभेत म्हणाले आणि टिंगलीने खदखदा हासले. कां बरे?

ज०- हासण्या हासवण्या पलिकडे आणखी काही त्यांना समजते. हा तुमचा गैरसमज आहे. नथू संपत शिंद, नशिराबाद.

स०- अत्रे पिक्चर्सच्या ‘ही माझी लक्ष्मी’ बोलपटात इतर अनेक साहित्यकांबरोबर काम करणारे केशवराव ठाकरे ते आपणच कां? या वयात चित्रपट व्यवसायात उतरण्यात आपला उद्देश कोणता?

ज०- होय, तोच मी. ‘आपल्या सर्व साहित्यक स्नेहीजनांची हालती बोलती चालती प्रतिमा काढून ठेवावी’ म्हणून महाशय अत्रे यांनी ही योजना केलेली आहे. तसे म्हटले तर, नथूभाऊ, मी फार पुराणा रंगेल नाटक्या आहे बरं. वयाच्या ८व्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केले.

स०- विवाह विधिकरार का बंधन? नोंदणीविवाह इष्ट का अनिष्ट?

ज०- शुभ मंगल सावधानच्या थोतांड्या विधीने होणारा विवाह, मानला तर बंधन नाहीतर करार. आता नोंदणी विवाहच इश्ट. धार्मिक विधीने कुटुंब किती का श्रीमंत असे ना, अथवा नव-याने स्वता कितीहि पैका अडका मालमत्ता केलेली असे ना. पुत्र वारस ठरतात आणि बाईला फक्त पोटगीपुरता हक्क नोंदणी विवाहाने पतीच्या मालमत्तेची पत्नि तात्काळ आठ आणे भागीदार होते. बाकीच्या आठ आण्यात पुत्रांचा वारसा. धार्मिक गडबडगुंड्याचे विवाह शक्य तितक्या लवकर बंद
पडले पाहिजेत. प्रकाशचंद्र रतनलाल सुराणा, बोदवड. स०- काँग्रेसला मते कां देऊ नये?

ज०- गेल्या तीन साडेतीन वर्षातले बातमीदारातले माझे लेख वाचले दिसत नाहीत. आजूबाजूच्या परिस्थितीचाहि चटका आपल्याला लागलेला दिसत नाही. काय उत्तर द्यायचे? थोडक्यात सांगतो, गेल्या चार साडेचार वर्षात काँग्रेसपार्टीने राज्यकारभाराची नालायकी भरपूर सिद्ध करून, जनतेला अन्न वस्त्र आस-याला महाग केले आहे. म्हणून त्या नालायक पार्टीचे सरकार आता नको, असे लोकांनी ठरवले आहे. सीताराम मोतीराम पाटील, भादली बु०

खुलासा०- ''मला इतके प्रश्न उद्भवतात कीं त्यांच्यामुळे मला वेडे होण्याची पाळी आली आहे''... अशा प्रस्तावनेने पाटीलभाऊनी तडाड ४८ प्रश्नांची सरबत्ति माझ्यावर सोडली आहे. नवनवीन माहिती मिळवण्यासाठी प्रश्न विचारण्याची जिज्ञासा निराळी आणि ही वेळ लागण्याची आपत्ति निराळी. एकंदर अंदाज घेतला तर या तरुणाच्या आजूबाजूची परिस्थिती विचित्र दिसते. रहाणी खेडेगावची. वृत्तपत्रात येणारा मजकूर, बातम्या, त्याला भांबावून सोडतात. बुद्धीला स्थिरता देणारे वाङमय अवलोकनातच नसावे. त्यामुळे आजूबाजूच्या नि घरातल्या मंडळींच्या वागणुकीचा अर्थ त्याला नीटसा लागत नसावा आणि त्यानाहि याच्या मनातले व्यापार कळत नसावे. हे पहा, सीतारामभाऊ, रागाऊ नका. तुमच्या बहुतेक प्रश्नांचे जबाब इतरांना दिलेल्या जबाबांत वरचेवर आढळतील. पण एक काम करा. जगाच्या विश्वाच्या नि राष्ट्राच्या भविष्याची विवंचना टाकून द्या आणि स्वतःच्या बुद्धीला विवेकाची झिलाई देईल असे वाङमय अभ्यासात ठेवा. ''जीवनाविषयी मी अगदी निराशावादी बनलो आहे'' म्हणता? तुमचे वय ते किती, विद्या किती, आणि एकदम जीवनाविषयी निराशा? आयुष्यात काय असे मोठे पानपत झाले हो मॅट्रिक होऊन नोकरी मिळत नाही म्हणून शालेय पुस्तकी ज्ञानापेक्षा आणि वर्तमानपत्री लिखाणापेक्षा, अंगात काही हुन्नर असेल, मनगट घासून काम करण्याची हिंमत असेल, तर त्या खेडेगावात रहाता कशाला? सोडा ते आणि पडा बाहेर. मिळेल तो रोजगार पत्करा. तेथे स्थिर व्हा. व्यवहाराची कदर अनुभवा. लोकांत मिळून मिसळून वागा म्हणजे बुद्धी स्थिर होईल आणि स्वतःकडे नि जगाकडे पहाण्याची दृष्टी निवडेल, तुमच्या मनमोकळेपणाने उत्तेजित होऊनच मी हे विचार सांगत आहे इतरानाहि ते उपयोगी पडतील. लक्ष्मणकुमार चौगुले, मच्छे, बेळगांव.

स०- मध्यम वर्गाचे आजकाल भयंकर हाल होताहेत असो ओरडा ऐकू येतो. पण सिनेमा थेटरांत भारी दरांच्या जागांवर त्यांचीच नेहमी गर्दी असेत. हे काय गूढ आहे?

ज०- उपाशी पोटी मिशीला तूप लावून फिरण्याची बापजाद्यांची यांची खोड अजून सुटत नाही.

स०- शिवाजी छत्रपती आणि लो० टिळक यांच्याबद्दल बाळासाहेब खेरांनी जे अनुदार उद्गार काढाले, त्यावरून त्यांचा इतिहास विषय कच्चा होता, असे म्हणावे लागते. मग ते शिक्षणमंत्रि कसे झाले?

ज०- मंत्रि व्हायला विशेल अक्कल लागते, अशी का आपली समजूत आहे? ज्या काँग्रेसी राज्यात गुंडपुंडांचे दादा जस्टिस ऑफ द पीस होतात, तेथला इतर मामला किती सांगावा? स०- मार्क्सचे तत्वज्ञान शेकडा ९० लोकांचा अन्न पाण्याचा प्रश्न सोडवते म्हणतात?

ज०- पुस्तकापुरते तत्वज्ञान असेल ठीक. हरिनाम संकीर्तनाचे सदेह वैकुंठाला जाणारे लोक आमच्याकडे फार होतात. पण मार्क्स तत्वांचा उच्चार नि प्रचार करणारांचे डोळे इंगळासारखे लालबुंद आणि डोईच्या झिंज्या शिंदीच्या खराट्यासाऱख्या फडफडणा-या असल्यामुळेंच येथील विचारवंत लोक त्या तत्वापासून दोन हात दूर रहात आहेत. मार्क्सवादी लालभडक मडक्यांनी आगी उत्पात नि खुनांचे सत्र जागोजाग चालवून शेकडो लोकांच्या प्राणहानीने सध्याच्या तुटपुंज्या अन्नसामुग्रीत काटकसर घडवली, ऐवढे मात्र खरे. तेव्हढी तोंडे खायला कमी झाली.

स०- संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात असूनहि अद्याप तो कां निर्माण होत नाही? ज०- बडबड फार, चळवळ कोठेच काही नाही म्हणून.

स०- प्रेम म्हणजे काय? ज०- वेलाशिवाय टवटवणारी कळी आणी दोरासिवाय अंतराळी उडणारी वावडी. पंढरीनाथ भिवसन पाटील, बोरनार पो. म्हसावद. स०- आताच्या परिस्थितीत मुलींना कितपत अधिक शिकवणे श्रेयस्कर आहे? ज०- जितपत मुलांना शक्य नि श्रेयस्कर आहे तितपत. स०- महात्मा गांधी, येशू क्रिस्त अशा
महान धर्मसंस्थापकांना चांगला मृत्यु कां येऊ नये? त्यांची हत्याच कां व्हावी? ज०- मृत्यूचे चांगले वाईट प्रकार आपण ठरवतो. तसे ते मुळीच नसतात. मृत्यु म्हणजे मृत्यु. हत्येने झालेला मृत्यु वाईट म्हणावा, तर लढाईत मरणारांच्या पुण्याईची गीतास्तोत्रे फोल ठरवावी लागतील. वात पित्त कफाने जर्जर होऊन बिछान्यात कण्हत कुंथत मरण्यापेक्षा कर्तव्यमग्न असताना ठार मारले जाणे अधिक श्रेयस्कर, आत्महत्या करणारांच्या मृत्यूचा मात्र कडकडीत निषेधच झाला पाहिजे. बळीराम शंकर पोलिस पाटील, रणगांव, पो सावदा. स०- बहुतेक भजनी मंडळीत तमाशांतील किंवा सिनेमातील संगीत गाणी गायली जाताना आढळतात. ते देवाला आवडेल का? ज०- देव बसला देवळात! गाणारांची तर करमणूक होते ना? एरवी तरी भजने देवासाठी थोडीच असतात? देवाला काय कळणार त्यात. स०- पुरुषांचे मन आकर्षण्यासाठी स्त्रियांनी सौंदर्यप्रसादने वापरावी काय? ज०- परस्पराकर्षणासाठी दोघानीहि वापरली तरी काय हरकत आहे? स०- इतर समाजांत प्रतवाहनाची पद्धत गौरवशील असते, --- लोकांत तशी ती कां नसावी? ज०- इतरांपेक्षा हिंदुलोक या बाबतीत रानटी नि खुळचट आहेत. पंढरीनाथ मनसाराम नेहेते, सावदा. स०- इंग्रेज लोक १३ अशुभ कां मानतात? ज०- येशू क्रिस्ताने जे अखेरचे भोजन (सपर) केले त्या वेळी जुडास सकट १३ आसामी त्याच्या पंगतीला होते. हा एक आधार. दुसरा युरोपात पूर्वी चेटक्यांचे प्राबल्य फार होते त्या चेटक्यांच्या टोळीत खूप चेटक्या असत या दंतकथेवरून १३ आकड्याच्या अशुभत्वाचा प्रसार झाला. येशू ख्रिस्ताला शुक्रवारी सुळावर दिले म्हणून पाश्चात्य ख्रिस्ती शुक्रवार घातवार समजतात. त्यांच्या माकडी नकलेने आम्हीहि तसेच मानीत असतो. लोकभ्रम अतिशय स्पर्शजन्य आहे. स०- एस. एस. सी. परिक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात सरकारचा हेतु काय आहे? ज०- शालान्त परिक्षेच्या टिकलीसाठी घाघावलेल्या अर्धालांब पोरापोरीची गचडी विरळ करण्यासाठीय स०- हिंदूंचे कोणते सण आता रद्द करावे आणि कोणते नवीन चालू करावे? ज०- सगळे बंद करावे. हिंदूंना सण साजरे करण्याची अक्कलच उरलेली नाही. स०- होमगार्ड म्हणजे काय? त्याची उत्पत्ति नि कार्य काय? ज०- देशाचे सैन्य बाहेर युद्धात गुंतले असताना स्वदेशाचे संरक्षण करण्यासाठी स्वयंसेवकांची पथके तयार करण्याचा उपक्रम नेपोलियनने केला. १९ व्या शतकाच्या मध्यावर या प्रथेचे पुनरुज्जीवन युरोपात झाले. १९०८ साली टेरिटोरियल फोर्स याच तत्वावर काढले नि पुढें त्याचे सैन्यातच विलिनीकरण झाले. होमगार्डचा उपक्रम वर्तमान जीवनात एक आवश्यक बाब आहे. भाऊलाल गणेशमल ओसवाल, बोदवड. स०- हल्ली चोहीकडे लोकशाहीचे प्रस्थ का माजले? ज०- कोणत्या शाहिचे भोक्ते आपण आहात? स०- सुभाषबाबू जिवंत आहेत का मरण पावले? जिवंत असल्यास ते भारतात कां येत नाहीत? मरण पावले असल्यास, भारतीय पुढारी त्यांचा स्मृतिदिन कां साजरा करीत नाही? ज०- ‘मी खरोखरच मेलो आहे.’ असे स्वता जिवंत माणसांना सांगण्याची मृत माणसाना कसलीच सोय नसल्यामुळे, त्यांच्या जगण्यामरण्याच्या गप्पांचा धुरोळा उडवून राजकारणी पाचपेच लढवायची डोकेबाजाना चांगली संधि मिळते. सुभाषबाबू निश्चित मरण पावले आता स्मृतिदिनाविषयी म्हणाल तर, भारतीय पुढारी इतके सत्ताधुंद झाले आहेत का सुभाषबाबूंच्या क्रांतिकार्याची त्यांना दिक्कत वाटेनाशी झाली आहे. नेताजींनी ब्रिटिशांच्या हिंदी पलटणी फोडण्याचे भीमकर्म केले नसते, तर ब्रिटिशांनी आणखी २५ वर्षे स्वातंत्र्याच्या काँग्रेजी केकाटण्याला दाद दिली नसती. या शहाण्यांना वाटते का आपण खादी टोपी कुडत्याच्या दिमाखावर स्वराज्य मिळवले. सुभाषबाबूंच्या पाठोपाठ बिचा-या आझाद सैनिकांनाहि या काँग्रेजी कसाबानी धुळीचे दिवे फुंकित वाटेला लावले. सूचनाः- प्रत्येकाने अधिकात अधिक फक्त ४ च प्रश्न विचारीत जावे. वाचकांचे पार्लमेण्ट जबाबदारः- प्रबोधनकार ठाकरे काही खुलासेः- (१) माझे प्रबोधन पाक्षिक अजून चालूच आहे, अशा समजुतीने अनेक स्नेहीजन ते चालू करण्याविषयी मला वरचेवर पत्रे पाठवित असतात. प्रबोधनच्या ऐवजी गेली चार वर्षे मी बातमीदार साप्ताहिकाच्या ओसरीवर बसून प्रबोधनची कामगिरी करीत असतो. तेव्हा त्या सर्व हितचिंतकांनी बातमीदारचे वर्गणीदार व्हावे. (२) कोणतीहि विचारणा करणारांनी
उत्तरासाठी जोड कार्ड अथवा पोस्टाचे तिकीट पाठवीत जावे. --ठाकरे. बी. आर. तायडे, मु०पो० रावेर, स०- येत्या निवडणुकीनंतर हिंदु कोड बिल पास होण्याची आशा आहे काय? ज०- काँग्रेसवाल्यांना निवडून देण्याचा लोकांनी मूर्खपणा केला, तर तुमच्या आमच्या हयातीत ते पास व्हायचे नाही. स०- सेक्युलर स्टेट चा मराठी प्रतिशब्द काय आहे. ज०- शब्दकोशात संसारी, ऐहिक, लौकीक, पुष्कळ काळाने होणारा, असे प्रतिशब्द दिलेला आहेत. चर्च किंवा धर्म यांशी संबंध नसलेले राज्य, असा त्यात मार्मिक श्लेष आहे. निधर्मी राज्य किंवा धर्मातीत म्हणजे धर्मबिर्म न मानणारे राज्य, धर्म विषयाच्या बाहेर असणारे राज्य, असा अर्थ सांगण्यात येतो. प्रस्तुतचे काँग्रेजी राज्य धर्मातीत म्हणून कितीहि पुकारा होत असला तरी पायांचे किंवा संस्थांचे दगड बसवताना एकजात पांढरटोपे काँग्रेजी मुखत्यार भटांच्या चर्पटपंजरीने हिंदुधर्म पद्धतीनेच पाया भरणीचे मंगलकार्य साजरे करतात. सेक्युलरपणाच्या कल्पना हा एक ठळक काँग्रेजी निर्लज्जपणा आहे. स०- पिशाच्च योनी अस्तित्वात आहे म्हणतात, ते खरे आहे काय? ज०- सभोवर चिलटा पिसवांइतका काँग्रेजी प्राण्यांचा सुळसुळाट दिसत असताना नाही म्हणण्याचे धाडस कोणी करावे? स०- गर्भवतीला मुलगा होईल का मुलगी होईल हे निश्चित सांगणारे एकादे शास्त्र आहे काय? ज०- आयुर्वेदात माहिती आढळते. शास्त्र आहे किंवा नाही, मला माहीत नाही पण कित्येक स्त्रिया मात्र हे अचूक सांगताना आढळतात. स०- काहीं स्त्रियांत नि काही पुरुषांतहि वांझपणा असतो. तो कशाने उत्पन्न होतो? तो घालवता येतो काय? ज०- कशाने उत्पन्न होतो, ते सांगता येणार नाही. पण काही शास्त्रीय सर्जिकल किंवा औषधी उपायांनी तो घालवता येईल, अस माझे एक डॉक्टर स्नेही सांगतात. सूचना - बालसंगोपनाविषयीच्या पुस्तकांबद्दल बुकसेलराकडे चौकशी करावी. त्रिं. ज. आगाशे, पुणे. स०- दारुबंदी आणि वेश्याव्यवसाय यांत अधिक वाईट कोणते? ज०- दोनीहि वाईटच. दारुबंदीमुळे वेश्याव्यवसायाला उत्तेजन मिळू लागले आहे. पुर्वी दारू पिण्यासाठी लोक क्लब आणि बारमध्ये जात असत. आता दारूच्या घोटासाठी वेश्यांच्या घरी जात असतात. स०- दुधदुभते विकणारे गवळी आणि मासेमार कोळी यांच्या व्यवसायातील विशेष काय? ज०- गवळी पाण्याचा पैसा करतो आणि कोळी पाण्यातून पैसा करतो. केसरीलाल लछीराम जैसवाल, महाळुंगी जहागी, ता० मलकापूर स०- कृष्ण नि गांधी यांपैक्षा आपण दोघे मोठे, असे आपण म्हणता, ते कसे? ज०- आपण दोघे छोटे, हा न्यूनगण्ड बाळगण्यात तरी काय पुरुषार्थ आहे? स०- शरीरातला आत्मा निघून गेल्यावर मृत्यू होतो, मृताचा आदर करणारे ‘आत्म्याला शांति मिळो’ म्हणतात. तेव्हा ते कोणाला विनंती करतात? ज०- देह आत्म्याचा संयोग आणि वियोग हे एक कोडे आहे. आजवर कोणाला ते सुटले नाही नि पुढे सुटणारहि नाही. मृत माणसाविषयी काही गोड बोलले पाहिजे, एवढ्यासाठी आत्म्याच्या शांतीचा तोडगा निघालेला आहे. केवळ सदिच्छेपेक्षा त्यात अधिक अध्यात्म काही नाही. मनोहर सपकाळे, सावदा. स०- भावना व वासना यात फरक काय? ज०- भाव नाही ती भावना आणि वास नाही ती वासना. स०- आजच्या तरुणांनी जीवनाची पूर्वतयारी कशी करावी? ज०- जगातल्या थोरथोर नर नारींची चरित्रे अभ्यासून आपल्या पिंड प्रकृतीशी जुगणा-या व्यक्तीच्या जीवन-तपशिलांप्रमाणे. स०- सोशालिस्ट पक्षाचे अंतिम ध्येय काय? ज०- सोशालिस्ट वाङ्मयाचा काळजीपूर्वक अभ्यास करा. देअर इज नो शॉर्टकट टू नॉलेज. स०- सत्यशोधक शब्दाची व्याख्या काय? ज०- तुपाची चव शब्दानी सांगा. स०- महात्मा गांधींनी सत्य अहिंसेच्या प्रचारासाठी जीवन खर्ची घातले, तरी त्यांना नोबेल प्राइज कां मिळू नये? ज०- त्यांच्या कीर्तीच्या गगनचुंबी उंचीचा नोबेल कमिटीचा हात पोचू शकला नाही म्हणून. विनायक तळवेल स०- येत्या निवडणूकीत सोशालिस्ट पक्ष विजयी झाला आणि त्याचे सरकार बनले, तर ते काँग्रेसपेभा अधिक सुधारणा करणारे होईल काय? ज०- लोकशाही स्वराज्याच्या प्रयोगाचा सध्या आपण श्रीगणेशा घटवीत आहोत. काँग्रेसपक्षाची लायकी आपण पुरीपुरी पाहिली. आता सोसालिस्टांना प्रयोगाची सवलत द्यायला
हरकत कसली? स०- विद्यार्थ्यांना राजकारणाच्या वादविवादात भाग घेणे योग्य का अयोग्य? ज०- हायस्कूल कॉलेजांतून पार्लमेण्टे चालविण्याची प्रथा उत्तम आहे. मात्र प्रत्यक्ष राजकारणाच्या चळवळीत भाग घेणे उचित नाही. विद्यार्जनाचा काळ विद्यार्जनातच घालवला पाहिजे. गांधी चळवळीत शिक्षण सोडून राजकारणी धामधुमीत भाग घेणा-या विद्यार्थ्यांच्या जीवनाचे धिंडवडे उडालेले आहेत. रामकृष्णराव दौलतराव शेळके, मु. राजूर, पो. बोदवड. स०- डॉ. आंबेडकर यांचा बौद्द धर्माकडे ओढा फार आहे. त्या धर्माने दलित जनतेचे दारिद्र्य नि हीनता नष्ट होईल काय? ज०- धर्माच्या रंगचोपडणीने पूर्वी कधि असे झाले नाही आणि आता असे होणार नाही. स०- बोदवड येथे परवा एका बुवानी मोठ्या आकसाने सांगितले का आता सारे पंथ जाळून, देशाचा कारभार साधू संत नि भक्त यांच्या हातात आला तर सारी विषमता एकदम नष्ट होईल. ज०- होईल होईल. सबंध हिंदुस्थान सदेह वैकुंठाला जाईल. मुरलीधर कृष्णा पाटील, भादली बु. स०- विवाहित पुरु, कधिकधि पत्नीविषयी जिव्हाळा ठेवूनहि दुस-या एकाद्या तरुणीच्या आकर्षणात सापडतो, याचे कारण काय? ज०- त्याच्या पत्नीचा अर्धवटपणा. स०- संसार आपणासाठी का आपण संसारासाठी? ज०- वासासाठी फूल का फुलासाठी वास? विश्वनाथ डी नेहेते, सावदा स०- काँग्रेजी राजवटीत कलावंतांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थान किंवा उत्तेजन कां मिळत नाही? ज०- काँग्रेजी राजवट ही सुतक्यांची राजवट आहे. पाच वर्षांत त्यांनी लोकांचा नूर पार कोमेजून टाकला आहे. देशाला अवकळा कशी आणावी ही एकच कला त्यांना चांगली साधली आहे. स०- मोठमोठे पुढारी एकसारखे पक्ष-बदल कां करतात? ज०- ज्या खाणावळीत चांगले जेवायला मिळेल तिकडे जाणे, हा मनुष्याचा स्वभावच आहे. स०- वाङमयामध्ये मानवी जीवनाची खरी कल्पना येते काय? ज०- जीवन जगून अनुभवावे लागते. कल्पना करून ते जगता येत नाही. नामदेव नारायण शिंदे मु० पो० भुसावळ स०- भारताची संस्कृती उज्वल नि प्राचीन असतां, येथे भयंकर आर्थिक विषमता कां असावी? ज०- संस्कृतीचा नि आर्थिक विषमतेचा काही संबंध नसतो. शिवाय, संस्कृतीच्या आमच्या कल्पना नि जल्पना वाह्यात आहेत. स०- आपल्या उज्वळ सोज्वळ नि श्रेष्ठ संस्कृतीत अस्पृशता निर्माण झालीच कशी? आणि टिकली तरी कशी? ज०- ही संस्कृती उज्वल सोज्वळ नि श्रेष्ठ नाही म्हणूनच. दयाराम तुकाराम गवळी, तारखेडे स०- हल्ली आपल्यात पूर्वीसारखे कवि कां नाहीत? ज०- पूर्वीसारखे म्हंजे कसे? आताचे काय वाईट आहेत? स०- नैमित्तिक अस्पृश्यता मानावी का न मानावी? ज०- घाण दुर्गन्ध पुरती अस्पृश्यता पाळलीच पाहिजे. जातीय अस्पृश्यता मानणे माणुसकीचे नव्हे. नारायण नथू चौधरी, कांडवेल. पो. निंभोरा स०- दारुबंदी कायदा झाला तरी पिणारे पितातच. रेशनिंग आहे तरी काळा बाजार चालतोच. द्विभार्या प्रतिबंध कायद्याचे असेच होत असेल का? ज०- शंका आहे वाटतं. विवाहाशिवाय लग्न लावता येते. स०- वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे काय? ज०- वैयक्तिक स्वातंत्र्याची जाणीव. गणपति ओंकार सोनार, एकतारा, पो. बेटावद स०- माणसाने सदा नम्र असावे म्हणतात, पण नम्रतेपासून जन्मात तरी काही फायदा होईल काय? ज०- नम्रता म्हणजे मेंध्येपणा असे कुणी सांगितले तुम्हाला? स०- स्त्री ही पुरुषाची माता, घटकेची प्रेयसी आणि अनंत काळची शत्रु असे म्हणतात, ते कसे? ज०- स्त्रीला अनंत काळची शत्रु ठरवणारा वेदान्ती माणुसकीला मुकलेला असावा. सीताराम मोतीराम पाटील, भादली बु।। स०- हिंदुस्थानात चहाचे प्रस्थ कोणत्या सालापासून चालू झाले? ज०- माझ्या लहानपणीं म्हणजे ६७ वर्षांपूर्वी आमच्या घरात चहा चालू होता. तेव्हां ते प्रस्थ त्यापूर्वी बरीच वर्षे समाजात चालू असावे. चहाचा इतिहास चहा इतकाच लज्जतदार आहे. सन १७६७ साली चहा प्रकरणावरूनच अमेरिकेत इंग्लंडविरुद्ध मोठे वादळ उठले आणि त्या वादळातून अमेरिकेच्या स्वातंत्र्याचे निशाण फडकले. स०- माणसाने कोणत्या वयापासून ध्येय बाळगावे? ज०- कुत्र्या मांजरासारखे ध्येय हे काय बाळगायचा प्राणी आहे की काय? ध्येयाचा नि वयाचा काही संबंध नाही. आयुष्याच्या अखेर
पर्यंत ध्येयाची गाठभेट न झालेले कितीतरी आहेत. शांताराम दशरथ बि-हाडे, मेहुणवारे. स०- सती जाणे किंवा विधवा रहाणे, यात ऐहिक किंवा पारलौकीक कोणते? ज०- परलोकाविषयी माहिती कोणत्याहि ज्ञानकोशात नाही.तिकडे गेलेले लोक जितके बेपर्वा कीं चुकून कधि भेटत नाहीत, रेडिओवरहि बोलत नाहीत. तेव्हा तेथला सुखदुःखाचा वादच नको. सती स्तोम पोटभरू भिक्षुकांनी माजवले आणि विचारशून्य मूर्खांनी वाढवले. शेकडा ९९ स्त्रिया आपखुशीने नव-याच्या जळत्या सरणावर चढणार नाहीत याची पक्की खात्री केल्यानंतरच सतिबंदीचा कायदा झाला आणि तो कदरीने अमलात आणला गेला. ऐहिक सुखाच्या कल्पना वायफळ होत. शेकडा १०० विधवांना पोळपाट लाटण्याचे किंवा भलत्याच इसमाची शय्या थाटण्याचे ऐहिक सुख मात्र लाभते. प्रत्येक अपत्यहीन विधवेने आपण होऊन पुनर्विवाह लावण्याचे धाडस दाखविले पाहिजे. स०- पोथ्या पुराणे ऐकून परिस्थिती सुधारली का बिघडली? ज०- माणसांची जनावरे बनली. स०- विज्ञानशास्त्राकडे आमचे लक्ष कां वेधले जात नाही? ज०- गुरुचरित्र, व्यंकटेश स्तोत्रादि पोथ्यांची ठरावीक मुदतीची पारायणे करून मोक्षाचा गोळा आयता आमच्या हातात पडत असताना विज्ञानशास्त्राची ती कटकट हवी कोणाला? त्या धर्मभ्रष्ठ अमेरिकन –नानी रेडियो राडार रॅकेट आटम बांब काढावा आणि आम्ही धर्म अध्यात्मवादी शहाण्यांनी मोदकांचे पार बांधून बुद्धिदात्या गणोबाची आराधना करावी. कबीराने म्हटलेच आहे ना, ''तूं तो राम सुमर, --- लढवा दे.'' हवी कशाला ती आपल्या पंचाईत? शिवाय, विज्ञान शास्त्राकडे लक्ष लागले तर परमेश्वराचे अस्तित्व हायड्रोजन ऑकसिजन वायूत खलास होईल, त्याची वाट काय? बिचा-या परमेश्वराला हिंदुस्थानाशिवाय नि हिंदूंशिवाय जगात दुसरे मायपोट नाही. मनोहर सपकाळे, सावदा. ठीक ठीक, तुमचे नाव ‘उर्फ लक्ष्मण सपकाळे’, हे समजले. पण कायहो, मनोहरराव उर्फ लक्ष्मणराव, मी किती शिकलो आहे, मला पोरेबाळे किती, असल्या प्रश्नानी पार्लमेण्टचे काही अडत आहे का? स०- आपण आत्मचरित्र लिहिले किंवा लिहिणार आहात काय? ज०- सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, या धोरणाने थोर लोकोत्तर विभूतींची चरित्रे अभ्यासण्याची नि लिहिण्याची मला फार आवड आहे. रंगो बापूजी, पंडिता रमाबाई ही चरित्रे प्रकाशात आणली. आता संत श्री. कर्मयोगी गाडगे बाबांचे मोठे चरित्र लिहीत आहे. असल्या थोर महान व्यक्तींच्या पुढे हा ठाकरे कोणत्या झाडाचा पाला. स०- आमच्या सावदा हायस्कुलातील मराठीचे एक शिक्षक सांगतात की प्रबोधनकार ठाकरे पूर्वी कोल्हापूरच्या राजाच्या पदरी दिवाण होते (अर्थात काही दिवस) आणि त्या राजाश्रयाच्या जोरावर आपण प्रबोधन चालवित होता. ज०- आरपार खोटी गोष्ट आहे ही, म-हाट्यांच्या इतिहासाबाबत आणि समाजसुधारणेच्या शेकडो प्रश्नांवर शाहू छत्रपति माझी सल्ला मसलत वरचेवर पुष्कळ घेत असत. त्यांचा किंवा आणखीं कोणा राजाचा मी (थोड्या दिवसापुरताच का होईना) दिवाण असतो, तर हयातभर दिवाणा कशाला राहतो? राजाश्रयावर प्रबोधन काढले नि चालवले, ही तर माझी नागडी बदनामी आहे. आजवर कोणत्याहि बाबतींत केव्हाहि राजाश्रयाचे पाप मी पत्करलेले नाहीं. शाहू महाराजांचा मी अश्रित असतो तर सन १९२१ साली प्रबोधन निघताच, त्याच्या २ -याच अंकात ''अंबाईचा नायटा'' हा एक लेख लिहून शाहू महाराजांची खडबडीत हजेरी मी कशी घेऊं शकलो असतो? तुमच्या त्या शिक्षकजींना हा सवाल टाकून, त्यांची गैरसमजूत दूर करावी. आपले बाकीचे सवाल पुढल्या बैठकीत. लक्ष्मीसुत तळवेल. स०- परवा १२ १२ ५१ रोजी सर्वत्र दत्तजयंति साजरी झाली. तीन डोक्यांचा नि सहा हातांचा देव झोप कसा घेत असेल? ज०- घोड्याप्रमाणे हा देव उभ्याउभ्याने झोपेची डुलकी घेत असेल. मला कधि कुठे तो भेटलाच, तर तुमच्यासाठी त्याला हा खुलासा अगत्य विचारीन. स०- सत्व रज तम या तीन गुणांचा संयोग म्हणून ही दत्ताची कल्पना आहे काय? ज०- बरोबर हेरलेत, शैव वैष्णवांचे वाद मिटवण्यासाठी एका डोकेबाज माणसाने हा तीन डोक्यांचा देव आपल्या कल्पनेतून प्रसवून तुमच्या आमच्या डोक्यांवर बसवला आहे. शैव वैष्णव वाद तर मिटले नाहीच,
पण सत्यनारायणाप्रमाणे हा एक देव आमच्या देवाळ म्युझियममध्ये ठाण मांडून बसला. लक्ष्मणकुमार चौगुले, मच्छे, बेळगांव, स०- शिकलेल्या बायकांना शील नि विनय नसतो म्हणतात हे खरे काय? ज०- तुमचा अनुभव सांगा ना? सापसाप म्हणून भुई धोपटणे बरे नव्हे. स०- मी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढेन, असे काकासाहेब गाडगीळ म्हणतात, इतके दिवस या प्रश्नावर कां तोंड बांधून बसले होते? ज०- अहो आज निवडणूक लढवायची आहे ना? जो जो जे जे मागील ते ते द्यायला हे (लंब) कर्णाचे अवतार आश्वासनांचा खजीना चव्हाट्यावर उघडा मांडून बसले आहेत. स०- आजकालच्या मराठी लिहिण्या बोलण्यांत पुष्कळ इंग्रेजी शब्दांची पेरणी आढळते. हा मराठी भाषेचा अपमान नव्हे काय? ज०- इंग्रेजी शब्दाला प्रतीशब्द नसला तर काय करावे? हे पहा, चौगुलेभाऊ, ‘शिवशील मेल्या दूर हो’ असला सोवळेपणा बरा नव्हे. स०- स्वातंत्र्य मिळून चार वर्षे झाली, तरी साप्ताहिक रविवारची सुटी कशाला? तो वार बदलता येणार नाही काय? ज०- भारताला आंतराष्ट्रीय जागतिक व्यवहारांत वागायचे आहे. एकलकोंडे रहाताच यायचे नाही. म्हणूनच जागतिक कालमापन (स्टँण्डर्ड टाइम) आणि सण्डे विकली हॉलिडे मानावाच लागतो. इस्लामी तुर्कस्तानांत सुद्धा केमाल पाशाने इस्लामी शुक्रवार बंद करून जागतिक रविवार चालू केला. स०- कॉलेजात मुले बिघडतात, खरे आहे काय? ज०- कोणी सांगितले हे तुम्हाला? मुले कुठेहि बिघडतात. त्यासाठी कॉलेजच कशाला? सूचनाः- बाकीच्या सवालांची बडदास्त पुढल्या बैठकीत. प्रस्तावनाः- पार्लमेण्टच्या वाचकांना मकर संक्रमणाचा तिळगूळ देऊन, गोड गोड बोला, अशी प्रार्थना करीत आहे. पार्लमेण्टच्या योजनेचे आणि बातमीदाराचे अभिनंदन करणारी कितीतरी पत्रे येतात. त्यातील नुसता सारांशच छापला तर एक अंक भरून निघेल. तरुण मंडळींची प्रश्न विचारण्याची जिज्ञासा वाढती आहे. त्यांचा हुरूप वाखाणण्यासारखा आहे. दर आठवडा नाही तरी दर पंधरवड्याला आपल्या वाचकांचे पार्लमेण्ट असावे, ही त्यांची मनिषा वाजवी आहे. आणि माझ्याविषयी म्हणाल, तर वयमानानुसार शारिरीष्ट प्रकृती यथातथाच मीहि हुरूपाने अनेक कामे अंगावर घेतो आणि मग ती पुरी पाडण्यासाटी झगडत बसतो. त्यामुळे नियमितपणाचे मुहूर्त सांभाळता येत नाहीत. खूप वाचावे, खूप बोलावे, हा स्वभावधर्म आजहि बलवत्तर असला तरी शरीर-स्वास्थ्यापुढे नेहमी हात टेकावे लागतात. माझ्या पार्लमेण्टच्या मेम्बरांनी हा मुद्दा सहानुभूतीने नजरेसमोर ठेवावा, ही विनंती. कित्येकांच्या प्रश्नांना जबाब मिळत नाही, अशी तक्रार आहे. जबाब देण्यात काही कुशलता लागते, तशी प्रश्न विचारण्यातहि लागते. पुष्कळ प्रश्नकांना ती अजून शिकायची आहे. ''माझी बायको माझ्याशी कां बोलत नाही?'' ''शाळा मास्तरांचे पगार सरकार कां वाढवीत नाही?'' ''धडधाकट कित्येक इसमांना कष्ट करून पोट भरण्याची विच्छा का नसते?'' असल्या प्रश्नांना मी काय उत्तर द्यावे, काही वेळा अनेकजण एकच मुद्याचा प्रश्न विचारतात. त्यापैकी एकाला जबाब दिला म्हणजे इतरांचे समाधान व्हायला हवे, राजकारणी अनेक पक्षांच्या लायकी नालायकीच्या ----- जबाब देण्याचे आता काही कारण उरले नाही. उरल्या सवालांच्या बडदास्तीकडे आता वळतो. --- ठाकरे. मुरलीधर सदाशिव साळुंखे, लोहारी. स०- दात निघालेल्या लहान मुलांस मृत्यू आल्यास ब्राम्हणादि पांढरपेषा समाजात तीं प्रेते पुरण्याऐवजी दहन करतात. कारण काय? ज०- स्मृति ग्रंथात तशी आज्ञा आहे. प्रेते दहन करणेच चांगले. मग ती लहानांची असोत वा मोठ्यांची असोत. अतिप्राचीन काळी उघड्या मैदानावर प्रेते टाकण्याची चाल होती. नंतर जसजसा आर्य जनांना शहाणपणा सुचत गेला तसतसा जमिनीत पुरण्याचा आणि नंतर अग्नये स्वाहा करण्याचा उत्तम मार्ग त्यांनी प्रचारात आणला. इराणी पारशी लोक आज विसाव्या शतकातही ५-६ हजार वर्षांपूर्वीचा कावळे गिधाडांना प्रेते अर्पण करण्याचा प्रघात ‘धर्म’ म्हणून चालवीत आहेत. हिंदु लोकांत पिंडाला कावळा शिवण्याची रूढी त्यांच्या एका काळच्या असल्याच प्रघाताचा अवशेष-स्मृति होय. फुला केशव ठाकुर, लोहारी बु।। स०- मुले वांचत नाहीत, असे म्हणणा-या लोकांना काही उपाय सुचवावेत. ज०- भलतीच मास्टरी तोहमत म्हणायची ही आंगारे धुपारे करण्यापेक्षा
विद्वान डाक्टराकडेच आपल्या केसीं नेल्या पाहिजेत. आत्माराम उखर्डू खंगार, लोहारी बु।। स०- यच्चायावत एकूणेक ---- समान संपत्तीचा वाटेकरी होऊ शकेल काय? परिणाम काय होईल? ज०- अशक्य समजा, अशक्य शक्य झालेच तर मानवी जीवनात काही अर्थच उरणार नाही. घनजी रावजी पाटील, लोहारी बु।। स०- हल्लीच्या परिस्थितीत (काही ---- का होई ना) कोठे कोणी गुलाम आहेत का? असल्यास ते कोणते? ज०- हिंदुस्थानातले सगळे नाक्षर आणि अल्पशिक्षित लोक आहेत. शारिरीक गुलामगिरीपेक्षा मानसिक गुलामगिरी फार भयंकर. स०- इंग्रेजी नि हिन्दी या दोहोंपैकी अधिक हितकर शिक्षण कोणत्या भाषेचे? ज०- अलबत इंग्रजी भाषेचे. इंग्रेजीच्या तुलनेने हिंदी दर्यामे ---- आहे. इंग्रेजीमुळें मनुष्य सर्व जगातल्या आधुनिक ज्ञानाचा आस्वाद घेऊ शकतो. इंग्रेजीला वगळून केवळ हिंदीच – मंडळी थोड्याच दिवसांत डबक्यातले बेडुंक बनतील. मुखत्यारसिंग देवसिंग पाटील, सारगांव ता. जामनेर. ‘सावधता’ प्रकरण हा शब्द चुकीचा आहे. ‘------’ असा तो हवा. इशारतीचे बोलता नये, जि० ओवीचा अर्थ स्पष्ट--- आणखी स्पष्ट तो काय करायचा? मनोहर उर्फ लक्ष्मण सपकाळे, सावदा. स०- सोशालिस्टांना दारुबंदी कां नको? ज०- सोशालिस्टानाच कशाला? कोणालाहि विचारवंतांना ----- नको. दारूबंदीच्या कायदेबाजीमुळे दारूचे व्यसन --- पूर्वी पीत नव्हते ते पीत आहेत. हातभट्टीच्या घरगुती दारूगाळणीला ऊत आला आहे. ही परिस्थिती बरी, का पूर्वीची बरी, हा विचार हितचिन्तकांना बेचैन करीत आहे. शिवाय, अनेकमुखी गुन्हेगारीला चेव चढला आहे. त्याचे मूळहि या मूर्खपणाच्या दारूबंदीतच आहे. स०- वाटेल त्याने राष्ट्रध्वज मोटारीवर किंवा कोठेंही वापरू नयें – सरकारी दण्डक असता, पु.--. चे एक पुढारी काँग्रेसवाले ---- वापरून प्रचार करीत होते. त्यांना कोणी हटक्ता दटक्ता नाहीं काय? ज०- काँग्रेसवाल्यांना सगळे खून माफ आहेत. स. पु. मोहिते, कोल्हापूर. स०- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर ------ काढणार असलेल्या बोलपटाविषयी आपला अंदाज काय आहे? ज०- मोठा गडबडाट झाला का पाऊस हमखास पडणार हा वाडवडलांचा इषारा लक्षात ठेवावा. भालजींच्या नियोजित बालपटात असे काही दिसणार नाही. तुकारामाला पाठवलेल्या आहेराची आणि दासाच्या राजकारणी शिकवणीची ---- कथा त्यात येणार---- नवीन इतिहास संशोधनाचे सिद्धांत भालजी आपल्या बोलपटात --- तर त्यांचा बोलपट ------------- ठरणार नाही, हे न समजण्याइतके भालजी महाशय बिनडोके नाहीत. ------ऐतिहासिक बोलपट काढण्याचा --- अजून इकडे उगवलेला नाही. मुरलीधर रोघो वायकोळे, फैजपूर. स०- काँग्रेसशिवाय इतर कोणत्याहि पक्षाला सरकार चालविण्याची ताकद नाही, या काँग्रेसवाद्यांच्या विधानात कितपत सत्य आहे? --- पक्षातले लोक तरूण म्हणून अनुभवशून्य, हा त्यांचा दावा खरा आहे--- ज०- काँग्रेसपार्टीच्या ---शिवाय सरकार चालवायला इतर ---- नसतील, तर धिःकार असो आमच्या त्या स्वातंत्र्याला स्वराज्याचा ------- शहामतीला! जर्मनीत नाझी पक्षाचे एकपार्टी सरकार --- करण्यासाठी हिटलरने असलाच दावा जर्मन जनतेपुढे मांडला होता. --- भविष्य काँग्रेसपार्टीच्या नव्या एकमुखी सरकारच्या कपाळी लिहिलेले – सगळ्यांच्या प्रत्ययाला येणार आहे. धोंडू तूकाराम पाटील, म्हसावद. स०- काँग्रेस सरकारने दारूबंदी केल्यामुळे नवरे आता --- बायकांना मारीत नाहीत? या काकासाहेब गाडगीळांच्या ---- घ्यायचा? दारूबंदी नाही त्या प्रांतात दारूडे नवरे बायकांना मारीत ---- असेच काकांना सुचवायचे असेल? ज०- काँग्रेसवाद्यांच्या तोंडातून काय बाहेर पडेल, याचा गावगटारानाहि --- लागणार नाही, मग बिचा-या मानवाची कथा काय? मोकाट ---- काँग्रेस पार्टीने आजवर जनतेच्या पदरात काय टाकले? --राम मोतीराम पाटील, भादली बु. स०- --- काळी भरपूर पैशाशिवाय सुख असणार नाही, असे --- पैसे मिळण्याची गुरुकिल्ली कोणती? ज०- आपण सुखाची व्याख्या काय केली आहे? पैशाच्या मुबलक --- डोलारा उभा असता, तर सारे श्रीमंतही सुखासाठी कशाला ---- सुख वगैरे शब्द नुसते शब्द आहेत. स०- या कलियुगात माणसाचे आयुष्य कमी झाले काय? या युगातला अवतार कोणता नि तो कितवा? ज०- कलियुगाचा आरंभ होऊन अवघी पाच वर्ष झाली. आयुष्य कमीझाले म्हणण्यात काय अर्थ? रेशनचे कदन्न खावून सगळे लोक ठाकठीक जगत आहेत. निवारा नाही,कपडा नाही, गुन्हेगारी बोकाळली, चो-यामा-या ----, खून पडत आहे, तर सरकारच्या मंत्रिमंदिरात अधिका-याचे खून पडताहेत, तरीहि कोटिकोटि जनता काँग्रेजी उमेदवारांच्या पेटीत ---- ढिगार ओतायला ठणठणीत जिवंत असता आयुष्य कमी झाले कसे म्हणता! आता अवताराविषयी म्हणाल, तर बरोबर – अवतारच --- ह्याची बिनचूक आकडेवार मोजदाद केन्सस वाल्याने ठेवलेली आहे. मुरलीधर कृष्णा पाटील, भादली बु।। स०- शेतकरी समाजात स्त्री-शिक्षण वावडे कां? ज०- पुरुष-शिक्षण तरी कुठें वावडे आहे? स०- आईची सर बायकोला येणे शक्य नाही, म्हणतात. खरे ना हे? ज०- कशी येणार? बायकोला आईपणा येत असला, तरी बायकोला आई कोण मानणार? ----- मधू चव्हाण, हिरापुर, ता. ४०गांव. स०- सत्यनारायण केल्यापासून हित अहित कोणते? ज०- भोळसट मनाचे पोकळ समाधान, यापेक्षां अधिक काही होत नाही. स०- देहातून आत्मा निघतो नि मग कोठे जातो? ज०- शैवांचा कैलासात, वैष्णवांचा वैकुण्ठात, टाळकुट-या वारक-यांचा ----आणि बाकीच्यांच्या आत्म्यांसाठी स्वर्ग पाताळाच्या सरहद्दीवर एक निर्वासितांची छावणी थाटलेली आहे. तेथल्या झोपड्यांत, असा पुराण---- निर्वाळा आहे. स०- -- स्वातंत्र्यामुळे आपल्याकडे ब्रम्हदेशे निर्माण होतील, असे -- वाटते? ज०- ब्रम्हदेवाची बरीच माहिती दिसते राव तुम्हाला. नवजवान कंपनी, रोझोदा, ता. रावेर. स०- पाकिस्तानी मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांची प्रतिती लक्षात घेऊन, हिंदूंनी मुसलमानांशी कसे वागावे? ज०- काही थोड्या व्यक्तींच्या ------ बद्दल सर्वच समाजावर ---------- पणाचे आहे. जगात कितीहि निरनिराळे धर्म अ सले, तरी -------- माणुसकी हा एकच धर्म पाळायचा आहे, ही जाणीव मुसलमानांप्रमाणे हिंदूंनाही शिकायची आहे. स०- देशातील काळा बाजार नि भांडवलशाही नष्ट करण्यासाठी जनतेने कोणत्या पक्षाला निवडून द्यावे? ज०- दुधाचे भांडे उलथले. आतां या भानगडी नष्ट होतात कां पुष्ट होतात, ते नुसते मुकाट्यानें पहायचे आहे. स०- काँग्रेसच्या राज्यात सायकलीपासून जकात बसली. कांही वस्तु विकायची, तर तेथेहि कर आहेच, मग माणसांवरहि कर बसणार काय? ज०- कां बसू नये? असेलहि. रामराज्यांत अशक्य काय आहे? विश्वनाथ डी. नेहेते, सावदा. स०- भारतात सर्वत्र शाळेतून लष्करी शिक्षण कां दिले जात नाही? ज०- शेल-फोर्स आत्मबळावर रामराज्य चालवणारे आपण अहिंसावादी. आपल्याला कशाला हवी ती तमोगुणी ---- हा --------? जोवर राज्यकारभारात ----- नि बेइमानीचे ----- आहे तोवर या शिक्षणाचा मुद्दा चुकून निघालाच तर त्याला ---- पडावें लागेल. स०- विधिमंडळासाठी मराठी चवथी शिकलेला माणूस उमेदवार उभा राहतो, तर तो ---- जनतेची गा-हाणी कशी मांडणार? ज०- जनतेची गा-हाणी मांडण्यासाठी लोक विधिमंडळात जातात, ही समजूतच आधी मूळ चूक. मराठी चवथीच कशाला? आंगठेबहाद्दर टोणपा निवडून गेला तरी रामराज्यांत चालतो. विधिमंडळात करावयाचे विधि ठरलेले असतात. आता तर काय? सगळे मंडळ काँग्रेसवाल्यांचेच आहे. विरोधाला कोणीहि नाही. म्होरक्याने ढोलके वाजवायचे आणि बाकीच्या नंदी बैलांनी व्हय व्हय म्हणून नुसत्या माना डुलवायच्या एवढे कर्म त्या मराठी चवथीवाल्याला साधणार नाहीं कां? स०- साधू संत समाजाला उत्कर्षाची प्रेरणा देवू शकतात काय? ज०- शकतात. पण असे संत फारच विरळा. बाकीचे सगळे भगताना अध्यात्माचे वेड लावून स्वतःचे पाय रगडून घेणारेच असतात. नामदेव लक्ष्मण चवाथे, भोजे, ता. पाचोरे. स०- ---- असणा-या व्यक्तीची मनोवृत्ती कशी असावी? ज०- ----- पर्वा न करता सत्यासाठी प्राणार्पण करणारी. स०- ब्राम्हणादि उच्चवर्णीय समजणा-या पांढरपेशा समाजांत विधवांचा पुनर्विवाह न करण्याच्या रुढीचे मर्म कशात आहे? ज०- त्या समाजाच्या राक्षसी मनोवृत्तीत. श्रीरंग कृष्णाजी वराडे, सुरवाडे. स०- लोकोत्तर विभूतींची चरित्रें आपण लिहिता. मग आमचे वडील संत तुकडोजी महाराजांचे चरित्र पुढेमागे लिहिणार आहात काय? ज०- आज श्री. गाडगा बाबांचे चरित्र लिहित आहे. कारण ते माझ्या सोशालिस्ट पिंड प्रकृतीला आकर्षिणारे आ हे. उद्या कोणाचे लिहिणार, किंवा मुळीच लिहिणार नाही, हे

या क्षणाब्ध सांगता येत नाही. सोपान पाचपांडे, तळवेल, ता. भुसावळ स०- तुकाराम ज्ञानेश्वर रामदास यांच्यासारखे संत साधू आज भारतात आहेत काय? ज०- हो हो तर. शेकडो आहेत. काँग्रेसची छावणी त्यांनीच भरलेली आहे. म्हणूनच लोकांनी त्यांना नुकतेच – निवडून नाही का दिले? बी. आर. तायडे. रावेर. स०- राजद्रोही चोर बंडखोर -- -- -- असतात. मग समाजद्रोह्यांना कां नसाव्या? ज०- समाजद्रोह्यांचे सरकार बनलेले नसले तर काय करणार? स०- नेहरुंचा समाजवाद आणि जयप्रकाशजींचा समाजवाद, यांत फरक कोणता? ज०- काँग्रेस आणि सोओशालिस्ट पक्षाइतका. स०- जादू आणि मोहिनी यांत फरक कोणता? त्यांवर तुमचा विश्वास आहे काय? ज०- विश्वास आहे तर. हातातली सरकारी नि पैशाची गंगाजळी ही जादू आणि निवडणुकीतल्या प्रचारांची बडबड ही मोहिनी. या दोन तंत्रानीच अखिल भारतात काँग्रेसपार्टी बिनविरोधी निवडून आली. हे आपण उघड्या डोळ्यांनी पहात असता, विश्वास कां न ठेवावा? दिगम्बर मे. चौधरी, अटरावलकर, जळगांव स०- पुणे मुंबई ----- --- कामगारांप्रमाणे इतर ठिकाणच्या – कामगारांची संघटना कां होत नाही? ज०- ते लोक १९व्या शतकात वावरणारे आहेत म्हणून २०व्या चालू शतकातल्या लोकांनी त्यांच्यासाठी हळहळण्याचे काही कारण नाही. रामकृष्णराव दौलतराव शेळके, राजूर ता. भुसावळ. स०- एका काळी हिंदुस्थानाला सुवर्णभुमि म्हणत असत, तसे आज कां म्हणत नाहीत? ज०- सिगारेट विडीचा धूर -------- सुवर्णभूमि कोण कसे म्हणणार? चालू युगात तो सुवर्णभूमीचा मान अमेरिकेकडे गेला आहे. म्हणून सोवियतखेरीज सारे जग अमेरिकेच्या मोठेपणाच्या --- ठुंब-या गाण्यात गर्क आहे. स०- बुद्धिजीवी नि श्रीमंत समाजातल्या तरुणींनी श्रमजीवी युवकांशी विवाह केले तर राष्ट्रीय जीवनात काय घडेल? ज०- काय घडणार? नवरा बायकोच्या जोड्या पडणार. आणखी कसलाहि कल्पांत होणार नाहीं. स०- आमचा हिन्दुस्थान ‘जोतिबा कालानंतर’ कोणत्या ज्ञानात पुढे गेला? ज०- जोतिबाच्या कालाचा नि प्रचंड हिन्दुस्थानाचा काही संबंध नाही. महाराष्ट्रापुरतेच म्हणाल तर, जोतिबानंतर तोंडपाटिलकीचे ज्ञान फार फैलावले. खाणे थोडे मचमच फार. महाराष्ट्रातले म-हाटे जोतिबाला लवकर विसरतील तर बरें होईल. स०- मनुष्याच्या सर्व उच्च गुणांना खाऊन टाकणारा कोणता अनिष्ट रोग आहे? ज०- आत्म--- प्रकाशचंद्र रतनलाल ---- स०- लेखणी श्रेष्ठ का तलवार श्रेष्ठ?---- श्रेष्ठ? देशी खेळ चांगले का विलायती खेळ चांगले? ज०- चालवून खेळून पहा म्हणजे खुलासा होईल. रामदास शंकर टिळके, सावदा. स०- हिन्दु धर्मात देवाला पाचच प्रदक्षणा का घालतात? ज०- पाचशें घालण्यापुरता वेळ नसतो, जगातल्या लबाड्या करायचा सोस मागे असतो ना? स०- देवपुजेचा मक्ता ब्राम्हणांकडेच का दिला जातो? ज०- देव मानवांतल्या दलालीचा मक्ता प्राचीन --- दिलेला असतो आणि अर्वाचीन शहाण्यांना त्यातले मर्म --- सूचनाः- प्यारेलाल सोनु गोहेल, लोनजे ----; चौधरी, चिनावळ; शांताराम दशरथ बि-हाडे, मेहूणवारे; पाटील, शिंदेवाडी; माधव बिच्छाराम पांडे, रोझोद; ---- पुढच्या बैठकीत सत्कार ठेवण्यात येईल. सीताराम मोतीराम पाटील, भादली बु. --- एकपाणी कॅलेण्डर बातमीदारात छापण्यासाठी मजकडे पाठविले आहे. संपादकाकडे आज ते पाठवीत आहे. याच ----- मुंबईच्या एका वृत्तपत्रात छापलेले आढळले. अभिनंदन. बक्षिसांचे काय झाले? तुमचे प्रश्न विचारणाना एक चांगले पुस्तक देण्याचे मी ठरवले होते त्याप्रमाणे ३-४ वाचकांना पुस्तके पाठविली. पण मध्यंतरी हा क्रम अजिबात नजरेआड झाला. एकाहाती अनेकविध कामे करावयाची. तेव्हा असे व्हावयाचेच! आता अशी योजना करतो. प्रत्येकाच्या नावापुढेच (बक्षिस) हा शब्द छापला जाईल आणि त्याला एकादे उत्तम पुस्तक बक्षिस गेले आहे, असे पार्लमेण्टच्या सभासदांनी बिनचूक समजून चालावे. यावर आणखी एक असा विचार डोकावतो. पार्लमेण्टचे सभासद आणि मी यांत आरसपारस विचारांची देवघेव व्हावी आणि दोघांच्याहि बुद्धिचा विकास व्हावा, या मूळ हेतूने चालू झाले व बक्षिसांच्या लालुचीने वाचक त्यांत भाग घेतात? हा प्रश्न ज्याने त्याने आपल्या मनाला विचारावा. मी जिज्ञासुपणाचा भोक्ता आहे. त्या एका आवडीतूनच हे नवे
इच्छाराम घांडे, रोझोदे. स०- सर्व धंद्यांत शेतीचा धंदा जर उत्तम, तर शेतक-यांना अनमोल उच्च स्थान कां नाही? ज०- उच्च म्हंजे किती उंच? स्थानमाहात्म्य टेपपट्टीने का मोजायचे असते? शेतकरी चांगला शिकला सवरला, त्याला स्वतंत्रपणे विचार करण्याची बौद्धिक ताकद आली का तो आपले स्थान आपोआप पटकावीलच, आजच्या अवस्थेत तो आहे तिथेच टिकला म्हणजे मिळवली राव. सध्या रामराज्याचा तडाका चालू आहे. ---- जगण्याचीच कोसीश करावी लागणार. स०- आमच्या रावेर तालुक्यांत शेळी म्हशी गाई मुबलक. सातपुड्याच्या शेजाराने चारा हवा पाणीहि मुबलक, मग दूध महाग कां विकले जाते? दुधात पाणी कां घातले जाते? ज०- अलीकडे माणुसकी हद्दपार झाली आहे, त्याचा परिणाम. स०- गरीबांपेक्षा श्रीमंत लोकच दुधात पाणी जास्त कां घालतात? ज०- सवयीचा परिणाम. गोरगरिबांच्या पिळून काढलेल्या रक्ताचेहि ते पाणीच करून आपले श्रीमंती वैभव रंगवतात. पाणी घातल्याशिवाय कशालाहि पाणीदारपणा येत नाही. शंकरलाल हिरालाल परदेशी, रावेर. स०- शटूकोड्यांचा छंद असणे म्हणजे भांडवल शाहीला उत्तेजन देणें नव्हे काय? ज०- या छंदाला लागलेली मंडळी जुगारखोर समजावी. भांडवलशाही परमेश्वराप्रमाणे सर्वत्र आहेच म्हणा. पण या शब्दकोड्यामुळें अनेक पिचक्या पाठवणा-या वृत्तपत्रांना टिकाव धरून जगायची सोय मात्र छान झाली आहे. स०- शंख जवळ बाळगण्यानें भाग्योदय होतों कां? ज०- शंख असतात तेच शंख जवळ बाळगतात, समानशीले व्यसनेषू सख्यम्. नारायण नथू चांदणे, रावेर. स०- शस्त्र आणि शास्त्र यांत श्रेष्ठ कोण नि कसा? ज०- शस्त्रापेक्षा शास्त्राला एक काना अधिक म्हणून शास्त्र श्रेष्ठ. स०- नीति आणि माणुसकी सध्या बुडत आहेत काय? ज०- छे छे दोघेहि सध्या हद्दपार आहेत. अंग्रेजी रामराज्य असे तोवर त्यांना माहेरी येता येणार नाही. रामदास शंकर टिळके, सावदा. स०- सत्याला अनुसरून वागणाराचा जगात प्रथम छळ कां होतो? ज०- कस लागण्यासाठी शंभर नंबरी सोन्यालाहि धगधगीत विस्तवात जाळून भाजून घ्यावे लागते ना? स०- शेतकरी कामकरी पक्षाने जनतेच्या हिताच्या आजवर कोणत्या गोष्टी केल्या? ज०- काँग्रेजी बैलांना भरपूर मते द्यायला शिकवले, हे काहीच काम नव्हे का? स०- या पक्षांत डावे ऊजवे गट ही काय भानगड आहे? ज०- भानगड बिनगड कांही नाही. पुढारी कुणी व्हायचं? तु का मी? तेवढ्यासाठी चाललेली ही एक सर्कसवजा कसरत असते आणि ती बिनतिकिटानी गावोगाव सगळ्यांना ‘फुक्कट’ पहायला मिळते. रा. दु. बोंडे, चिनावल. स०- सत्ता चालू आहे म्हणतात ती खरी लोकशाही, हा सत्ताबाज नि भांडवलबाजांची कुलमुख्यारी, खरे काय? भारतात निर्भेळ लोकशाही कधिकाळी स्थापन होईल काय? ज०- सध्याच्या लोकशाहीचे रूप तुम्ही बिनचूक हुडकलेच आहे. लोकांच्या हातात म्हणजे लोकपक्षीय प्रतिनिधींच्या हाती सत्ता येईल त्या दिवशी लोकशाहीची पहाट उजाडेल. आज सगळीकडे अंधारच अंधार. नथू तानाजी सुकाळे आणि मित्रमंडळ, शेलवड. स०- अमेरिकेप्रमाणेच सोवियत रशियाशी आपले सरकार हातमिळवणी कां करीत नाही? ज०- करील की, सध्या मुंबईला भरलेल्या आंतरराष्ट्रीय औद्योगीक प्रदर्शनात सोवियत रशियाच्या दालनाने सरकाराप्रमाणेच हिंदी जनतेचेहि लक्ष्य वेधून घेतलेले आहेच, आजसुद्धा रशियाशी आमचा बेबनाव थोडात आहे? दोस्तीच आहे. उद्या या प्रदर्शनाने व्यापार वाढला की होईल हातमिळवणी घट्ट नि दाट. स०- माणूस चोरी करण्याकडे कां वळतो? ज०- याला कारण घरची वागणूक आणि दारची शिकवणूक. स०- अेकाद्याला मुलगा झाला म्हणजे आनंद होतो आणि मुलगी झाली का वाकडे तोंड करतो, कां? ज०- मुलाच्या हातात हुंड्याचे घबाड मिळते आणि मुलीच्या लग्नात देण द्यावे लागते म्हणून. स०- वज्रासनाच्या प्रयोगाने मनुष्य जिवंत राहू शकतो काय ज०- मरे तोवर खास जिवंत राहू शकतो. स०- दैवी संपत्ति श्रेष्ठ का आसुरी संपत्ति श्रेष्ठ? ज०- सध्या कागदी नोटांची संपत्ति चालू असल्यामुळे, या दोन संपत्त्या बेचलनी ठरल्या आहेत. सीताराम मोतीराम पाटील, भादली बु।। इषारा – छे छे सीतारामभाऊ, अहो लोक काय वाटेल तेबोलले तरी त्यांचो कोणी मनावर का घेतात? ---- लोकांना टिंगलीचा व्यापार छान साधतो. करू द्या त्यांना की. पण तुम्ही एकदम लोकव्यवहाराकडे पहाण्याच्या चष्म्याचे भिंग बदलण्याचे कारण नाही. ‘नथिंग इज इम्पासिबल फॉर ए मॅन इन धिस वर्ल्ड’ ही नेपोलियनची उक्ती हल्ली तुम्हाला पटत नाही? बरोबर बरोबर. कोठे नेपोलियन नि कोठे तुम्ही! स्वतः आशावादी असल्याशिवाय जगात आशा कोठेच दिसणार नाही. जसा ध्वनि तसा प्रतिध्वनि. बाबू नेहेते, सावदा स०- खानदेशी भाऊ सुधारणेत मागे आहेत, अशी आपली समजूत आहे काय? ज०- सुधारणेत पुढे आहेत, अशी खात्री पटल्यावर ‘थँक्यू’ म्हणायला मी तात्काळ पुढे होईन, ही पण खात्री ठेवा. स०- आधुनिक हिंदुस्थानला तंत्र-युग तारक का मारक? ज०- खात्रीने तारक, मंत्रयुगाचा नि तंत्रयुगाचा महिमा आज खोल गाडला गेला आहे. मंत्रातंत्राच्या नादी लागणारे लोक जिवंत असूनिहि मेले समजावे. स०- प्रेम आणि ज्ञान या जोडीपैकी आपण कोणते अधिक पसंत कराल? ज०- ज्ञानावर प्रेम करणारा माणूस ---- लक्ष्मणकुमार चौगुले, मच्छे, बेळगांव. स०- पंचवार्षिक योजनेचे वैशिष्ट्य काय? ज०- आसेतुरामेश्वराला विळखा घालणारी ती योजना आणि दोन चार ओळीत मी कसा खुलासा करणार? वृत्तपत्रांचे कलम भरभरून येताहेत ते पहा. स०- प्रत्येक मासिकावर नखरेदार स्त्रीचे चित्र हमखास असतेच---- काय हेतू असतो? ज०- मासिकातल्या विषयाचे नसले तरी त्या नखरेल मुखड्याच्या आकर्षणाने तरी लोकांनी मासिकाचा अंक विकत घ्यावा, एवढाच. स०- नेहरूंचे हात बळकट करण्यासाठी नाशिकचे परमिट-गोविंद निवडून आले. आता -- ज०- परमिट-गोविंदच कशाला? वलसाडची थप्पड खाऊन चारीमुंडे चीत झालेले मोरारजीभाईबि ममईचं पंतपरधान व्हनारच व्हनार. याला म्हणतात सर्वोदयी लोकशाही! तिथं कायदा नि घटना बसल्या धाब्यावर! अहो, कायदा गाढव असला तरी त्या गाढवाचे बाप आपण माणसेच ना? करणारे आपण नि बदलणारेहि आपणच. विश्वनाथ डी. नेहेते, सावदा स०- अमेरिका भारताला जे कर्ज देणार -------- काय असावा? ज०- युनिवर्सल ब्रदरहूड. अमेरिकेत कर्णांचे पीक अमाप येत असते आणि आमच्याकडे लंबकर्णांची पैदास फार आहे. स०- भारतीय जनतेला लायक उमेदवार कां निवडता येत नाहीत? ज०- निवडणुकीची भानगडच त्यांच्या आजवरच्या पिंडप्रकृतीला न्यारी आहे म्हणून. कृष्ण गिरधर महाजन, मु. अंजाळे स०- काय करून दाखवले आजवर समाजवादी पक्षाने? असे काही लोक उपहासाने बोलतात. त्यात काय तथ्यांश आहे? ज०- समाजवादी पक्ष अधिकांश मतांच्या संख्येनें पराभूत झाला आणि त्याला पराभूत करायला काँग्रेसश्रेष्ठींना अखेर --- सांचे सहाय्य घ्यायला लागले, हे काय थोडे झाले? स०- शकुनांवर विश्वास ठेवावा का ठेवू नये? ज०- ठेवणे न ठेवणे हा व्यक्तीच्या बुद्धीच्या लांबी रुंदीचा नि खोलीचा मुद्दा आहे. भोळसट लोकच शकुनांवर विश्वास ठेवतात. स०- वक्त्याच्या पोषाखावरून श्रोत्यांच्या मनांवर बरावाईट परिणाम होत असतो काय? ज०- ठरावीक ---- कपडे घातलेले वक्ते पुष्कळ वेळा गंडे-या खातात आणि चिंध्याधारी गाडगेबुवा --- श्रोत्यांना ४-४ तास रंजवतात. पोषाखाचा मुद्दा फारसा सिद्धांताने स्वीकारण्यासारखा नाही. स०- हिंदुधर्मात मांसाहार वर्ज्य (निषिद्ध) मानला आहे काय? ज०- मुळीच नाही. वैदिक धर्माचा श्रीगणेशाच मुळी पशुहत्येने काढलेला. – धर्माच्या गचांडीमुळेच वैदिकांनी तात्पुरती तडजोड म्हणून अहिंसेचे तत्व मानले. स०- भारतात मांस-विक्रीचा व्यवसाय --- करणे श्रेयस्कर होईल काय? ज०- दारुबंदीने निर्माण केलेल्या ---- भयंकर प्रकार मात्र बोकाळतील. श्री. तु. महाजन (मॅटर नीट दिसत नाही.) रामदास माधव शेठ, नदगांव स०- मच्छर माणसाच्या कानांजवळच कां गुणगुणतात? ज०- अरे वाईट संगीत ऐकण्याचे काम माणसाचे कानच करतात म्हणून. स०- हिंदुकोड विल म्हणजे काय? हे खेड्यातील लोकांना समजावून सांगाल काय? ज०- या विलविषयी सरकारने छापलेले मराठी पुस्तक ---- प्रिंटिंग प्रेस, चर्नीरोड, मुंबई नं. ४ येथे विकत मिळते ते ---- वाचून पहावे. अथवा, हिंदु धर्मनिर्णय मण्डळ, लोनावळा, ---- यांच्याकडून या विलविषयी सांर्पत माहिती देणारी पुस्तके ---- फार
उपयुक्त आहेत. कुसुमावति, सावदा. स०- आजची सुशिक्षित स्त्री सुसंस्कृत असू शकते काय? ज०- सोनचाफ्याच्या फुलाला वास येऊ शकतो काय? स०- स्त्रियांना समान हक्काचा कायदा असतानाहि तो अंमलात का येऊ शकत नाही? ज०- पुढ्यात भरले ताट वाढले तरी खाण्याची अक्कल ---- दिलेले हक्क उपभोगायला स्त्रियांनाही हिंमत लागतेच. स०- आजचे स्त्रीशिक्षण योग्य आहे का त्यात बदल झाला ---- ज०- कर्वे युनिवर्सिटीचा शिक्षणक्रमच योग्य दिसतो. स०- स्त्रियांना पार्ट टाईम सर्विस करण्याची सवलत कां ---- ज०- मुंबईला पार्ट टाईम नि फुल-टाईम दोनीहि सर्विस मिळतात. सावदाला दोनीचीहि वानवा. वा. रा. नातू, फुरसुंगी, पुणें. स०- ईश्वर सृष्टी निर्माण करतो आणि तिचा संहारहि ---- संहारच करायचा तर निर्माण केलीच कशाला? ज०- ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीचा संहार मनुष्य ----- सध्या निरनिराळ्या सु-संस्कृत ---- काय चालले ते पहाना. स०- तुम्हाला पैसा हवासा वाटतो काय? ज०- मला पुष्कळ हवासा वाटला तरी पैशाला मी कुठे हवासा वाटतो? स०- आपला भारत सुजला सुफला कधि होईल? --- माणसाचे येथले जिणे सुखाचे नि शांतीचे कधि होईल? ज०- जेव्हा सामान्य माणसांचे --- प्रतिनिधित्व – राजकारणी पार्टी ------- ऑर्डर ऑर्डर (१) आडगांवचे आपले सभासद श्री. -------- यांचा ता. १५-२-५२ रोजी बोरखेडे येथे विवाह झाला. मला आणि पार्लमेंण्टच्या सर्व मेंबराना त्याचे निमंत्रण आले होते. आमचे सर्वांचे वर-वधूला शुभाशिर्वाद. (२) रिप्लाय कार्ड किंवा तिकिटे पाठवून प्रश्नाचे किंवा इतर तज्जन्य मुद्यांचे खुलासे कित्येकांनी परस्पर मागवण्याचा यत्न केलेला आहे. ही थेट (डिरेक्ट) पत्रव्यवहाराची ------ मला जमणार नाही. मी उत्तर देणार नाहीं. दिलगीर आहे. योग्य प्रश्नाची योग्य उत्तरे पार्लमेण्ट सदरांत उघड मिळतील. बाकीचे प्रश्न विचारातहि घेण्याचे कारण नाही. वरहि वरायास पाहिजे समज, या मोरोपंतोक्तीप्रमाणे प्रश्न विचारण्यातहि कुशलता लागते. हिंदु धर्म म्हणजे काय? महानुभाव पंथाचा इतिहास द्या? गेल्या साली अमेरिकेतून किती धान्य आले? कम्युनिझमचा इतिहास सांगा. असल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची कशी? ते काय दोन चार ओळींचे काम आहे? पार्लमेण्टचे सदर विस्तृत प्रवचनाचे व्यासपीठ बनवायचे नाही. पृच्छक एकाद्या विषयाचा अभ्यासक आहे आणि त्या अभ्यासात त्याला शंका आल्या, तर ---चाच सवाल होऊ शकतो. --- ठाकरे. एक शिक्षक, फत्तेपूर, ता. जामनेर. स०- मुलांना किंचितहि शारिरीक शिक्षा, निदान धाकासाठी द्यायची नाही, या कायद्याचा मुलांच्या शिस्तपालनावर काही परिणाम --- आहे काय? छडी लागे छमछम् नि विद्या येई घमघम् या म्हणीत काही तथ्यांश होता काय? ज०- अगदी कोमल बालवयात म्हणजे किंडर्गटन पद्धतीचे शिक्षण चालू असता, धाकाच्या ऐवजी गोडीगुलाबी अगत्य हवी. मूल ६ वर्षांचे झाल्यावर त्याच्यात मानवी स्वभावात मूलभूत असलेले पशुत्व जागे होते. तेव्हा छडीचा प्रथम दुरून नंतर प्रत्यक्ष धाक दिला नाही तर मुल शिस्तीच्या आवाक्याबाहेर जाते, असा अनुभव आहे. छडी लागे छमछम् पद्धतीच्या पुरस्कर्त्यांना परवा राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ‘सनातनी’ अशी शिवी हासडली आहे. कसलाच काही धाक गेली ३०-३५ वर्षे नाही, शिक्षणखात्याने हळूवारपणे लाडीगोडी लावून मुलांतले देवत्व जागे करण्याचा तेवढा आटापिटा केला, मग सगळ्या शाळा हायस्कुले नि कॉलेजे गुंडपुंडांनी कां गजबजली? या प्रश्नाचा या उत्तुंगशिखरी --- फारसा विचार केलेला दिसत नाही. मानवांत पशुत्वाचा अंशच असतो, असे या सज्जन पंडितांचे म्हणणे दिसते. मी म्हणतो ते चूक आहे. धाकाशिवाय पशुत्वाला आळा बसतच नाही. स०- चालू परिक्षा घेण्याची पद्धति योग्य का अयोग्य? ज०- ४ मार्काने नापास नि ६ मार्काने नापास ठरविणारी कारकुनी पद्धतीची परीक्षा नादानपणाची आहे. मूळ शिक्षणच जेथे धोबीघाटी बनले आहे, तेथे परीक्षा म्हणजे मंगलोरी कौलांची गिरणी बनल्यास नवल कशाचे? शिक्षण क्षेत्रात क्रांति घडवणारे एकादे मोठे बण्डच झाले पाहिजे. बी. आर. तायडे, रावेर. स०- तुमच्या मते अस्पृश्यतेची उपपत्ति सांगा? ज०- वैदिकांच्या वर्चस्वासाठी
बोद्ध धर्मचा पाडाव करताना आद्य शंकराचार्यांनी कट्टर बुद्धानुयायांची जी ससेहोलपट केली, त्यातून अस्पृश्यता निर्माण झालेली आहे. बॅ. मूकर्जी नि ठाकरे कृत ‘हिंदुजनांचा –हास आणि अधःपात’ या पुस्तकात ही माहिती तपशीलवार दिलेली आहे. स०- जीवनाचे खरे रहस्य कशात असते? ज०- कोणत्याहि क्षेत्रात गाजवलेल्या कर्तबगारीची गोड फळे प्रथम इतराना चारून मग आपण खाण्यात. स०- पाप नि पुण्य कशाला म्हणतात? ज०- पुष्कळांचे पुष्कळ सुख साधणारे ते पुण्य आणि त्या सुखाला बाधणारे ते पाप. स०- संसार सुखाचा कसा होऊ शकेल? ज०- पतिपत्नि ही संसार-शकटाची दोनीहि चाके एकजिनशी एकदिलाची असतील तेव्हा. स०- महानुभाव पंथ कसा निर्माण झाले? त्यांची तत्वे कोणती? ज०- कै० विनायक लक्ष्मण भावेकृत महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथात सगळी माहिती मिळेल. अलिकडे हा ग्रंथ पुनर्मुद्रीत झाला असून किं.२० रु. आहे. स्थानिक ग्रंथालयाला मागवायला सांगून वाचा. दामूअण्णा, साळुंखे, ठाकून वगैरे, लोहारी बु० स०- रामराज्याचा अर्थ काय? ज०- ठरावीक गटबाजांची पुरणपोळी, बाकीच्या शंबूकांची होळी. स०- आपण भारतवासी सारे एकच, मग मत मतांतरांचा एवढा गोंधळ का? ज०- एकमत्या समाज जगात कोठेहि आढळायचा नाही. मत मतांतरे ही समाजाच्या जिवंतपणाची निशाणी आहे. स०- हुंडा देज पद्धतीच्या रोगावर अत्यंत शीघ्र गुणकारी औषध कोणते? ज०- असल्या भाडखाऊ लग्नावर समाजानी नि गावक-य़ानी एकजूट बहिष्कार घालावा. त्या लग्नाला कोणी जाऊच नये. छी थू करावी. समाजात मान्यता देऊ नये. स०- प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमान किती असावा? ज०- अभिमान मापण्याचे अभिमानी मीटर अझून निघाले नाही. स०- मकर संक्रांत आणि जानेवारी ची १४ तारीख एकाच दिवशी येण्याचे कारण काय? ज०- कां बरं टिळक पंचांगात ती १०-११-१२ अशीहि आलेली आहे. आकडमोड्या गणित्यांच्या कचाट्यातल्या या भानगडी, काही वर्षांनी म्हणे १४ ची १५ होणार आहे. आपण आपले एकमेकांना तीळगूळ देऊ नि गोड बोला म्हणू, झालं. स०- ग्रहदशेवर मानवी दुर्दशा अवलंबून असते, यातले सत्य काय? ज०- ज्योतिष हे मुळी शास्त्रच नव्हे. पोटभरू लफंग्यानी लोकांचे मानसिक दास्य वाढवून त्यावर पोळी भाजण्याचा चालवलेला हा एक धंदा आहे. हिरामण चव्हण, हिरापूर ता. ४० गांव स०- माणूस आजारी पडला का जंगल्या भगत सांगतो, याला ‘बाहेरचे’ आहे. भूत पिशाच्चांच्या या भानगडी ख-या आहेत काय? ज०- हो हो तर. गावोगावचे जंगले भगत, आंगात देव खेळवणारे हेच मूर्तिमंत भूत पिशाच्चे आहेत. त्यांची कोणी रट्टे मारून झाडणी केली का मग मात्र आचा-याचा आजार कोणता, हे वैद्य डॉक्टराला बिनचूक सांगता येते, उपचारहि करता येतो. स०- दगडाच्या देवापासून निष्पन्न काय? ज०- एकरकमी दगडधोंडे. स०- छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरू कोण? संत तुकाराम का समर्थ रामदास? ज०- दोघांचाहि शिवाजीच्या गुरत्वाशी काडीचाहि संबंध नाही. शिवाजीच्या प्राथमिक खटपटी नुकत्याचे कोठे आकाराला येत असतानाच तुकाराम महाराज बेपत्ता झाले. तुकाराम नाटकात आणि बोलपटात शिवाजी-तुकाराम-भेटीचे रंगवलेले प्रसंग अज्जीबात काल्पनीक म्हणून अक्षरशः खोटे, रामदासाची नि शिवाजीची भेट तर सन १६७२ च्या पूर्वी चुकूनहि एकदा झालेली नाहीं. स०- तुकाराम श्रेष्ठ का रामदास श्रेष्ठ? ज०- आपापल्यापरी दोघेही श्रेष्ठच. रघुनाथ संपत शेळके, राजूर. स०- काँग्रेसचे अगदी आरेभीचे स्वरूप कसे होते? ज०- खेड्यातल्या शाळेच्या बक्षिस समारंभासारखे. मनोहर उर्फ लक्ष्मण सपकाळे, सावदा. [Please do not left any question unanswered आपल्या तीन पत्रांत आपण मुद्दाम लिहिलेले इंग्रेजी वाक्य पाहून हायस्कुलाची मला दया आली.] स०- विवाहित स्त्रियांनी नोकरी करावी काय? ज०- अहो करीत आहेतच ना आज? कोठे काय बिघडले? माझी एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनहि मुली हापिसात जातात. स०- पोलिस खात्यातील सर्वच अधिकारी व्यसनी कां असतात? ज०- कुठे पाहिले हे तुम्ही? खोटा आहे हा भ्रम. उडदामाजी काळे गोरे असतातच. अपवाद म्हणजे सामान्य नियम कसा होऊ

शकतो? स०- वृत्तपत्रे समाजाचे शाप का वरदान? ज०- विस्तवाने स्वयंपाक करता येतो नि आगहि लावता येते. तुमचा अनुभव काय आहे? स०- हिंदुस्थान हे खरेखुरे निधर्मी राष्ट्र आहे काय? ज०- निधर्मी राष्ट्र एक काँग्रेजी थोतांड आहे. सध्या मात्र भारत एकधर्मी आहे आणि तो एकच धर्म म्हणजे पंचखंड दुनियेतली आमची अन्नधान्यासाठी भीक दे ग माय जोगवा, हे आजे आमचे नॅशनल स्लोगन आहे. काँग्रेस झिंदाबाद! स०- हल्लीचे बहुतेक विद्यार्थी शरिराने किडकिडीत असण्याचे कारण काय! ज०- स्वतावरून इतरांची परीक्षा करू नका. हुतुंतू क्रिकेट इत्यादि शालेय खेळांत विजय मिळवतात ते काय अवचित आकाशातून पडतात? जगन्नाथ मोतीराम पाटील, वडली, पो. म्हसावद. स०- लग्नप्रसंगी वधूकडच्या स्त्रीच्या वरपक्षाच्या स्त्रीया वरपक्षाच्या लोकाना शिव्या देतात, अशी वहिवाट काही समाजात आहे. ज०- गांवढळ आहेत ते समाज. त्यातली नवी पिढी शिकली सवरली तर बंद पाडतील या रानटी रूढीला. स०- धर्म बुडाला, धर्म बुडाला, या सनातन्यांच्या ओरड्यातला त्यांचा धर्म कोणता? ज०- त्या धर्माचे नाव शेण्डी-जानवे-पोट-धर्म. धर्म बुडाला हा ऐतखाऊ भटांचा बारामास शिमगा! माधव ईच्छाराम धांडे, रोझोदे. स०- श्रीमंतांच्या श्वानालाहि लोक मान देतात. कुत्र्याला जवळ घेऊन खायला घालतात. पण त्याच वेळी एकादा भुकेला भिकारी दाराशी आला तर त्याला शिवीगाळ करून हुसकावतात, या प्रकाराला काय म्हणावे? ज०- त्याला सनातन हिंदु धर्म असे म्हणावे, माणुसकीचा धर्म अजून उजडायचा आहे राव. स०- काँग्रेसविरुद्ध सगळीकडे विरोधाचे तुफान चाललेले असतांहि काँग्रेसपक्षाचे लोक एकजात सर्वत्र निवडून येतात, याचे मर्म कोठे आहे? ज०- मतदान पेट्यांच्या जादूगिरीत, बलसाडच्या संडासांत, आणि दर मताला ५ रुपये लिलावात. स०- एक गरीब विद्यार्थी आहे. पैसा नाहीं जवळ. खूप शिकावेसे वाटते. भीक मागितली तरीही काम भागत नाही. काय करावे त्याने? ज०- भीक? छे! काहीतरी हुन्नर आंगा असेल तर उद्योग करावा. बिनभांडवली धंदे पुष्कळ आहेत. अल्प वयात अशाच परिस्थितीत लोकांच्या नावांच्या पाट्या रंगवून, बुक बायडिंग करून, मी १० माणसांचे कुटुंब पोसून अभ्यास केलेला आहे. राजाराम बारकू पाटील, मोरफळ ता. पारोळे. स०- १७ व्या शतकात मुसलमानानी पळवुन नेलेल्या स्त्रियांचे शिवाजी महाराजांनी रक्षण केले. चालू जमान्यात हिन्दु स्त्रिया (स्वखुषीने म्हणा वा पैशाच्या लालचीने म्हणा) मुसलमान घरात नांदत असताना दिसतात. यावर काहीच का इलाज नाही? ज०- धर्मातीतपणाने पाहिले तर असला प्रश्नच उद्भवत नाही. जिला जिकडे गोडी तिकडची चढली ती माडी. --- पंजाबी धामधुमी सारखा प्रळ्याचा मुद्दा बाजूला ठेवून निस्पृह---- केला तर एरवी हिन्दु स्त्रिया मुसलमानांचा हात धरून जातात --- याचा हिन्दूनीच विचार केला पाहिजे. येथल्यापेक्षा तेथे त्यांना जास्त सुख लाभत असल्यास, त्यांनी कां न जावे? ‘शिवाजीने रक्षण ---’ वगैरे भाषा दुरून डोंगर साजरे न्यायाची आहे. अनुभव असा --- मुसलमानाच्या घरात गेलेली हिन्दु स्त्री आपखुषीने सहसा ---- नाही. मग मुसलमान स्त्री हिन्दुकडे येईलच कशाला? सोनू दलपत काळ, जळगांव स०- महात्मा गांधी नि सहावे जॉर्ज यांची थोडक्यात तुलना --- ज०- गांधीजी फकीर तर जॉर्ज अमीर. स०- पूर्वीच्या नि आताच्या लग्नपद्धतीत फरक कोणता? ज०- काही फरक नाही. शांताकारं भुजगशयनं म्हणूनच --- म्हणतात नि व-हाडी शुभमंगल सावधान ओरडतात. स०- मुंबईत पहाण्यासारखी स्थळे कोणती? ज०- प्रबोधनकार ठाकरे रहातात ती जोशी बिल्डिंग. नरेंद्र बाबू, तळवेल. स०- काही, हल्ली कीर्तनकार आधी जेवतात नि मग कीर्तनाला उभे राहतात, असे कां व्हावे? ज०- अन्न म्हणजे परब्रम्ह, ते पोटांत चांगले भरपूर --- शिवाय कीर्तनातले ब्रम्ह बाहेर येत नाही म्हणून. जेवणाचा नी कीर्तनाचा संबंधच काय मुळी? स०- सूतकाम वीणकाम यंत्राने जलद नि उत्तम होत --- सरकारचा हातवीण कामाचा आग्रह कां? ज०- गांधीबुवानी एकदां तसा प्रचार केला म्हणून. गांधीजींना इतर काही साधले नाहीं, तरी या
एका मुद्यापुरती तोंडपाटिलकी --- कायदेबाजी करायला काँग्रेजी सत्ताधारी गणंगांचे तीन चव्वल --- खर्चतात? स०- हल्ली देव आहे का नाही? ज०- होय आहे तर. मूळ मुक्काम सासवडला असतो. --- कडु बदाम खात सगळीकडे भटकत असतात. कृष्ण गिरधर महाजन, सावदा. स०- काँग्रेस राजवटीपेक्षा ब्रिटीश राजवट चांगली होती, असे पुष्कळ लोक म्हणू लागले आहेत, याचे कारण काय? ज०- गेल्या पांच वर्षातली काँग्रेसपार्टीची राज्यकतृत्वाची ---- नालायकी. स०- जीवनाकडे उपभोगाच्या दृष्टीने पहावे का उपयोगाच्या --? ज०- स०- मरावे परी कीर्तिरूपे उरावे, असे संतवचन असतां, पुष्कळ महाभाग प्रसिद्धी-परांग्मुख रहाण्याचा अट्टाहास करतात. ही विसंगति नव्हे का? ज०- प्रसिद्धी-परांग्मुखांचीच किर्ति अजरामर होते. पायांचे --- बसवून घेणा-या दगडांच्या नावांवर कावळे कुत्री अभिषेक करतात. विश्वनाथ डी नेहेते, सावदा. स०- समाजवाद हा जर आजचा युगधर्म, तर त्याची सविस्तर माहिती देणारी मराठी पुस्तके कां नाहीत? ज०- कोणी सांगितलं नाहीत म्हणून? लहान मोठी रगड आहेत. पण सार्वजनिक वाचनालयांना ती विकत घेऊन जनतेला उपलब्ध करण्याची बुद्धि नाही. त्यांचा भर कादंब-या नि रहस्यकथांवर, सोशालिस्ट वाङमय मागवण्याचा पत्ता०- लोकप्रकाशन गृह, राजभुवन, सँण्डर्स्ट रोड, मुंबई ४ आणि स. ह. मोडक, लोकसाहित्य, ८७, शिवाजी पार्क, मुंबई २८. स०- कम्युनिष्ठ चळवळीला भारताने अधिष्ठान देणे म्हणजे........ ज०- अहो, कसले अधिष्ठान घेऊन बसलात राव, काँग्रेजी अमलाखालचा आजचा भारत म्हणजे बिनबुडाचा बनला आहे द्रोण. स्वताचे बूड सावरल्यावर अधिष्ठानाच्या गोष्टी. स०- कम्युनिष्टांचे सडेतोड कार्य समाजवाद किंवा सर्वोदय करू शकणार नाही का? ज०- सडेतोड म्हणजे काय? कम्युनिझम हा सुद्धा एक समाजवादच आहे. वाद आहे तो हिंदी कम्युनिष्ट चळवळ्यांचा (सडेतोड नव्हे) मोडतोड्या घातपाती पद्धतीबद्दल. सर्वोदय ही न्यारीच भानगड. तिच्यात समाज नाही, माज नाही, फक्त कसल्या तरी गांधाळ फिसाटाची खाज मात्र रगड आहे. स०- शिवाजीसारख्या राष्ट्रपुरुषाचा उत्सव काँग्रेस करीत नाही. तर मग उद्या गांधीजींची पुण्यतिथी तरी चालू ठेवतील का नाही? ज०- विठोबाच्या नावावर जसे वारकरी, तसे गांधीजींच्या नावावर काँग्रेसवाले मनमुराद हव्या त्या कुरणात चरत आहेत. गांधीभजना वाचून त्यांचे चालणार कसे? भास्कर महारू पाटील, सावदा. स०- मॅट्रिक किंवा ट्रेण्ड झाल्यावर गरीब विद्यार्थ्याने काय करावे? ज०- त्या परीक्षा द्यायच्या कशाला, हेच ज्याला उमगत नाही, त्याने खुशाल स्टेशनावर हमाली करावी. हे गरिबीचे फॅड काय आहे? व्यवहारात गरिबांसाठी स्पेशल सवलती नसतात. स०- पिढीजात विणकरापेक्षा पुस्तका ज्ञान मिळवलेला बेसिक तज्ञ (ट्रेण्ड) विणकामात अधिक वाकबगार ठरेल काय? ज०- तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, पुस्तकी पंडिताचे काम नोहे. स०- सरकारी कायदा निघाल्यापुसून गोरगरिबांचा फायदा झाला का तोटा? ज०- ऋणको घनकोच्या कोर्टातल्या मासळीबाजारी कोलाहलात नीटसे काही ऐकू येत नाही. स०- सुशिक्षित स्त्रियांनी आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या पुरुषांशी लग्नसंबंध जोडणे हितावह होईल काय? ज०- सुशिक्षित हे काय लचांड आहे? नुसते शिक्षित म्हणा. सगळेच शिक्षित म्हणजे शिकलेले सुशिक्षित असतात, असे अजून तरी दिसत नाही. असो, लग्न शिक्षणाशी करायचे का पुरुषाशी करायचे? पदवीधर नवरा आणि चार-बुकी बायको यांचे संसार हिताचे होतात तर पदवीधर बायको नि मराठी सहा-बुक्या नवरा यांचे कुठे काय अडणार? शिक्षणाचे चोचले माजवणा-या कित्येक बाया चाळीशी उलटल्यावर केसाना कलप लावून हव्या त्या दर्जाच्या तिजवराच्या गळ्यात माळ घालून आज मिटल्या तोंडी संसार करीत आहेत. नथू तानाजी सुकाळे, मित्र मंडळ शेलवड. स०- ब्राम्हण विधवेच्या केशवपनाची उपपत्ति काय? ज०- बौद्ध धर्माने प्रचलित केलेल्या घाणेरड्या रूढीचा --- अवशेष आता बराच नाहीसा झाला आहे. स०- पुरुष स्त्रियांच्या विवाहाच्या वयोमर्यादा कोणत्या? --- वर्षाची मुलगी नि ४० वर्षाचा नवरा यांचा विवाह व्हावा काय? ज०- तरुणाने २५ वर्षे आणि तरुणीने १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाहाचा विचारच करू नये. नवरा बायकोत निदान १० वर्षांचे अंतर असावे. बारा-चाळिशी
विवाहय त्याज्य. होत असेल तर त्याला ---वंतानी विरोध करावा. य़शवंत, चिनावल. (प्रत्येक पत्रात संपूर्ण नाव नसेल तर त्याचा विचार होणार नाही.) स०- हिंदू धर्मात शेंडी कां ठेवतात? ज०- तो धर्म बुडू नये म्हणून. शहरात शेण्डीचे उच्चाटन झाल्यामुळे तेथे धर्म सफाई बुडाला. खेड्यापाड्यात शेण्डीची प्रश्नचिन्हे --- आहेत म्हणून धर्माची वळवळ तिथे फार. स०- मेलेल्या असामीला यम घेऊन जातो, हे खरे आहे का? ज०- तिरडीला खांदा घालणा-या बिचा-या स्वयंसेवी --- गावक-यांचे नुसते आभारहि मानायचे नाहीत? काय हे? स०- माणसाला मृत्यू निश्चित माहीत असतां, तो कोणत्या --- आनंदाने जगतो? ज०- आशा अमर असते या विश्वासावर. स०- देव म्हणजे काय? ज०- स्वतःच्या वर्तमान भविष्यापेक्षा ब-याच सभासदांना देवाची विवंचना बरीच दिसते. सदाशिव वायकूळ, पुणे. स०- घाशीरामी शब्दाची व्युत्पत्ति काय? ज०- घाशीराम सावळदास नावाचा पुण्यात एक अत्यंत ----- जुलमी कोतवाल होता. त्याने ललितागौरी नावाची आपली एक ----वान मुलगी नाना फडणिसाला अर्पण करून त्या वशिल्यावर ---- रयतेला सळो का पळो केले. मानाजी फाकडे या मराठा सरदाराने --- त्याचा काटा काढला. म्हणून --- जुलमी कारभाराविषयी घाशीरामी --- शब्द मराठीत रूढ झाला आहे. पुणे गॅझेटियर भाग ३रा. पान --- येथे “Ghashiram was a Kanoj Brahman of Aurangabad, who rose to be the head of the Poona Police by giving his daughter to be the mistress of Nana Fadnis” हा पुरावा दिलेला आहे. स०- मुक्त छंद याला गद्य म्हणावे का पद्य? पद्य म्हणावे तर ते गद्य असते आणि गद्य म्हणावे तर ते काव्य असल्याचा मुक्तछंदवाल्यांचा दावा. खुलासा करावा? ज०- पद्याळ गद्य किंवा गद्याळ पद्य काहीहि म्हणा. यमक—कविता न साधणा-या काही दीर्घबुद्धी पंडितानी या मुक्तछंदाची मोकाटगिरी चालवली आहे. जुन्या कवींनी गद्यातच पद्य साधल्याचे एक मजेदार उदाहरण देतो. हे एक सरळ साधे पत्र आहे बरं का. विज्ञपना अशी की, राजश्री देवरावदादानी मजला विनंति केली की आमच्या सर्व भाऊबंधानी दिक्षित यांचा आश्रय – सामाइक इनाम जें आहे तें क्षेत्र पितृसंपादित, तेव्हा --- असावे हे विहीत असून, विभाग न देतां, उत्पन्न तेच खातात. यास्तव आलो आहो. त्यास कृपा करुनि, त्या इनामांत आम्हाला भाग येईल असे दीक्षित यांस स्नहितकीचे एक पत्र द्यावे. या करीतां लेखनांत येतें की, देवराव यांनी जो मजकूर कळविला आहे, तो जर खरा आहे, तरं स्नेहाला योग्य तें करालच हे आपण करावे, म्हणोन लिहिणे नको. कृपा व्याप्ती प्रतिदिनी व्हावी. एवं श्रुत होय, हीच विज्ञाप्ती. साधे सरळ जुन्या मराठीचे पत्र आहे ना हे? ते आर्यावृत्तात-म्हणता येते पहा कसे ते०— विज्ञापना अशी कीं राजश्री देवरावदादांनी । मजला विनंति केली कीं आमच्या सर्व भाऊबंधांनी ।।१।। दीक्षित यांचा आश्रय करूनी सामाइक इनाम जे आहे । ते क्षेत्र पितृसंपादित तेव्हां मागिले असावे हे ।।२।। वाचा पाहू असंच पुढे. आहे का नाही मजा? शंकरलाल हिरालाल परदेशी, रावेर स०- आपल्याला समाजवाद कां आवडतो? ज०- नवशक्तिचे संपादक महाशय पाध्ये यांनी नुकतेच अेक व्याख्यान दिले आहे. तोच जबाब माझा. ''माणूस एकटा जगूं शकत नाही. त्याला मित्रत्वाची-स्नेहाची-आवश्यकता असतेच. समाजवादांत ही माणुसकी, मित्रत्व आणि स्नेह यांची मूलभूत प्रेरणा आहे, पण राजकारण एवढाच स्नेहाचा पाया बनू नये. राजकारण म्हणजे सर्वस्व नव्हे. त्याशिवाय अन्य कांहीं जीवन आहे याची आठवण ठेवून प्रत्येकानें माणुसकी, स्नेह, भ्रातृभाव, बंधुत्व यांचे संरक्षण केले पाहिजे. भारतीय संस्कृति संपूर्ण द्वेष कधीच शिकवीत नसल्यामुळे माझ्या कळपात आहेस तोंवर तूं माझा मित्र व कळपांत नसशील तर पूर्णतया शत्रू या कम्यूनिस्टाच्या तत्वज्ञानाला भारतांत कधीहि वाव मिळता कामा नये.'' स०- बापजादा, दौलतजादा ही पद्धत बरी का वाईट? ज०-
बापजाद्यांना दौलतजादेवाले बनवून, भलताच प्रसंग आणलात त्यांच्यावर! शब्दांचे अर्थ तरी नीट पहात जा भाऊ. स०- सभोताली पसरलेला असंतुष्टपणा कधि नि कसा नाहीसा होईल! ज०- असंतोष नाहीसा झाला का सामाजिक चैतन्यच ठार झाले. संतुष्ट समाज दगड धोंड्याच्या जातीचा असतो. नारायण नगू चांदणे, रावेर. स०- आपण स्वर्गीय सुख भोगीत आहोत असें मृत्यूलोकच्या माणसांना कंधि वाटेल! ज०- स्वर्गीय सुखाची लांबी रुंदी गोडी रुची काय आहे, त्याची माहिती स्वर्गाला गेलेल्या एकाहि शहाण्याने आजवर कळविलेली नाही. स्वर्गस्थ पूर्वज पिण्ड चाटायला कावळ्याच्या रूपाने येतात, पण तेथली बितंबातमी सांगत नाहीत. कशाला हवा तो स्वर्गाचा सोस? स०- अमक्याचे तोंड पाहिले म्हणून माझे काम झाले नाही, असं कोणीकोणी म्हणतात, त्यांत तथ्यांश काय? ज०- फाटके पायतण. लक्ष्मण कुमार चौगुले, मच्छे, बेळगांव. स०- रामदास हे शिवाजीचे गुरू, असे विद्वानांचे मत आहे. खरे काय? ज०- कोण हे विद्वान? आणि त्यांचे मत मानणारे ते कोण? स्वतः काही वाचा. मनन करा म्हणजे सत्य समजेल. गेल्या पार्लमेण्टात कळवलेले प्रो० फाटकांचे पुस्तक वाचा. सखाराम हरी सावंत, मुंबई १२ स०- गृहमंत्रि मोरारजीभाई देसाई यांच्या गृहमंत्रि कारकीर्दीविषयी आपला निस्पृह अभिप्राय काय आहे? ज०- पक्षीय विकल्पाचा चष्मा दूर सारून सांगायचे तर महाशय मोरारजीभाई देसाई यांची गृहमंत्र्याची कारकीर्द इतिहासात अजरामर राहील इतकी चारित्र्यसंपन्न, निष्कलंक आणि दरारेबाज झाली. गृहमंत्री असाच हवा. कित्येक मंत्र्यांच्या बोटाना कसल्या ना कसल्या किल्मिषाची शाई लागल्याच्या बोलवा आहेत, पण मोरारजी भाईंचे हात निर्मळ व स्वच्छ असेच राहिले. यातच त्यांचा मोठेपणा आहे. लपेटीची सही, रावेर सूचनाः- पत्र लिहिणारानी कृपा करून आपले नाव ठळक लिहावे. शिसपेन्सीलीने लिहिलेली पत्रे वाचण्याईतकी तल्लख नजर आता माझी नाही. तसल्या पत्राकडे मी ढुंकूनहि पहाणार नाही. शाई वापरावी. स०- अलिकडे खेड्यापाड्यांतल्या शाळांतून ब्राम्हणेतर शिक्षकांचा भरणा झालेला आहे. त्यातले बहुतेक मागासलेल्या वर्गातील असतात. साक्षरता आली, परीक्षा पास झाल्या तरी पिढ्यानपिढ्या जिभेवर बसलेली त्यांची अशुद्ध वाणीची सवय जात नाही, ण च्या ऐवजी न हटकून येतो. जसे०- जणी म्हने णामद्यावा ऋ कार बोलताना तर तिरपीटच उडते. सृष्टि बद्दल चक्क सुष्टि बोलतात. अशा शिक्षकांच्या हाताखाली ब्राम्हणांची मुल शिकू लागली म्हणजे तीहि अशुद्धच लिहू बोलू लागतात. या प्रकाराला पायबंद कसा बसावा? ज०- होय बुवा. मलाहि असले अनुभव पुष्कळ ठिकाणी आलेले आहेत. काही वर्षांपूर्वी पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजचे प्रिंसिपल महाशय तावडे यांच्या नजरेला मी हा प्रकार आणू चर्चाही केली होती. वाढत्या शहरी संघर्षाने – तो संघर्ष वरचेवर लाभत गेला तरच हो – भाषेची अशुद्धता सुधारण्याची आशा करण्यापेक्षा तत्कालिक उपाय दिसत नाही. आपली तक्रार मात्र खरी आहे. माधव इच्छाराम धांडे, रोझोदे. स०- आत्महत्त्या करणाराला स्वर्गात मोक्ष मिळत नाही म्हणतात. ते खरे आहे काय? ज०- स्वर्ग आणि मोक्ष नुसत्या कल्पनेच्या वावड्या आहेत. आत्महत्या करणारे नामर्द भ्याड म्हणून त्यांची कडक निंदाच करणे योग्य. बाकी, नैसर्गिक मृत्यु आणि आत्महत्या घडल्यावर, प्रेतांची वासलाद एकठशी सरणावरच व्हावयाची. स०- पुरुषांना अनेक वेळा विवाहाची सवलत आणि स्त्रियांना पुर्नविवाहाची बंदी असे कां? ज०- विधवांना पुनर्विवाहीची बंदी नाही. तरूण विधवांनी अगत्य पुनर्विवाह करावा. शहाण्या असतात त्या हा सरळ सोज्वळ मार्ग पत्करतात. ब-य़ाचशा लौकिकाच्या दांभिक बुरख्याखाली गुपचूप वाकड्या पावलांनी काशीयात्रा करतात, पण उजळ पुनर्विवाह करीत नाहीत. मूर्ख असतात त्या. स०- मरणोत्तर ब्राम्हणाना जेऊ घातले म्हणजे मृताला ते स्वर्गात पावते होते म्हणतात हे खरे आहे काय? ज०- स्वर्गाशी टपाल-व्यवहार चालू झाल्यावरच भटी पोटांतल्या खरकट्याविषयी मेलेल्या माणसांची स्वदस्तुरची पत्रे येण्याचा संभव आहे. सूचना०- कांही मंडळी पत्रांत उत्तरासाठी पोष्टाची तिकिटे पाठवतात. कशाला ती? पाठवण्याचे बंद करा. वी. आर तायडे, रावेर (बक्षिस) स०- आत्मा अमर आहे म्हणतात, तर देहावसानंतर
तो कोठे जातो? ज०- याविषयी फारा वर्षामागे सुप्रसिद्ध वेदान्ती सर्जन कै. डॉ. खेडकर एम. डी. यांच्याशी मी चर्चा केली होती. आत्मा हे एक केवळ चैतन्य आहे. बिजलीच्या वायरमध्ये एनर्जी असते. ती भासते पण दिसत नाही. तिला रंग रूप नाही. ती घनरूप नाही नि द्रवरूपहि नाही. (नायदर सॉलीड नॉर लिक्विड.) करण्ट स्विचॉफ केला तर ती जाते कोठे? ऑन केला का चालू होते? ऑफ केला का अदृश्य होते ही एनर्जी काय आहे हेहि बिजलीवेत्याना शब्दानी सांगता येत नाही. तोच प्रकार आत्म्याचा. पशू पक्षि मानव सगळ्यांची शरिरे आम्ही कण् कण् फाडून पाहिली. पण अमूक एका जागी आत्मा असतो, हे ठरवता आलेले नाही. ते एक चैतन्य आहे असा डॉ. खेडकरांनी खुलासा केला होता. स०- ज्योतिष शास्त्राचा उगम कसा झाला? त्यात सत्यांश किती? ज०- आकाशस्थ ग्रहांचा मानवांवर परिणाम होतो, या कल्पित गमकावर ज्योदिषाची सुरुवात फार प्राचीन काली ग्रीक पंडितांनी उभारलेली दिसते. मोठमोठे तज्ज्ञ त्यावर विश्वास ठेवू लागल्यामुळे या फिसाटाने सगळ्या जगाला पछाडले. पण खगोल भूगोल शास्त्रासारखे ते शास्त्र नाही, सायन्सच्या कसोटीला ते ठरत नाही, केवळ अनुमान धपक्याचे काहीतरी फिसाट आहे. हे आता सिद्ध झाल्यामुळे, अडाण्यांशिवाय फारसे कोणी ज्योतिष्याच्या फंदात पडत नाहीत. स०- परचैतन्य आणि प्रत्यक्ष चैतन्य यात फरक कोणता? ज०- आपण आणि आरशातले आपले प्रतिबिंब, इतका. बाबू नेहते, सावदा. स०- आजकाल कृति करण्यापेक्षा तत्वज्ञान सांगणारेच अधिक कां झाले आहेत? ज०- काँग्रेजी मंत्र्यांच्या वाचाळपणाने हा प्रश्न सुचलेला दिसतो तुम्हाला. व्यवहारात बोल्यांची गर्दी दिसली, तरी करवे कितीतरी असतातच. मात्र ते मुकटतोंडी कर्तव्य करणारे असतात. गरजेल तो पडणार नाहीं, हा अनुभव येतोच आहे रोजच्या रोज आपल्याला. स०- अलिकडे शिक्षक लोकांबद्दल समाजात अनास्था कां दर्शवली जाते? त्याला प्रमूख कारण कोण? ज०- स्वतः शिक्षकच, ते स्वतःच आस्थाशून्य असल्यावर, समाजाने अनास्था न दाखविली तरच आश्चर्य. खुलासा०—सुधारणेत मागे कोण नि पुढे कोण? साधा खटारेवाला सुद्धा चटकन सांगू शकेल, कोणता बैल पुढे नि कोणता रेंगाळ्या. डोळ्यांना दिसते त्यावर शाब्दिक वाद कशाला? रा. शं. टिळके, सावदा. स०- ज्या स्त्रीला मिशा असतात आणि भुवयाचे केस मधोमध जुळलेले असतात, ती फार कामसू असते नि तिला मुले होत नाहीत, म्हणतात, ते खरे आहे काय? ज०- अशाहि बाईचा वंशविस्तार झाल्याचे मी पाहिले आहे. लोकांचे समज निसर्ग पुष्कळ वेळा खोटे पाडतो. स०- काही समाजवादी साथी म्हणून मिरवणारे नैतिक काळी कृत्ये करण्यास कां धजावतात? ज०- उडदामाजी काळे गोरे असायचेच. नैतिक काळी कृत्ये करणारे काय इतरत्र नसतात की काय? मग साथीच्या नावानेच बोंबाबोंब कां? स०- सरकार म्हणून काँग्रेस पक्ष बलवान असतां, गावोगाव काँग्रेस कमिट्या कशाला? ज०- काय राव प्रश्न विचारता? मुंबईला गव्हर्नर असतां, गावोगाव पोलीस कशाला? संघटनेसाठी अशा कमिट्यांची जरूरच असते. स०- हिंदु धर्मातील बहुसंख्य लोक आपल्या मुलामुलींना विशिष्ट देवदेवतांची नावे कां ठेवतात? ज०- त्या निमित्ताने तरी देवाचे नाव अखंड तोंडातून यावे या शुद्ध हेतुसाठी. अजामिळाची कथा माहित आहे का नाही? अजित नाम ददो भलत्या मिषे, सकल पातक भस्त करीतसे. स०- इतर खात्यांतील नोकरवर्गापेक्षा शाळाखात्यातील मास्तर लोक अधिक काटकसरी नि साधे कां असतात? ज०- उधळपट्टी किंवा छानछोकी करायला अधिक पैसा लागतो राव. तो मिळत नाही म्हणून काटकसरी नि साधेपणा. स०- बहुतेक तरुणाना पाठीवर नि छातीवर तारुण्यात शिबले हा त्वचारोग आढळून येतो. खानदेशात त्याला शेम्बरी म्हणतात, तो कसा बरा करता येईल? ज०- अरेच्चा वैद्यकीतहि माझी परीक्षा घेता काय? ठीक. करून पहा हा उपाय. पांढरा काथ आणि कंकोल यांची वस्त्रगाळ भुकटी करावी आणि ती पांढ-या कांद्याच्या रसात कालवून ते मलम चोळून लावीत जावे. महर्षि अण्णासाहेब
पटवर्धनांचा उपाय आहे हा. गुलाबराव किसनराव चौधरी, निंभोरा. स०- काँग्रेस राज्यात यात्रेवरसुद्धा कर घेतात तर हे काय मुसलमानी राज्य म्हणावे? ज०- कर घेण्याची पद्दति सर्व राज्यात प्राचीन काळापासून चालू आहे. त्यात हिंदु मुसलमान भेद कसला काढता? रामराज्यात कर नव्हते, हे कोठे वाचले तुम्ही? लोकांनी कर दिल्याशिवाय राज्य चालणारच कसे? यात्रेवरच काय, पाळलेल्या कुत्र्यावरहि कर भरला पाहिजे. स०- डॉ. आंबेडकर हे मागासलेल्या जमातीचे पुढारी. मग ते एकट्या महार जमातीलाच पुढे आणण्याचा अट्टाहास कां करतात? मांग चांभार भंगी हे काय हरिजन नव्हेत काय? ज०- डॉ. आंबेडकर यच्च्यावत दलितांचे हित साधण्याची पराकाष्ठा करतात. त्यांच्यापाशी भेदभाव नाही. पण चांभारासारखे काही किंचित सुखवस्तु समाजच जर आपला सवता सुभा उभारून डॉ. आंबेडकरांशी पुढारपणाच्या चुरशीचा सामना देऊ लागतात, तेथे येतील मागे तेवढ्यांना घेऊन कार्य करणेच भाग पडले. दोष आंबेडकरांचा नाही. सवत्या सुभेवाल्यांचा आहे. वसंत कुमार शर्मा, जळगांव. स०- आज जी वस्तुस्थिती सत्य दिसते, ती दोन दिवस विचार केल्यावर खोटी असल्याचे प्रत्ययाला येते. कम्युनिझम हा एक सत्य मार्ग आहे असे अनेक विद्वान सांगतात तर कम्युनिझमने जीवनाचा नाश होईल, असेहि पटवणारे भेटतात. चुलत बहिणीशी विवाह करणे एक पाप समजतो, तर दुसरा ती खोडून काढतो. अशा द्विधा परिस्थितीत सत्-निश्चिती करावी कशी? ज०- शर्माजी, प्रथम आपल्या मनमोकळेपणाविषयी आभार. अमूक गोष्ट सत्य असे इतरांच्या सांगण्यावरून नुसते मानण्यापेक्षा, आपण स्वतः का? या प्रश्नाचा कस लावून त्या विधानाची कसोटी पाहिली पाहिजे. वाचन, श्रवण, मनन आणि निरीक्षण केले पाहिजे. अनेकांना एकादी गोष्ट सत्य म्हणून पटली आणि आपल्याला ती तशी पटली नाही, तर खुशाल ते सत्य असत्य म्हणून नाकारावे. मग समोर कोणी का असेना. मनाची ही ठेवणं भक्कम रोखल्यावर विचारांचा किंवा आचारांचा गोंधळच उडायचा नाही. भोई, वाघळी, ता.चाळीसगांव. स०- पूज्य विनोबाजी भावे तुमच्याकडे आले आणि ‘मलाहि तुमच्या घरातील एक समजून वाटणी द्या’ म्हणू लागले, तर जमीन शक्ति नि बुद्धीची वाटणी तुम्ही कशी द्याल? ज०- प्रथम मी त्यांना चहा देईन, तो त्यांनी घेतला नाही तर हुसकावून देईन. जमीनीचा इंचभरहि तुकडा माझ्या मालकीचा नाही. मला समक्ष पाहिल्यावर सक्तीची मागणी करण्याची शक्तीच त्यांना असणार नाही. आता बुद्धीची वाटणी. त्याबाबत विनोबाजी--- बुद्धीने श्रीमंत आहेत का ते मजजवळ मागणीचा शब्दहि ---- स०- पानिपतच्या पराभवाची कारणे देताना ----- बायकांचे तांडे बरोबर नेले हे कारण सांगतात, तर ---- बायका बरोबर असल्यामुळे म-हाट्यांनी एरवीपेक्षा ---- असे वर्णन देतात. खरे काय? ज०- इतिहासाचे सत्य कादंबरीत भरंसठ ---- त्यासाठी मूळ बखरी नि तत्कालीन पत्रव्यवहारच --- पानपतच्या मोहिमेने गर्वाचे घर खाली हा धडा म-हाट्यांना ---- आहे. स०- सत्यनारायणाची रुढी १००-१२५ वर्षांपूर्वी --- ज०- समजा, ती हजार वर्षाइतकी जुनी आहे. --- पणाची आहे हे पटल्यावर, तिचा जुनाटपणाचा मोह ---- स०- स्पृशोद्धार चळवळी कोणीकोणी केल्या? त्यांचे ---- ज०- स्पृश्यांना उद्धाराची जरूरच भासली नाही. --- ते एकमेकांचा रोज उद्धार करीत असतात. स०- परमेश्वराने उंटाला अनेक ठिकाणी वाकडे---- कीव करावीशी वाटते. ज०- कीव कोणाची? परमेश्वराचीकी उंटाची? विश्वनाथ डी नेहेते, सावदा. स०- काँग्रेजी राजवट लोकशाही का भांडवलशाही? ज०- सध्या ती बलसाडशाही आहे. स०- गेल्या निवडणुकीतील अपप्रकाराबद्दल चौकशी --- ज०- १५० – २०० फिर्यादी गुदरलेल्या आहेत. ----- होतील. न्यायाचे काम झटपट रंगारी असून भागत नाही. स०- दडपशाहीच्या टाचेखाली चिरडल्या जाणा-य़ांनी काय करावे? ज०- चिरडून जावे. चिरडली जाणारी क्षुद्र मुंगीसुद्धा ---राचा डंख घेऊन मरते. मानवाला काय एवढेही होणार ---- पाठवण्याचे एकच दडपशाहीने चिरडले जातात. स०- देशाचे दारिद्रय नष्ट करणे हे काँग्रेसचे ध्येय ---- म्हणतात, ते कितपत खरे आहे? ज०- आणि जनतेने काय पोटाशी हातपाय ----- असते
होय? ज्याने त्याने आपले दारिद्र्य नष्ट करण्याचा ----- तरच देश संपन्न होईल. हरएक बाबतीत सरकारच्या --- णा-याचे दारिद्र्य कल्पांतीहि नाहीसे होत नसते. दो. रा. चौधरी, सांगवी (बक्षिस) स०- परवा झालेल्या लोकशाही निवडणुकीतले दोष कोणते? ज०- कोणत्याही तत्वांचा अनुभव नसलेल्या या देशात --- मतदान पद्धति चालू केली, हा पहिला ठळक दोष --- वर्षे लोकशाही चालत असूनही सन १९२८ पर्यंत ------- पद्धती चालू केली नाही. द्रामतिकीटवजा मतपत्रिकांच्या --- पेटीतून त्या पेटीत आणि खरोखर बलसाडच्या संडासात सुद्ध उड्या मारण्याची सोय झाली, हा दुसरा दोष.ठरलेली ---- मन मानेल त्या उमेदवाराला देण्याची एकाच कागदाची ---- लेटिव) फार्माची पद्धत मुंबई म्युनिसिपल निवडणुकांत पार --- आल्याबरोबर सारे काँग्रेजी गुंडपुंड धडाड कोसळले आणि ----प्रगट झाले. मतांच्या फुल्याना हव्या त्या पेटीत जादूच्या ---- आल्या नाहीत. म्हणूनच ही एकटा फार्म पद्धत पुढे बंद ---- मुंबईचे काँग्रेसवाले आता हातपाय झाडू लागले आहेत. त्रि. ज. आगाशे, ठाणे. स०- गेल्या फाल्गुनी शिवजयंतीला ठाण्याच्या जिल्हाधिका-यानी सुट्टी दिली नाही. तेव्हा येथील श्री. रा आठवले म्हणाले, आता निदान वैशाखी तिथीला तरी सुट्टी द्या. आठवले जर फाल्गुनीचे अभिमानी, तर वैशाखीच्या सुट्टीची यातायात त्यांनी कां करावी? ज०- नकटीला नथणीचा सोस फार म्हणून. निलन कुमार तडवी, आडगांव. स०- बुद्धिवंत आपली बुद्धि, हमाल आपली शारिरीक शक्ति आणि कलावंत आपली कला भाड्याने देउन अगर विकून चापचोप दाम घेतो, तर गरजू स्त्रीने आपले प्रेम मोलाने विकले, तर त्याचा गवगवा कां होतो? ज०- सगळ्याच गोष्टी त्र्ययराशिकी पद्धतीने ठरवू म्हटले तर व्यवहारात अनवस्था प्रसंग ओढवतील, असली विचारसरणीच घातक. स०- वारांगना आपलं शील थोडक्यात विकतात म्हणूनच कुलीन स्त्रियांना त्यांच्या शीलाची भरपूर किंमत मिळते काय? ज०- थोडक्यात विकतात का महागात विकतात, हा मुद्दा एकाद्या अनुभववाद्याने सोडवायला पाहिजे. भिकारी लोक खरकटे खातात, म्हणून इतरांना मिष्टान्न मिळते, असे त्र्ययराशिक मांडता येईल काय? नारायण दलपत चौधरी, निंभोरा. स०- हिंदु धर्मात ३३ कोटी देवांचे स्तोम मानतात. ते का? खरा देव कोणता? देव शब्दाची व्याख्या काय? ज०- स्तोम माजवणारानी धुडकावले. हिंदुस्थानात हिंदु आहेत म्हणूनच देवांचा मासळीबाजार येथे फुलारला आहे. सारे येथले देव एकजात खोटे बोलणारे असल्यामुळे, ख-या देवाचा पत्ता अजून कोणाला लागलेला नाही. स्वतापेक्षा देवाची विवंचना तुम्हाला अधिक दिसते, राव. भाऊलाल गणेशमल ओसवाल, नाडगांव स०- चंद्राच्या वर्तुळात काळे बिंब कां असते? ज०- चंद्रलोकच्या सफरीची तयारी होत आहे. आपले पंडीत जवाहरलालजी तेथून तांदूळही मागवणार आहेत, एकदा कोणी तरी त्या वर्तुळावर जाऊन परत आला म्हणजे त्याची मुलाखत घेऊन या तुमच्या कां? चा खुलासा काढता येईल. माणसाला दोनच डोळे कां? चार कां नाहीत? या सारखाच आपला प्रश्न आहे हा. त्र्यंबक भगवान खडसे, नाडगांव. स०- वेश्यांनी राष्ट्रगीत म्हणणे, हा राष्ट्राचा अपमान नव्हे का? ज०- आणि तुम्ही हा प्रश्न विचारणे हा वेश्यांचा अपमान नव्हे कां? त्यांचा अपमान करण्याचा तुम्हाला काय अधिकार? काय त्या भारताच्या सामान्य नागरीक नव्हेत? रा. काँ. म्हसकर, नशिराबाद. स०- निधर्मी शब्दाला आपल्या शास्त्रात आधार आहे काय? प्रजा धारयते यद्धर्मः, धर्मच मानायचा नाही तर समाजाचे धारण कसे होऊ शकते? ज०- इंग्रेजी सेक्यूलर शब्दाला हा म-हाठी प्रतिशब्द वापरतात. त्याचा वास्तवीक अर्थ आमचे सरकार राज्यकारभारात कोणत्याहि धर्मपंथाचे प्रस्थ मानणार नाही. सरकारला सर्व धर्मपंथ सारखे, एवढाच समाजाचे धारण पोषण करणारा धर्म देशकालानुसार माणसे तयार करतात. शास्त्रांचा तेथे काही संबंध नाही. हा धर्म सुद्धा एकरूप एकठशी कायमचा नसतो. काळाबरोबर तो बदलत असतो, हे ज्यांना उमगत नाही, तेच लोक समाजाच्या प्रगतीचे कण्टक म्हणून वरचेवर धिक्कारले जातात. तुकाराम तुळशीराम महाजन, कोरपावली स०- अशिक्षित परन्तु सुंदर अशा कुमारिकेशी सुशिक्षित कुमाराने विवाह करणे, सुधारणेच्या
दृष्टीने योग्य होईल काय? ज०- सुधारणेची आपली व्याख्या काय आहे? ज्याला इंग्रेजीत सिविलिझेशन म्हणतात, तिचा आमच्याकडे अजून पत्ताहि नाही. शिवाय अशिक्षित आणि सु-शिक्षित शब्दांचे अर्थ तरी काय समजता? नाक्षर शेतकरी व्यवहाराचा वेदान्त शिकवतो आणि सु-शिक्षित म्हणवणारा माणूस बेकार भटकतो, ही उदाहरणे काय शिकवतात? विवाह परस्परांच्या आकर्षणाने होत असतात. व्हावेत. तेथे या फोलकट साक्षर नाक्षरतेचा मुद्दा अनाठायी होय. स०- ग्रहणांच्या वेळी भोजन करू नये, कशासाठी? ज०- ग्रहणांच्या वेळी वातावरण अप्रसन्न असते म्हणून. यात देव नाही. धर्म नाही. आरोग्याची बाब आहे ही. स०- ब्रम्हचर्याश्रमात सुख आहे का गृहस्थश्रमात? ज०- गृहस्थाश्रमी ब्रम्हचर्यात. स०- मनुष्य-स्वभाव ओळखण्याचे परिमाण कोणते? ज०- आपल्यावरून जग ओळखावे. त्र्यंबक दलपत चौधरी, निंभोरा स०- सन १९२० साली विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेजे सोडून राजकारणात भाग घ्यावा असे काँग्रेसनेते सांगत होते. आज म्हणतात, विद्यार्थ्यांनी राजकारणात मुळीच भाग घेऊ नये. या विरोधाचे मर्म काय? ज०- बदललेली परिस्थिती. परिस्थित्यनुसार बदलण्यातच खरे शहाणपण असते. स०- काँग्रेस वजा जवाहर, बाकी पूज्य. हे समीकरण बरोबर आहे काय? ज०- चूक आहे. मूर्खपणाचे, भारताच्या नालायकीचे आहे. महात्मा गांधीसारखा स्वराज्य-स्वातंत्र्याचा विश्वकर्मा कालाधीन झाला, तरी भारताचा जीवनक्रम चाललाच आहे पुढेपुढे. अडले कोठे? स०- काँग्रेसचे पुढारी महात्मा गांधींच्या कोणत्या तत्वाप्रमाणें सध्या वागत आहेत? ज०- खादी पेहरावापुरते. शकुन्तला, फैजपूर. स०- प्रेम आणि प्रणय यात फरक काय? ज०- फक्त अक्षरांचा अर्थ एकच. स०- अट्रॅक्शन इज द फर्स्ट स्टेप ऑफ लव्ह, यात कि ज०- अटेन्शन, अट्रॅक्शन, इन्टेशन, डिटरमिनेशन अँड अखेर अँब्सार्बशन, अशा पाय-या आहेत. स०- प्रेम या शब्दाची व्याख्या काय? ज०- तुपाची चव शब्दांनी सांगता येत नाही. ते खावेच लागते, तसे प्रेम करावेच लागते. स०- मतदानात निवडून न आलेली व्यक्ति विधिमंडळात किंवा लोकसभेत, केवळ पक्षाच्या जोरावर, मंत्रीपदावर बसू शकते काय? ज०- काँग्रेजी रामराज्यात अशक्य काय आहे? प्रभाकर गोविंद सप्रे, परळ, मुंबई. (बक्षिस) स०- अल्कोहोल गोठू शकतो काय? ज०- होय. शून्यांशाखाली २०० डिग्री फारेनहाईट बिंदूवर. स०- टेलिफोन ओडिसनने का रामकोनीने शोधून काढला? ज०- दोघांनीहि नव्हे, अलेक्झांडर ग्राहाम बेल याने. स०- पाश्चात्यांत आणि अलिकडे पौर्वात्यातहि टोस्टचे पेय पिताना पिणारे आपापली ग्लासे एकमेकांच्या ग्लासांशी प्रथम स्पर्शवितात, ही रूढी कशी आली? ज०- युरोपांत पूर्वी सशस्त्र द्वंद्व युद्धे (ड्युएल्स) होत असत. त्यापूर्वी दोघे अर्कप्राशन करीत असत. त्या अर्कात विषप्रयोग झालेला नाही याची खात्री करून घेण्यासाठी, एकमेकांच्या ग्लासांतले पेय आरसपरस ओतल्याचा प्रघात प्रथम सुरू झाला. नंतर पुढे फक्त ग्लासाला ग्लास भिडवण्याची पद्धति आली. सध्या अशी स्पर्शास्पर्शी म्हणजे अेकमेकांचे शुभचिंतन, असा अर्थ दर्शवते. य. शि. चौधरी, चिनावल. स०- भारतातील सर्व उद्योगधंद्यांचे राष्ट्रियीकरण झाले तर काय परिणाम होईल? ज०- या प्रकारांत काही फायदे आहेत, तसे तोटेहि आहेत. आत्यंतिक राष्टरियीकरण होऊन सर्व उद्योगधंदे थेट सरकारी नियंत्रणाखाली गेले. तर कष्टकरी जनता गुलाम आणि सरकार मालक असा नवा संभावीत गुलामगिरीचा मुकाबला तयार होअील. त्याप्रसंगी माणसाला जड यंत्रापलिकडे काही किंमतच उरणार नाही. रशियात असेच झाले आहे म्हणतात. स०- दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणावर प्रकाशित होणा-या अश्लील -- ग्यावर व बोलपटांवर सरकार काहीच निर्बन्ध कां घालीत नाहीत? ज०- सरकारची यावर करडी नजर असते, परंतु अश्लील कोणते नि श्लील कशाला म्हणावे, याचेच वाद चालले आहेत. स०- आपल्या मते वधुवरांनी एकमेकांची योग्य निवड करताना कोणत्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवाव्या? ज०- अहो, हव्यात कशाला चौकशा नि नियम? एकमेकांचे आकर्षण असले, का तेवढे भांडवल पुरे. स०- आपल्यामागें ‘वाचकांचे पार्लमेण्ट’ चालवण्याची धमक कोणता सभासद दाखवू शकेल असे आपल्याला वाटते? ज०- हवा तो, मी निराशावादी नव्हे. सदू संपत पाटील, उटखेडे, ता. रावेर. स०- काही मोठमोठे अधिकारी अहंमन्य असतात. कारण काय?
ज०- अहंमन्यता हा गूण आहे आणि दोषहि आहे. परिणामावरून त्याचा बरावाईटपणा ठरत असतो. स०- काँग्रेस सरकार म्हणते का आम्ही जातीयता नष्ट केली किंवा करीत आहोत. मग परस्पर जातीत लग्नसंबंध जुळलेले कां दिसत नाहीत? ज०- सरकारने अजून लग्नसंबंध जुळवण्याची ‘मॅरेज एजन्सी’ काढली नाही. आंतर्जातीय विवाहच जातीभेद नष्ट करू शकतील. --- त्यासाठी तुम्ही तरूण तरूणीनीच नैतिक धिटाईने पुढे पाऊल टाकले पाहिजे. सरकार तेथे काय करणार? बरे, उद्या जातीजातीत --- प्रतिबंधाचा कायदा केला का तिकडूनहि पुन्हा सरकारच्या नावाने ठणाणा करायला लोक तयार. या गोष्टी जनतेनेच विवेकाने आचारात आणल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्टीत सरकारकडे पहाणे, ही गुलामगिरी होय. स०- मागासलेल्या (शेडूल्ड कास्ट) जमातीसाठी भारत सरकारने २६-१-१९५० च्या घटना कायद्याने नोक-यांसाठी १० वर्षाची सवलत दिली आहे, अधिक कां दिली नाही? १० वर्षात या जमातीचा उत्कर्ष होईल काय? ज०- मला स्वताला ही १० वर्षाची सवलतहि नापसंत आहे. लोकशाहीत उत्कर्ष साधण्यासाठी सर्व जमातीनी नि व्यक्तिमात्रानी चुरशीच्या सामन्यात सामील व्हावे. सवलतीच्या पांगूळगाड्यानी --- व्यक्ति वा समाज धडाडीने पुढे येऊ शकणार नाही. हळूच कानात – लौकिकी जात लेबलाने मी ब्राम्हण नसून क्षत्रिय आहे. कर्माने मी कोण हे इतरानी ठरवायचे आहे. भिकाजी शिवराम चौधरी, चिनावल. स०- होळीचा सण साजरा करण्यात आपल्या पूर्वजांचा हेतू काय असावा? ज०- मनुष्यमात्राला पसंत असलेल्या वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ तो एक सोज्वळ प्रकारचा आनंदोत्सव असावा. पण गेल्या शंभर दीडशे वर्षांत त्या उत्सवाचा गलिच्छ शिमगा झाल्यामुळें, सरकारने त्याला प्रतिबंध करण्याचा अत्यंत अभिनंदनीय उपक्रम केला. स०- ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले, ही घटना कशी काय घडली असेल? ज०- असला चमत्कार घडणेच शक्य नाही. एकाद्या जड--- बुद्धीच्या माणसाकडून वेदोच्चार करवला असेल आणि त्यावर पौराणिकी गप्पिष्टानी रेड्याचे रूपक बनवले असेल. स०- गांधीवादी लोक निवडणुका कां लढवीत नाहीत? त्यांना इतरांपेक्षां खात्रीनें अधिक मते पडतील. ज०- गांधीवादी लोक ते कोणते? सध्या खादीचे लुंगी कुडते पोटी पांघरणारा हवा तो परमिट्या गांधीवादी म्हणून मिरवतो. हा गांधीवादी म्हणजे विनोबाजी भावे, ---, असल्या व्यक्तींविषयी म्हणाल, तर त्यांना कसल्याहि अधिकाराचा सोस नाही. पडेल घडेल ती लोकसेवा मिटल्या तोंडी करणारे लोक आहेत ते. ते कशाला बलसाडच्या संडासाची भानगड करीत बसतील? स०- हिंदी कम्युनिस्ट पक्षानें हिंसावृत्ति सोडली म्हणतात, ते खरे आहे काय? ज०- सापाने कात टाकली म्हणून त्याला कोणी आपला बाप मानीत नाही. स०- फारसीझम म्हणजे काय? थोडी समजूत पटेल अशी माहिती द्यावी. ज०- कर्तुमकर्तुमन्था कर्तुम अधिकार असलेल्या एकाच व्यक्तीच्या हातात सगळी सरकारी सत्ता केन्द्रित करण्याच्या तत्वाला फारसीझम म्हणतात. ‘फारसिओ द कोंबातिमेन्तो’ (युनियन ऑफ कॉम्बट) या नावानें या तत्वाचा सन १९१९ साली इटलीच्या बेनिटो मुसोलिनीने पुरस्कार केला. रोमन साम्राज्यातल्या न्यायाधीशापुढे दण्डधारी म्हणून मिरवणा-या आणि देहांताची शिक्षा पार पाडणा-या मांगकस्णीच्या लिबटर्स नावाच्या अधिका-यांच्या हातात परशू सारखा एक राजदण्ड असे. ती या मुसोलिनीच्या फासिस्ठ पक्षाची निशाणी आणि हात वर करून सलामी देण्याची प्राचीन रोमन पद्धत प्रचारात आली होती. म-हाठीत फारसीझमला झोटिंगपाच्छाई असा शटू वापरता येईल. सोपान गंभीर पाटील, अटवाडे, ता. रावेर स०- साधारतः १२ ते १६ वर्षापर्यन्तच्या मुलांना आणि सर्व युवकाना स्टण्ट बोलपटच कां आवडतात? ज०- जावे त्याचे वया तेव्हा कळे. स०- पुरुषांच्या काळ्या कृत्यांवर पडदा आणि स्त्रियांच्या तसल्याच कृत्याचा मात्र बोभाटा कां? ज०- स्त्रिया अजून पुरूषांच्या गुलामगिरीत आहेत म्हणून. त्या मुक्त झाल्या म्हणजे गाडे पालटेल किंवा उलटेल सुद्धा. स०- जिवलग मित्रांची मैत्री त्यांच्या लग्नानंतर ढिली कां होत जाते? ज०- जिव्हाळ्याचे नवनवे भागीदार निर्माण होता म्हणून. स०- ब्राम्हण समाजात प्रत्येक मुलाची मुंज लावतात. हेतू काय? ज०- प्राचीन चार वर्णाच्या समाज-रचनेत ब्राम्हण क्षत्रिय आणि वैश्य हे द्विज
25 of 74
(दोनदा जन्म घेणारे) मानले जात असे. एकदा नैसर्गिक आणि दुसरा संस्कारित. या संस्काराला मुंज किंवा उपनयन विधि असे म्हणतात. स०- ब्रम्हचर्य हेच जीवन वीर्यनाश हाच मृत्यु, या नावाची दोन पुस्तके आहेत, ब्रम्हचा-याला विवाहाचे वावडे. वीर्याचा नैसर्गिक उपयोग नसला तर नाशच होणार? हे कोड काय. ज०- वैवाहिक जीवनात सुद्धा माफक ब्रम्हचर्याने राहून सबल संतत्यत्पादन करावे, असे त्यातले मर्म आहे. वीर्यनाश हा तर मृत्यूच. या दुष्कृत्यात अविवाहित तरूणांचे फार बळी पडतात. भोई वाघळी, पू खा. स०- इसापनीति आणि हितोपदेश हे ग्रंथ मूर्खास शहाणे करणारे आहेत का शहाण्यास मूर्ख करणारे आहेत? ज०- अभ्यासून अनुभव सांगा. हे दोन ग्रंथ अभ्यासक्रमातून उठवल्यामुळेच आजकालची पिढी व्यवहारातून उठली आहे. स०- एकाद्याला मार्कण्डेयाचे आयुष्य (९९९९ वर्षे) लाभो असा आशीर्वाद देणे म्हणजे तो शापच नव्हे का? ज०- चिरायू असण्यापेक्षा त्यात अन्य भावना कोणतीहि नसते. तथापि, ९९९९ वर्षे जगणे ही नरकवासाइतकीच किंबहुना अधिकच पीडा. खरोखर, मरणाची सवलत नसती तर जगण्यातहि काही अर्थ नसता. स०- अनीतीने पापमार्गाने संपत्ति कमी होते म्हणतात. पण व्यवहारात उलटा प्रकार दिसतो. ज०- लक्ष्मीला एका प्राचीन संस्कृत कवीने ‘छीनाल’ शिवी हासडलेली आहे, ती वाजवी आहे. स०- कर्मवीर भालराव पाटील आणि महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या साम्य कोणते? ज०- त्यांच्या छातीवर रूळणा-या सरदार पांढ-या दाढीचे. स०- विवाहितांचा संसार सुखाचा होण्याचा मूलमंत्र कोणता? ज०- तडजोड. कन्हैयालाल सुरजमल वाणी, रावेर. स०- अलिकडे चोरीचे प्रस्थ फारच माजले आहे. सरकार काय करीत आहे? चोरांना तुरुंगाचेहि भय वाटेनासा झाले आहे. ज०- आमच्या मुंबई शहरात दररोज एक चोरी, एक खून, एक दरवडा, एक सुरेमारी असले प्रकार चालू आहेत. तिकडे सातारा ता --- साट भडकला आहे. गुन्हेगारांना पोलिसांसेच भय वाटेनासे झाले आहे, तिथे तुरुंगाचे काय घेऊन बसलात राव? रामराज्य आहे हे! तुका म्हणे उभे रहावे, जे जे होईल ते ते पहावे. गावक-यांनीच एकवटून संरक्षक संघटना तयार केली पाहिजे. केसरीलाल लछाराम जैस्वाल, महाळुंगी जहागीर, ता. मलकापूर. स०- तुम्ही काँग्रेसवर इतकी आग पाखडता, तर काँग्रेसने तुमचे काय घोडे मारले आहे? ज०- मला स्वतःला घोडेत नाही, पण लोकशाहीच्या बुरख्याखाली काँग्रेसने सर्वत्र जी सवत्या सुभ्याची फासिस्ट म्हणजे झोटिंगशाही माजवून जनतेचे घोडे मारले आहे,त्याचा मला राग येतो. स०- तंत्र मंत्र जादू टोणा या गोष्टी ख-या आहेत काय? ज०- काही प्रमाणावर ख-या आहेत. औषधोपचारापेक्षा केवळ मंत्रोपचाराने सर्पदंश बरे केल्याची उदाहरणे मी पुष्कळ पाहिली आहेत. स०- लग्नाची आमंत्रणे देताना, तांदळाच्या अक्षता देतात पण ---प्रसंगी वधूवरांचे आंगावर ज्वारीच्या अक्षता टाकतात, असा फरक का? ज०- हा फरक सार्वत्रिक नाही, प्रादेशिक दिसतो. स०- भाकर ‘बाटली’ म्हणतात ती कशी बाटते? ज०- हे बाटण्याचे खूळ स्पर्शास्पर्शतेच्या कुळसट कल्पनांत आहे. महादू रामजी गायकवाड, मालेगाव, जि. नासिक. स०- समाजवादी पक्षाने शेडूल्ड कास्ट फेडरेशनशी सार्वत्रिक निवडणुकीचे वेळी हातमिळवणी केली, ती समाजवादी पक्षाला घातक कां ठरली? ज०- हंगामी घरोबा टिकणारच कसा? लक्ष्मीसुत तळवेलकर, तळवेल. स०- अलिकडे वर्तमानपत्रांत येणारे भूपत प्रकरण काय आहे? ज०- वर्तमानपत्रांत ते वाचूनहि आपल्याला काही बोध होत नाही? आश्चर्य. स०- स्वधर्माभिमान बाळगून हिंदूंचा छळ करणारा औरंगजेब चांगला की, गोड बोलून हिंदूंच्या मुलीशी लग्ने लावणारा अकबर चांगला? ज०- वा राव, अगदी शाळेतल्या पेपरातला प्रश्न विचारलात. सन १९०० साली मॅट्रिकच्या परिक्षेच्या शालेय चाचणीत मला हाच प्रश्न आढळला होता आणि मी औरंगजेबाला चांगुलपणाचे सर्टिफिकेट दिल्यामुळे प्रिंसिपल महाशयानी माझे १० मार्क कापले. मी खूप भांडलो. विकल्पाच्या चष्म्यातून इतिहास पाहून भागत नसते. माझे तेच मत आजहि कायम आहे. स०- एकाकी काही वस्तूंचे भाव उतरले, ही लीला कोणाची? ज०- सरकारच्या वक्तशीर नीर्यातबंदीची आणि लोकांच्या खरेदीशक्तीच्या –हासाची,
असे अर्थसास्त्रज्ञ सांगतात. पंढरीनाथ भिवसन पाटील, बोरनार, पो. म्हसावद. स०- कोणत्या राजवटीत माणसाला अब्रुने जगता येईल? ज०- ज्या राजवटीत हरएक माणून उद्योगी असेल त्या. स०- भारत नि अमेरिका यांच्या मैत्रीचा उद्देश काय असावा? ज०- मैत्री. स०- भारत शेतकीप्रधान देश असून अमेरिकेची बरोबरी कां करू शकत नाही? ज०- यां देशांत आळशी ऐतखावू उपटशुंभ आत्मद्रोही घरभेदे आणि अल्पसंतुष्ट लोकांचा भरणा फार आहे म्हणून. लोहारी बु०चे सवालदार मित्रमंडळ. स०- ज्योतिष हे जर शास्त्र नव्हे तर ते ग्रहणे अचूनक कसे वर्तवते? ज०- ग्रहणे खगोलशास्त्राने ( अॅस्ट्रॉनमी) निश्चित केली जातात. तेथे ज्योतिष्याचा काही संबंध नाही. स०- बहिण भावात लग्ने लागतील अशा अर्थाने हिंदूकोड विल तयार झाले आहे काय? ज०- हिंदूकोड विलाच्या विरोधकानी खेड्यापाड्यात कसला चावट नि हलकट प्रचार केलेला असावा, याचा अंदाज आपल्या सवालाने आता बिनचूक लागला. मागे-एका जबाबात सुटविलेली या विलविषयी पुस्तके अभ्यासा. स०- दारिद्र्य निर्माण करणारा कोण? ज०- ज्याचा तो. स०- महादेवाला बेलाचीच पाने कां वहातात? ज०- ही देवादिकांची पर--- पैदा करणा-या शहाण्यानी एकेक देवाला एकेक फूल पानाची जहागिरी दिली. त्यात शंकररावाना बेलपत्री मिळाली. स०- ढेकणासारख्या पर-रक्त-पुष्ट प्राण्यापासून मानवाने कोणता धडा घ्यावा? ज०- आधी त्याला चिरडून टाकावा. डी. एन. तडवी, वढी.ता.यावल. स०- गरीब अशिक्षित आणि उनाडानी गजबजलेला समाज कसा सुधारता येईल? ज०- समाजसुधारणेचे औषध नसते. शिकलेल्या विचारवंतानी आपापल्या जमातीची ---- एकत्र एकविचाराने सोडवण्याच्या कार्याला वाहून घ्यावे लागते. डी.. एन तडवी, वढी. ता. यावल. स०- वोल्या ते गंगा या पुस्तकावरून हर्ष व नेहरू यांत श्रेष्ठ कोण? ज०- तुलना ही तिरस्करणीय बाब आहे. कोणीहि श्रेष्ठ असो, आपण श्रेष्ठपणाचे कौतुक करावे, तसे श्रेष्ठ होण्याची महत्वाकांक्षा धरावी. तुलनेचा छंद बरा नव्हे. स०- सौंदर्य, पैसा आणि शिक्षण यांपैकी कोणाचे स्थान उच्च? ज०- शिक्षणसंपन्नाला बाकीच्या दोनीहि गोष्टी प्राप्त होतात. स०- सर्व प्राण्यांत गाढवालाच जास्त मूर्ख कां ठरविले? ज०- ठरविणा-या मूर्खाचा गाढवपणा. रामदास शंकर टिळके, सावदे. (बक्षिस) स०- उत्कर्षेछू तरूणानी उज्वल जीवनाची तयारी करण्यासाठी जगातल्या कोणकोणत्या थोर नरनारींची चरित्रे वाचावी? ती कोठे मिळू शकतील? ज०- प्रथम हाती लागतील त्या श्रेष्ठांची चरित्रे अभ्यासण्याचा मनःपूर्वक व्यासंग ठेवला म्हणजे आपल्या सुप्त महत्वाकांक्षेला बिनचूक मार्गदर्शन करण्यासारख्या तपशिलाचा कोणीतरी थोर आढळतो. त्याच्या अडचणी, उद्योग, ध्येय साधण्यासाठी देशकालवर्तमाननुसार केलेल्या खटपटी, त्याची अपयशे नि यशे, ब-यावाईट आलेल्या संधीचा त्याने घेतलेला फायदा आणि टाळलेले धोके, इत्यादि तपशिलांच्या चिंतन मननाने जीवनाला वळण लागत जाते. चरित्रे कोठे मिळतात? कोणत्या ठिकाणी कोणत्या फुलावर मधाचा बिंदू मिळेल, हे मधमाशीला शिकवावे लागत नाही. इच्छा तेथे मार्ग असतोच. आयते पुढ्यात वाढून जगात काहीहि येत नसते. एल आर. सपकाळे, सावदा. स०- सौंदर्याची खरी व्याख्या काय? खरे सौंदर्य कशात असते? ज०- खोटी व्याख्या आपणास माहित आहेसे दिसते. खरी व्याख्या द्यायची तर ''ए थिंग ऑफ ब्यूटी इज ए जॉय फॉर एव्हर'' अशी आपल्या वाचनाच आलीच असेल. स०- कौरव पांडव युद्धाच्या प्रत्यक्ष धामधुमीत श्रीकृष्णाने ९८ अध्यायांची गीता अर्जुनाला सांगितलीच असेल कशी? ज०- सांगणे शक्यच नाही. समरांगणावर त्रोटक सारांशाचा गीतार्थ-बोध केला आणि मागाहून त्याचा विस्तार करण्यात आलेला आहे. स०- ‘नाव राहून गेले आणि गांव वाहून गेले’ या म्हणीप्रमाणे प्रबोधनकार ठाकरे आहेत काय? ज०- प्रबोधनकाराचे गांव मागेच वाहून गेले आहे. त्याच्या मालकीची एक इंचभरहि जमीन कोठे नाही, गांवाप्रमाणेच नांवहि मागे शिलकी राहाणार नाहीं. स०- सीनेनट्यांचे पावित्र्य (शील) तांदुळासारखे स्वच्छ धुतले असते काय? ज०- अंदरकी बात खुदा जाने. स०- समजा, उद्या तुम्ही भारताचे पंतप्रधान झाला तर..... ज०- भोवतालच्या मंत्र्यांना सुखाची झोप येणार नाही. मिनिटा मिनिटाला यंत्रासारखे पिळून काम करून घेणारी कुठची कटकट लागली
आहे पाठीमागे, अशा वैतागाने सारे सहकारी एक दिवस माझा खून पाडतील आणि मग बातमीदाराला आठवड्याचा लेख आणि वाचकांचे पार्लमेण्ट मिळणार नाही. स०- तुकारामाच्या गाथेत ‘भिक्षापात्र अवलंबिले, जळो जिणे लाजीरवाणे’, आणि ‘भिक्षेऐसे सुख नाही’ अशी परस्परविरुद्ध विधाने कां आढळतात? ज०- कोणते विधान कोणत्या प्रसंगाला अनुलक्षून उच्चारले गेले त्याचे मूळ समजणे अगत्याचे आहे. तुकारामाचे अभंग कोनॉलाजिकल (तारीखवार प्रसंगवार) ऑर्डरने छापलेले नाहीत. जसे ज्याला मिळाले तसे एक केले गेले. सगळाच गाथागोंधळ आहे तो, त्यामुळे अशा शंका येणे साहजीक आहे. तुकारामाने शिवाजीला लिहिलेले पत्र बनावट आहे. भोई, वाघळी, ता. चाळीसगांव. (बक्षिस) स०- आजच्या युगाला सार्थ नांव सुचवा? ज०- कर्तव्य युग, प्रत्येकजण आपापले कर्तव्य चोख बजावीत जाईल, तर भारताच्या उत्कर्षाची निराळी खटपटच नको. स०- शिवाजी हा ‘वाट चुकलेला देशभक्त’ असे जवाहरलालजीनी कोणत्या पुस्तकात लिहिले आहे? ज०- स्वता काहीहि न वाचता ऐकीव गोष्टीवर भरंवसा ठेवणे बरे नव्हे. महात्मा गांधीनी शिवाजीला ‘वाट चुकलेला देशभक्त’ (मिसगायडेड पेट्रियट) असे म्हटले होते आणि ‘---- सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी’ या ग्रंथात जवाहरलालजींनी अफजुलखान वध प्रकरणी ‘शिवाजी हा दगाबाज (ट्रेचरस) होता’ असे विधान केले. महाराष्टात निषेधाची मोठी चळवळ झाल्यावर, त्यानी ते विधान परत घेतले नि दिलगिरी व्यक्त केली. ग्रंथाच्या दुस-या आवृत्तीतून ते विधान काढण्याचे आश्वासन दिले. जवाहरलालजी स्पोर्ट (दिल्दार) आहेत. गांधीजीनी मात्र तसे काही केलेच नाही. महात्मा होते ते! स०- प्रीति-विवाहातील दोष कोणते? ज०- आंधळी प्रीति. स०- पतीचा वंश बुडू नये म्हणून निपुत्रिक विधवेला क्षेत्रज करण्याची चाल प्राचीन काळी होती. ती सर्वमान्य होती काय? बंद कां झाली? त्या बंदीतूनच पुनर्विवाहाचा प्रश्न आला काय? ज०- सख्ख्या दिराकडून, अथवा तो नसल्यास, निकटच्या आप्ताकडून विवाहाशिवाय एक पुत्र निर्माण करून घेण्याची फार प्राचीन काळी सर्वमान्य रूढी होती, त्याला ‘नियोग’ म्हणत असत. समाजरचना आणि समाज-स्वास्थ्याच्या कल्पना जसजशा बदलत गेल्या, तशी ती रूढी मागे पडली. विधवांनी पुनर्विवाह करावा, केलाच पाहिजे, एवढा उदार समाजधर्म चालूच होता. खुद्द रामायण काळी वालीला ठार मारल्यावर त्याच्या तारा राणीने सुग्रीव दिराशी आणि रावण ठार झाल्यावर मंदोदरी राणीने बिभिषणाशी पाट लावल्याचे दाखले आहेतच. मात्र पुनर्विवाहात पहिल्या पतीच्या वंशजाचा प्रश्न पूर्वी नव्हता नि आज नाही. स०- उच्च विचार नि साधी राहाणी आणि उच्च विचार नि उच्च राहाणी, यांपैकी कोणत्या पद्धतीने आपला देश आज चालला आहे? आजच्या तरुणानी कोणता मार्ग पत्करावा? ज०- देशाचे राहू द्या. स्वतापुरते पहा. उच्च रहाणी हा स्वावलंबी मुद्दाच होऊ शकत नाही. उच्च विचारसरणी तेवढी प्रत्येक सुजाणाच्या हातातली आहे. पण तिचे बीजारोपण करणे, ती वाढवणे आणि जोपासणे, ही एक तपश्चर्या आहे. सगळ्यानाच साधेल असे नाही. देवचंद लहू भालोदकर, भालोद. स०- शास्त्रात आत्महत्या पाप ठरले असतां, श्रीरामाने शरयू नदीत आत्महत्या कां केली? ज०- त्याला जलसमाधि म्हणतात. आत्महत्या नव्हे. आज असल्या समाध्याहि गुन्हा ठरविण्यात आल्या आहेत. स०- पाक नि भारताची आजची लोकसंख्या ४० कोटी म्हणतात. पण भारतकाळी एकट्या द्वारकेतच ५६ कोटी यादव होते म्हणतात, ते कसे? ज०- ३० कोटी देवांच्या गणितासारखे ते एक पौराणिकि थाटाचे विधान होय. स०- खरोखरच भांडवलशाही नष्ट झाली तर जगांत शांतता होईल काय? झाल्यास कशी? ज०- भांडवलशाही शांतीला विघातक असली तरी या ना त्या रुपाने पूर्वी ती होती, आज राहणार नि पुढेहि राहील. फार झाले तर तिचे बारशाचे नवीन नांव चालू होईल, वर्तमान जगाच्या अशांतीला भांडवलशाही हे एकच काही महापाप कारण नाही. रामचंद्र उखाजी गवळी, मोरफळ, ता. पाचोरे. स०- चालू मंदीमुळें पुष्कळ व्यापा-यांनी म्हणे आत्महत्या केल्या. गेल्या १० वर्षाच्या काळ्या बाजाराने लुटलेल्या धनाच्या राशी पाहून हर्षवायूने एकही शेट्या मेल्याची बातमी नाही. एक महिन्याच्या
मंदीने त्याना जीव नकोसा झाला, तर १० वर्षाच्या काळ्या बाजाराला जनतेने कसे काय तोंड दिले असेल? ज०- कसे तोंड दिले ते प्रत्येकाने आरशात तोंड पाहून ठरवलेले बरे. हवा तो उत्पात मुकाट्याने सहन करण्यात भारताचे लोक निगर्गट्ट म्हणून पूर्वापार ख्यात आहेत. यावलचे कोणी चव्हाण यांसी० – लपेटीच्या किचकट सहीमुळे तुमचे पत्र विचारांत घेतलेले नाही. आ.उ. खगार, लोहारी ० -- तुमच्या प्रश्नांतच त्यांची उत्तरे आहेत. श्री. श्री. मिसर, रावेर. स०- यज्ञ करून जागतिक शांतता, भरपूर पाऊस, मुबलक धन धान्य, काय वाटेल ते प्राप्त होते म्हणतात, त्यात अर्थ किती? सध्या विश्वशांतीच्या नांवाखाली पूर्व खानदेशात यज्ञाच्या खटपटी जोरांत चालू आहेत. ज०- या यज्ञवाल्यानाच यज्ञात होमार्पण केल्याशिवाय, जनतेच्या मागची ही धार्मिक महामारी बंद पडणार नाही. यज्ञाचे ढोंगधुतरे बंद पाडण्यासाठी लोकानीच एकवटून विरोध केला पाहिजे. दे. रा. पाटील, कळमसरे, ता. पाचोरे. स०- लग्नात जाहीर अहेर देण्याची पद्धत आहे. ती बरी का वाईट? तिची उत्पत्ति काय? ज०- हुंडा देज पद्धतीइतकीच ही आहेराची रूढी फाजील चोचल्याची आहे. विचारवंतांनी लग्नाच्या निमंत्रण-पत्रिकेतच ‘आहेर घेणार नाही, आणल्यास धिक्कारला जाईल,’ असे स्पष्ट लिहीत जावे. इकडे तसा प्रघात चालू झाला आहे थोडाथोडा. एक नागरीक, शेन्दुर्णी. स०- तुमचा ब्राम्हण वर्गावर एवढा कटाक्ष कां? ज०- माझी जुनी पुष्कळ पुस्तखें छापलेली आहेत. सध्या ती दुर्मिळ आहेत. नशिबाने हाती लागली तर वाचून पहा. ‘हिन्दुजनांचा -हास’ हे पुस्तक तरी अभ्यासा. म्हणजे कळेल काय ते. स०- माणसाने एकदा तरी गुरू करावा म्हणतात, ते खरे काय? ज०- डोळे उघडे ठेवून व्यवहारात वागणारा माणूस दर पावलाला एकेक गुरू करीत असतो. जगन्नाथ मोतीराम पाटील, वडली, पो. म्हसावद. स०- नारायणराव पेशव्यांच्या खुनात आनंदीबाईंचा हात कितपत होता? म्हणतात तितकी ती लोभी, दुष्ट नि पापिणी होती काय? ज०- पेशवा दप्तर भाग ४ आणि पां. गो. रानडे कृत ‘खून का आत्महत्या’ हा दोनभागी प्रचंड ग्रंथ मिळवून मुद्दाम स्वता अभ्यासा. म्हणजे तुम्हालाच ख-या खोट्याचा पडताळा पटेल. रानड्यांच्या ग्रंथात नाना फडणिसाविषयीहि हवी ती माहिती पुराव्यांसकट सांपडेल, पण इषारा देतो, बामणी चाणाक्यांच्या कारभाराखालचे एकहि वाचनालय या ग्रंथाला थारा देणार नाही. टेलर लक्ष्मण ओंकार, निंभोरा. स०- वेश्यांच्या संततीचा समाज धिक्कार करतो. त्यात संततीचा दोष काय? ज०- दोष असो नसो. त्यांच्या पौरूषाला समाज धिक्कारू शकत नाही. योग्य तो मान देतोच. स०- विटाळशी बाई नावेत असली तर ती नाव बुडते म्हणतात, हे खरे आहे काय? ज०- अपघाताने बुडणा-या नावेत तसलीच बाई होती, असे कोणी बडबडला तर त्याच्या तोंडावर हात देता येणार नाही. तोंडात मारता येईल, पण तसे करणार कोण? क्षेत्रीय भट बडव्यानी फैलावलेले हे एक फिसाट आहे. विश्वनाथ डी., सावदा. स०- क्रांतिकारी समाजवादी बनण्यास जनतेने काय करायला हवे? ज०- जनतेचे राहू द्या हो. स्वतः का करावयाचे त्याचा पायाशुद्ध अभ्यास करा. स०- सहवासोत्तर विवाहाची पद्धति उत्तम काय? ज०- तुका म्हणो होसी भावेंचि तूं मुक्त, काय करिसी युक्त जाणिवेसी? स०- भारतीय संस्कृति आध्यात्मिक का आधिभौतिक? ज०- पंचा पत्रावळ पातळभाजी ही भारतीय संस्कृतीची लक्षणे आहेत. स०- गोकर्ण क्षेत्राची महति काय आहे? ज०- पं.महादेवशास्त्री जोशी कृत ‘तीर्थरूप महाराष्ट्र’ पुस्तकाचे दोनहि भाग अभ्यासा, म्हणजे सगळ्याच क्षेत्राची महति समजेल. प्रकाशक – ज्ञानराज प्रकाशन, ४२१ शनिवार पेठ, पुणे २. स०- लव्ह मॅरेज झालेल्यांचे काही वर्षांनी (बहुतेक) कां पटत नाही? ज०- लव्ह मॅरेज न झालेल्यांचे पटतेच पटते, असा तरी दाखलां मिळतो का? अहो, तडजोड नसली का जोडाजो़ड होते, यात विशेष काय नि नवल काय? अनंत दीक्षित, जळगांव स०- प्रेम आणि शिष्ठाचार यांचा संबंध काय? ज०- कशावरून हा प्रश्न सुचला ते कळवा? शामभाउ
चिंधू महाजन, निपाणे, ता. एरंडोल. स०- परवा बलसाड नजित हिंदी अमेरिकन भांडवलावर निघालेल्या अतुल प्रॉडक्षन्स या रंगाच्या कारखान्याचे जवाहरलालजींनी म्हणजे भारताच्या पंतप्रधानजीनी उद्घाटन केले. हे भांडवलशाहीला उत्तेजन नव्हे काय? ज०- भारत सध्या अमेरिकेच्या लव्हाल्यात सापडला आहे. आंधळे प्रेम काय करणार नाही? स०- भारतात अजून गोवा पांडीचरी इत्यादि परराष्ट्रीय वसाहति कां राहिल्या आहेत? ज०- जातील की त्या कधितरी. उचल घास घाल तोंडात, इतका हा मुकाबला सोपा नाही राव. स०- द्विभार्याप्रतिबंधक कायदा फक्त हिंदूंनाच कां लागू? मुसलमानांना कां नाही. ज०- ओळखीचा चोर जीवे मारी. यशवंत शिवराम चौधरी, चिनावल. स०- वाचकांच्या पार्लमेण्टाच्या सर्व सभासदांचे आपल्या अध्यक्षतेखाली जळगांव येथे संमेलन भरविण्याची एक कल्पना सुचते. आपले म्हणणे काय? ज०- कल्पना छान आहे. पण ती कल्पनाच! ती मूर्त स्वरूपात येणे माझ्या हाती नाही. स०- मुंबई पाहून येणारे इकडील बहुतेक लोक सांगतात कीं त्यांनी मुंबईचे सारे जण्टलमेन मवाली असतात. खरे काय हो हे? ज०- होय, अगदी माझ्यासकट. स०- महात्माजी हयात असते तर भारताच्या चालू घडीच्या अनेक भानगडी ते मिटवू शकते काय? ज०- मुळीच नाही. उलट नव्या भानगडी उपटल्यां असत्या. स०- गांधीजी म्हणाले होते कीं आज जरी भारत आणि पाकिस्तान अशा चिरफळ्या झाल्या आहेत, तरी लवकरच दोघाना शहाणपण सुचून ते एकवट येतील. काय वाटते आपल्याला? ज०- एकवटण्यापेक्षा आंग खरचटण्याचेच भविषअय डोकावते आहे. कृष्णचंद, रावेर. स०- आर्यसमाजी लोकांची विचारधारा कशी काय आहे? ज०- तेथेहि सांप्रदायीक हट्टवाद आहेच. सांप्रदायीकपणा सत्याचा खून पाडतो. सगळीकडे हेच चालले आहे. स०- पंढरपूरच्या विठोबाचे तेज काढून ते तांब्यात साठवणारा संतोजीबुवा श्रेष्ठ का पुजारी श्रेष्ठ? ज०- दोघेहि गाढव. विनायकराव खोनू हरेश्वर, जळगांव स०- बहुजनसमाजांतील मुलामुलींना परिस्थितीमुळे शिक्षण घेणे कष्टदायक पडते. शिवाय, आजची शिक्षण पद्धति त्यांना पोषक नाही. त्यांनी काय करावे? ज०- परिस्थितीचे रडगाणेच मला पसंत नाही. शिक्षणासाठी हपापलेला हवा तसा आपला मार्ग काढतो. बहुजनसमाजातल्या मुलांना (त्यांच्या निरक्षर वडलांच्या वळणावरून) आधी शिक्षणाची गोडीच लागायची मारामार. शिक्षणप्रचार त्यांना जबरदस्ती वाटते. हे खूळ त्यांच्यातल्याच विचारवंतांनी काढण्याचा आधी यत्न केला पाहिजे. आजची शिक्षणपद्धति पोषक नाही म्हणजे काय नाही? साध्यासुध्या साक्षरतेच्या रांगोळ्या प्रथम घातल्याशिवाय पोषक दोषक मुद्यांच्या पाटपाण्याचा थाट मागाहून ठरवायचा असतो. एरवी खेडूत शेतकरी यात्रा जत्रा नवस तमाशे पोळे तगतराव असल्या फंदासाठी काय कमी खर्चतात? तो शिक्षणाकडे लावला तर दर खेड्यात एक स्वावलंबी शाळा खास चालवता येईल. स०- चीनच्या क्रांतीसारखी भारतात क्रांतीची आवश्यकता आहे काय? ज०- नुकतीच येथे क्रांति झालीच ना? क्रांतीचे काम दररोज चालूच असते. जगात ते कोठेहि बंद पडलेले नाही, चीनचा कित्ता आम्हाला कशाला? आम्हाला आमच्याजोगा काही निराळा खास बनवता येईल. दुरून डोंगर साजरे दिसतात. अंदरकी बात स्तालिन माव जाने! श्री. ठाकरेजी, सप्रेम नमस्कार वि.वि. – मी बरेंच दिवसांपासून आपल्या ‘वाचकांचे पार्लमेण्ट’ मध्यें भाग घेण्याच्या विचारांत होतो. त्याप्रमाणे कांही प्रश्न आपल्याकडं पाठवित आहे. आपला हा उपक्रम खरोखर आदरणीय आहे. बांतमीदारमधील आपल्या लेखाकरितां दर रविवारी वाचक मोठ्या उत्कंठेनं बातमीदारची वाट पहात असतात. आपल्या लेखांनी खानदेशी जनतेंत पुष्कळ जागृति झालेली दिसते. आमच्या सारख्या तरुणांना आपल्या अमोल मार्गदर्शनाची खरोखरच अत्यंत जरूरी आहे. ते केव्हाहि आमच्या हिताचेच ठरणार आहे. आशा आहे की आपण ते सदैव करीत राहाल! रावेर पू. खा. आपला, १७-४-१९५२ एस. व्ही. पाटील मनोहर तु० सोनावणे,तरसोद, पो. नशिराबाद. स०- काळी पोत किंवा मंगळसूत्रावरून विवाहित स्त्री ओळखली जाते. पण विवाहित पुरुष कसा ओळखावा? ज०- हात्तेच्या, सोपी युगत, त्याच्या गंभीर चिंताग्रस्त तिकोनी चेह-यावरून. स०- प्रेम आंधळे असतें असे म्हणतात कशावरून? ज०- जावे प्रेमाच्या गावा, तेथे घ्यावा सुगावा. डी. एन. तडवी. मु. खिर्डी ता. रावेर
(बक्षिस) स०- अल्पवयातच एकाद्या धर्मपंथाला मुलगा अर्पण करण्याची एक प्रथा आहे. पुढे त्याला एकदम सन्यासी व्रताची दीक्षा देण्यात येते. अर्थात गृहस्थाश्रमाचा कायमचा प्रतिबंध होतोच. नुसत्या संन्यासाच्यी दीक्षेने त्याचे तारुण्यप्राप्त विकार दबले जाऊ शकतात काय? नसतील, तर त्या विकारांची त्याची चलबिचल त्या धर्मपंथाला पोषक होते काय? ज०- लहान मूल एकाद्या संन्याशी संप्रदायाला दान देणे हाच मुळी मोठा गुन्हा आहे. सरकारने असल्या गुन्हेगाराला कडकडीत शिक्षा ठोठावल्या पाहिजेत. जरूरीच्या वरवरच्या संन्याशी आचरणाखाली नेहमीच्या क्रमप्राप्त भानगडी होतच असतात. आंधळे भगत ‘या महाराजांच्या लीला’ सबबीखाली तिकडे निर्लज्ज कानाडोळा करतात. समाजहितेच्छू तरुणानी असल्या बलिदानाची बातमी वेळीच पोलिसाना देऊन, विद्यमान स्वदेशी निधर्मी सरकारच्या कायद्याचे सर्वोदयत्व कसाला लावून पहाण्यासारखे आहे. स०- यज्ञात तेल तूप नि धान्य जाळतात. त्यापेक्षा ते गरजवंत गोरगरिबाना वाटले तर? ज०- वाटले तर? अहो राव, आमचे सारं देव उपाशी मरतील ना? माणसांचे काय! त्यांचा गुणाकार वाढता आहे. पण अलिकडे सुधारकांच्या बंडाळीमुळे, देवपत्न्या देवी वांझोट्या बनत चालल्या आहेत. पोटपाणी पिकत असलेल्यादेवसेनेला जगण्यासाठी, देशात ------ दुष्काळ असला तरी, यज्ञात तेल तूप धान्याचे कोळसे केलेच पाहिजेत. त्याशिवाय देव आणि धर्म जगणार कसे? स०- आपल्याला पुण्याचा उपयोग केव्हा होतो? ज०- उपयोग होण्यासाठी पुण्य कर्म करायचे नसते. ते निर्हेतुक असावे लागते. पुण्य म्हणजे ज्या कृत्याने पुष्कळांचे पुष्कळ हित साधले जाते ते. पाप म्हणजे पुष्कळांचे पुष्कळ अहित होते ते. चांगल्या कृत्याचा ----- होणारा आनंद हेच पुण्यकर्माचे बक्षिस होय. एक नागरीक, घोडगांव, ता. चोपडे स०- देव मानायचा नाही, तर दामाजीपंताची रसद भरण्यासाठी देवाने महाराचे रूप घेतल्याचे सिनेमात दाखवतात, ते कसे? ज०- सिनेमावाल्यांचा पोटभरू गाढवपणा म्हणजे पुरावा किंवा सिद्धांत नव्हे. टी. पुंडलीक, भुसावळ. स०- ज्याला पैसा हवा त्याला मिळत नाही आणि ज्याला जरूर नाही त्याला मुबलक मिळतो. हे त्रांगडे काय आहे? ज०- संतकवि लक्ष्मीला चंचल म्हणतात. पण काही संस्कृत कवि तिला छिनाल म्हणतात. स०- मानवाला एक पोट नसते, तर काय झाले असते? ज०- पृथ्वीचे सहारा वाळवंट. स०- कै. साने गुरुजी महाराष्ट्राची आई, तर महाराष्ट्राचा बाप कोण? ज०- त्या आईच्या पोराना ठावे. स०- अभ्यास कसा नि केव्हा करावा? स्मरणशक्ति कशाने वाढते? ज०- बातमीदारात चालू झालेल्या आत्मविश्वास लेखमालेकडे लक्ष द्या. स०- कोणतेहि कलाकार लहरी कां असतात? ज०- कलेचा जन्मच लहरीतून होतो म्हणून. भगवान कौतिक पाटील, गोवर्धन. स०- सूर्य पश्चिमेला न उगवता पूर्वेलाच कां उगवतो? ज०- कानानी ऐकण्यापेक्षा डोळ्यांनी आपण कां ऐकत नाही? आणि पोटानी कां पहात नाही? (काही तरी विचारायचे म्हणून विचारले, झालं. वेळाचा अपव्यय नि कार्डाचा खर्च) सी. रामचंद्र, यावल. स०- अनुलोम नि प्रतिलोम विवाह म्हणजे काय? या विवाहांपासून होणा-या संततीला वारसा मिळेल काय? ज०- वरच्या जातीचा पुरुष नि खालच्या जातीची स्त्री यांच्या विवाहाला अनुलोम विवाह म्हणतात. प्रतिलोम याच्या उलट. वडिलार्जित मिळकतीचा वारसा सध्यातरी कायद्याने मिळत नाही. स०- व्यवहारात अहिंसा तत्व काटेकोरपणाने पाळता येणे शक्य आहे काय? नसेल तर मोठमोठ्या महात्म्यानी त्या तत्वाचा एवढा अट्टाहास कां केला? ज०- अहिंसापालनातच हिंसेचे प्रमाण अधिक आढळते. तत्व छान पण व्यवहारात खोटे. अहिंसावादाच्या फाजील स्तोमानेच महाराष्ट्र आज नेभळा आणि निष्क्रीय बनला आहे. स०- आंगात संचारणे म्हणजे काय? ज०- संचारल्याच्या दोन ठणठणीत थोबाडांत भडकावून पहा. म्हणजे सिद्धांत उघडा होईल. चंद्रकांत पाटील, वाघोड. स०- भारताला परदेशांच्या बाजारात आज कोणते स्थान आहे? ज०- हरभरे भुईमुगांच्या गोणत्यांत माती खडे मिसळून पाठवणारे मेन्दूबाज डोक्याचे व्यापारी राष्ट्र. स०- भाषावार प्रांतरचनेबद्दल अलिकडे काहीच का ऐकू येत नाही? ज०- बरोबरच आहे. ऐकणारे सगळे नि बोलणारे कोणीच नाही. स०- महाभारतातील ‘पांच पति एक पत्नि’ मागें हेतू कोणता? ज०- पांडव
तिबेटियन होते. तिकडे आजहि एका स्त्रीला अनेक पति करण्याची रूढी आहे. मलबारातहि हा प्रकार आजहि आहे. स०- २० ते २२ वर्षाच्या दरम्यानच क्षय रोगाचे प्रमाण अधिक कां आढळून यावे? ज०- छे छे. आता जन्मताच क्षयाची बिरुदावली घेऊन येणारी प्रजा भारतात चमकणार आहे. उगाच का आमच्या रामराज्याने शिधा पद्धति आणि झोळ्यांच्या रांगा खेडोपाडी निर्माण केल्या. के. टी. माळी, यावल. (बक्षिस) स०- साधनापेक्षा साध्याला महत्त्व कां दिले जाते? साधनाला कां नाही? ज०- साध्याच्या चांगुलपणाने साधनांचा बरावाईटपणा झाकला जातो म्हणून. साध्यापुढे साधनाना काहीच महत्त्व नसते. स्वराज्यस्थापना श्रेष्ठ, का अफजुलखानाचा वध आणि जावळीच्या मो-यांचा निःपात श्रेष्ठ? स०- कौटुंबिक दुःखे नि संकटांचा उगम कोठून होतो? ज०- कुटुंबातल्या मंडळींच्या आचार विचारांतून. स०- गृहस्वास्थ्य कसे वाढेल? ज०- गृहस्थ गृहिणीच्या एकोप्याने. स०- माणसांच्या श्वासोच्छवासात परमेश्वर असतो, असे कबीर म्हणतो. माणसांतच परमेश्वर सामावलेला आहे, असे विवेकानंद म्हणतात, मग माणसे देवांच्या मूर्ति का निर्माण करतात? ज०- तुझे आहे तुझ्यापाशी परि तूं जागा चुकलाशी म्हणून. कृष्णचंद, रावर. - तुम्ही संपूर्ण नाव कळविले नाही. पुढे असे चालणार नाही. स०- पाश्चात्यानी मंगळादि ग्रहांवर स्वा-या केल्याचे अनेक वेळा मी वाचले. कितपत तथ्य आहे त्यात? ज०- वाचण्यात चूकभूल झालेली असावी, स्वा-या केलेल्या नाहीत, करता येतील किंवा कसे, याचा ते अखंड शोध घेताहेत. सध्या प्रकाशाचे झोत टाकून आणि रेडियोचे संदेश पाठवून, मंगळावर वसति आहे का नाही, याचे प्रयोग चालू आहेत. स०- ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर आणि भक्त ज्ञानेश्वर अशा दोन व्यक्ति होऊन गेल्या म्हणतात खरें काय? ज०- होय. ज्ञानेश्वरी लिहिणा-या ज्ञानदेवाचा आणि बाप रखमादेवीवर अभंगांचा कर्ता आळंदीचा ज्ञानोबा. या दोन भिन्न काळातल्या व्यक्ति होत्या. नामदेवाबरोबर उत्तरेच्या यात्रेला गेलेला ज्ञानोबा भागवतपंथी बाप-रखुमादेवीवरू अभंगाचा कर्ता, ज्ञानेश्वरीकर्ता नव्हे. पण हा सुद्धा एक वाद म्हणूनच टाळकुट्यांनी कायमचा टिकवलेला आहे. स०- ध्येय कायम करण्यासाठी कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या म्हणजे जीवनातल्या घडामोडी कर्तबगारीने पार पाडता येतील? ज०- आत्मविश्वास लेखमालेचे अध्ययन ठेवा. ल. रू. सपकाळे, सावदा. आपली महत्वाकांक्षा अभिनंदनीय आहे. मला संत बनवू नका. ख-याला खरे नि खोट्याला खोटे मानणारा मी एक फटकळ आसामी आहे. (२) खरा ब्राह्मण नाटकातील गावबाची भूमिका खलनायकाची नव्हे, एकनाथाच्या पदरी तो एक वेडा होता, पण त्या वेड्याने अनेकाना शहाणपण शिकवले आणि नाथांच्या मृत्यूनंतर त्यांचे अपुरे भागवत पुरे केले. (३) अधिकारी मंडळींबद्दल तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. निकट सहचर्याचा प्रसंग आला म्हणजे तो दूर होईल. (४) नैतिक पातळी खालावल्याच्या बोंबा हा एक मानसिक शक्तीला खर्ची करणारा हिप्नॉटिझमचाप्रयोग आहे. तिकडे लक्ष देऊ नका. स०- काही वधूपिते वधू वराना विवाहापूर्वीच प्रमपत्रव्यवहाराची सवलत कां देतात? ज०- अजून तुम्ही कालवड-गो-हा-दावेबांधणीच्या जमान्यातच वावरत आहातसे दिसते! जन्माचा सोबती पारखून घेण्यासाठी पत्रव्यवहार---- काय, परस्पर उघड गाठीभेटी घेतल्या म्हणून काय असे आकाश कोसळणार? तरूण तरुणीच्या विवाह-निश्चितीत यापुढे आई-बाप न पडतील तेवढे बरे. मुलीचा जन्माचा सोबती निवडणारे आईबाप हे कोण? ज्याचे ते पाहून घेतील, मी हा प्रयोग केला आहे म्हणून सांगतो. स०- सन १९५६ च्या सार्वत्रिक निवडणुका लढवण्यासाठी....... ज०- त्यांची विवंचना आजच कशाला राव? तो दिवस उगवण्यापूर्वी शेकडो लढ्यांची कोडी महाराष्ट्राला सोडवून जगायचे आहे. काशीनाथ बन्सी चौधरी, रावेर. (१) सिनेमा सृष्टीतले दाखले व्यवहार पाहू लागले तर उकिरड्याशिवाय हाताला काही लागणार नाही. व्यवहार वास्तव तर सिनेमातली दृश्ये अवास्तव विचारातसुद्धा घेण्याच्या लायकीची नसतात. (२) काँग्रेसची लोकशाही ही ---भोकशाही आहे. थोड्याच दिवसांत भारतात हिटलरशाही अवतरणार आहे. (३) ‘हिम दुनियाकों रास्ता दिखायेगे’ वल्गना करणा-या अहंमन्य पुढा-यांनी अवास्तव बडबडीपेक्षा आणखी काय करावे म्हणतात? हातांत शस्त्र धरण्याची ताकद नसली म्हणजे शस्त्राच्या कल्पना करण्यासाठी तोंडाचे खिंडार सताड मोकळेपडते. के. एस. वाणी, निंभोरा. (१) सौंदर्य-स्पर्धेत १४ च सौंदर्य-गर्विणीनी भाग घेतला याचा अर्थ सबंध मुंबईत तेवढ्याच सौंदर्यशालिनी होत्या किंवा आहेत, असा अर्थ नव्हे. स्पर्धेचे ते क्षेत्र अजून म्हणावे तसे निर्मळ नसल्यामुळे, ठरावीक नटनट्यांच्या शिवाय इतर महिला त्याचा विचारहि करायच्या नाहीत. स०- सांस्कृति नि बौद्धिक स्वातंत्र्य गमावून अधिक भाकरीची पैदास होऊ शकेल काय? ज०- सोवियत रशियात बौद्धिक स्वातंत्र्याचा बळि पडला असूनहि अन्नधान्यांची तेथे लईलूट चालली आहे म्हणतात. तुका म्हणे खरेखोटे, जग चालले उफराटे. स०- पूर्वीच्या जमान्यात गुणी जनांच्या शोधार्थ रसिक जात असत. आता गुणी जनांना आपल्या गुणांची जाहिरात करावी लागते. ज०- खोटा आहे समज हा. जाहिरतबाजी पूर्वीहि होती, फक्त तिचे स्वरूप निराळे असेल, एवढेच. केशरलाल अण्णाशेठ सुनसगांव बु० ता. जामनेर. स०- द्विभार्याप्रतिबंध कायद्याचे परिणाम काय? ज०- जेवढा फायदा तेवढाच तोटाहि आहे. स०- क्रिस्ती लोकांना आपल्या धर्माचे अभिमानी वेड मनस्वी कां? ज०- ते सारे मिशनरी भिक्षुकशाहीच्या पंज्याखालची मांजरे आहेत म्हणून. स०- युरपियन राजवटीत एकाद्या गो-याला मुलगा झाला म्हणजे त्याला दरमहा पांच रुपये भत्ता मिळत असे.... ज०- कोणी सांगितले हे तुम्हाला? स०- पूर्वी ठरावीक स्त्रियाच वेश्याव्यवसाय करीत. हल्ली काही कुलीन स्त्रियाहि त्या मार्गाला लागलेल्या दिसतात. कारण काय? ज०- कारणे अनेक आहेत. समाजहितवाद्यानी तिकडे लक्ष्य दिले पाहिजे. भोई वाघळी, -- मेहरबान, सबंध नाव कळवा. प्रत्येक वेळी कळवा. स०- निव्वळ वडील मंडळीच्या मतपरिवर्तनासाठी तरुण विवाहित स्त्रिने ‘उसना नवरा’ घेणे योग्य होईल का? ज०- घेऊन पहा म्हणावं खून पडतील. नाटके कादंब-या सिनेमातले प्रसंग म्हणजे व्यवहार नव्हे. स०- कित्येक माणसे पशू नि वनस्पतीवरहि विलक्षण प्रेम करतात. कां? ज०- कित्येक घड्याळावरहि करतात. आंगठीवर करतात. प्रेम आंधळे असते म्हणतात ना? पण या अनेक प्राण्यांवर प्रेम करूच नये या अट्टाहासात तरी काय अर्थ? प्रेम हा आकर्षणाचा परिणाम असतो. स०- तमाशांतल्या चटोर लावण्यानी पेशवाई बुडवली म्हणतात, हे कितपत खरे? ज०- अमर भूपाळीवरून प्रश्न सुचलासे दिसते लावण्यानी बुडवली पण भूपाळीने तिरंगी झेण्ड्याचे स्वराज्य लाभले, ही शांताराम बापूची इतिहास-संशोधनाची अक्कल तरी पटते का तुम्हाला? स०- म-हाठीतले अभिजात वृत्त (छंद) कोणते? ज०- अनुष्टुप छंद. रामचंद्र उखाजी गवळी, मोरफळ, पो. पारोळे. स०- जीवनात सर्वत्र निंदा, स्तुती, स्पर्धा, मानापमान यांचे वेगवाग प्रवाह वहात असताना, त्या सर्वांपासून सुरक्षित राहून परम शांति अनुभवू शकू असा आधार कोणता? ज०- स्वतःच्या आचार-विचार-उच्चारांच्या सात्विकतेविषयी आत्मविश्वास निरीच्छ निस्पृह सत्याभिमानी माणूस हव्या त्या तुफानात शांतीच्या परम सुखाला मुकत नाही. स०- धर्म म्हणजे काय? ज०- कर्तव्यकर्म. स०- आत्मज्ञानाने चित्ताचे सारे मळ धुतले जातात काय? ज०- आत्मज्ञान, चित्त आणि मळ, यांच्या व्याख्या ठरवल्या पाहिजेत. उगाच भाषाकोशात शब्द आहेत म्हणून त्यावर अध्यात्मी थाटाचे प्रवचन करण्यात काही हाशील नाही. इतक्या गूढ आध्यात्मवादात कोणी जाऊ नये आणि मला ओढूं नये. स०- आत्मा कर्माने मळत नाही, हे खरे आहे काय? ज०- कोणी लेकाने पहिला आहे आत्मा, तर त्यावर मळ सांचतो कसा आणि कर्माच्या लॉण्ड्रीत तो धुतला जातो कसा, याचे खरे खोटे सांगणार? हां, वेदान्ताची बडबड करणा-या ग्रंथांत या मुद्यावर खूप शुष्क-हृदयी च-हाट आढळेल. बसा, राव, ते अभ्यासीत. एस. व्ही. पाटील, रावेर. स०- वाढत्या बेकारीला आळा घालण्यासाठी काँग्रेजी राम राज्यात कोणते प्रयत्न होत आहेत? ज०- खुद्द काँग्रेजी मठातील उपद्व्यापी बेकाराना कसल्या तरी सरकारी निमसरकारी कारखान्यात चिकटवण्यातच काँग्रेसपार्टी बेजार, तेथे काँग्रेसबाह्य जगातल्या बुभुक्षित बेकारांची दाद घ्यायची कोणी? शिवाय, रामायणाच्या आधारानेच बोलायचे तर, रामकालीन माकडानी बेकारीबद्दल श्रीरामाकडे अर्ज तर्कारी दातकिरकिट्या आणि सत्याग्रह केल्याचे दाखले नाहीत. ते सारे हनुमंतानुयायी अरण्या--- झाडपाला खावून हाक मारताच रामसेवेला हजर रहात असत. तसे हल्लीच्या बेकारानी कां करूं नये?
जंगली झाडपाल्यांत ए-टू-झेड सारी व्हीटामिन्स असतात. म्हणूनच रामकालीन गाढवे टुणटुणीत नि ठणठणीत असत. स०- काँग्रेजी राज्य आणि काँग्रेजी रामराज्य यांत कितीसा फरक दिसतो? ज०- परकीय अंग्रेजी राजवटीतली माणसे सध्याच्या रामराज्यात माकडांच्या जिण्याने जगत आहेत. स०- आजच्या जगात पैसा नि सत्य यांत श्रेष्ठ कोण? ज०- माणूस दोघांपेक्षा श्रेष्ठ. स०- लोकजगृतीचे कार्य कोण अधिक करू शकतो? पुढारी का वृत्तपत्रे? ज०- पाठाची भाकरी नि भाकरीचे पीठ. क्षुधा शमनार्थ कोण उपयोगी पडतो? स०- तरूण रक्ताचा ओढा काँग्रेसपेक्षा समाजवादी पक्षाकडे विशेष कां दिसून येतो? ज०- अहो काय घेऊन बसतात राव तरुणांचे नि त्यांच्या रक्तांचे? मनुष्य हा अन्नाच्या वासामागे धावणारा इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी आहे. ज्याला जिकडे चाटायला मिळते तिकडे तो घुसतो. स०- आपण पुन्हा प्रबोधन चालू करणार होता.त्याचे काय झाले? ज०- बातमीदारातील लेखांच्या रूपाने प्रबोधनच चालू आहे. आ. उ. खंगार, लोहारी. स०- गटबाजी हा विकास का विकार? ज०- बारामाई व्यसनाचा एक प्रकार. स०- आपल्या मते कोणती विषमता नष्ट व्हायला हवी? ज०- सगळीच विषमता नष्ट झाली तर जीवनात स्वारस्यच उरणार नाही. एकसंधी समता होऊच शकणार नाही. स०- अपप्रसार ही हिंसा नव्हे काय? ज०- हे हिंसा अहिंसेचे थोतांड आता फार उतास गेले. अहिंसकाना गुलामगिरीशिवाय दुसरा मोक्ष नाहीं. मु. स. साळुंखे, लोहारी. स०- विद्यार्थ्यात बोकाळलेली गुंडगिरी केव्हा नि कशी नाहीशी होईल? ज०- हल्ली रामराज्य चालू आहे ना? म्हणून माकडांचा धिंगाणा असाच चालू रहाणार. अहिंसेच्या थोतांडी बडेजावीने पोलिसांच्या कंबरा ढिले करणारी सध्याची काँग्रेस गटबाजीची राजवट आहे तोवर असेच चालणार. फुला केशव ठाकूर, लोहारी स०- दगडधोंड्यांचे देव खातात पितात हसतात नाचतात, असा प्रचार करणाराना काय म्हणावे? ज०- दगडधोंडे. स०- नासप्ताहाने अवर्षणाचा फेरा चुकवता येतो, पिकेहि उत्तम येतात, हे खरे आहे काय? ज०- शू शू. हळू बोला. दुष्काळ टाळण्याची ही युगत युरप अमेरिकेच्या कानी गेली, तर आमच्या भागवत धर्माच्या पेटण्ट हक्कावर आक्रमण व्हायचे. स०- लहानपणी मुलांचे कान टोचतात. त्यांत काय वैशिष्ट्य? ज०- हिंदूंच्या कोणत्या रूढीत काही वैशिष्ट्य नसते. मुलांचे कान तीन ठिकाणी टोचतात आणि मुलींच्या नाका कानाना किती तरी ठिकाणी छिद्रे पाडतात. हा सारा दागिन्याचा सोस दिसतो. माझ्या तिनहि पुत्रांचे कान टोचलेले नाहीत. तुकाराम तुळशीराम महाजन, कोरपावली. स०- जगात फक्त स्त्रियाच किंवा पुरूषच असते तर काय झाले असते? ज०- प्रश्न विचारायला तुम्ही नि जबाब द्यायला मी जगात दिसलोच नसतो. स०- गांधी तत्वज्ञान आणि कम्युनिष्ट यांचे सहकार्य शक्य आहे काय? ज०- नसायला काय झाले? तेल आणि पाणी एका गलासात ठेवता येते. एकजीव होत नाहीत, हा त्या दोघांचा दोष तुमचा नव्हे नि माझाही नव्हे. काशिनाथ चौधरी, रावेर. स०- न्हावी जमातीत गावातल्या लग्नाच्या प्रसंगी मशाल(टेंभा) पुढें धरून चालण्याचा रिवाज आहे. त्या जमातीतील शिकल्या सवरल्या आणि पांढरपेशा समाजांत सरमिसळ वावरणा-या तरुणानें वडिलांच्या हट्टासाठीं ते जाहीर मशाल धरण्याचे काम करावें काय? ज०- जमाती जमातीत पूर्वापार गांवकीच्या मानाचे कांही हक्क चालत आलेले आहेत. कांही व्यवसायहि आहेत त्यांना सामाजीक मान्यता आहे तोंवर ते चालवण्यांत अप्रतिष्ठा कसली? रानडे रोडवर एक तरुण चांभार बसत असे. त्याची भाषा आचार विचार पाहून एकदा चौकशी केली. तो व्ह. फा. पास आणि ट्रेण्ड शिक्षक असल्याचे त्यानें सांगितलें. मास्तरकी करण्याऐवजी उन्हातान्हात बसून हा जोडेशिवीचा धंदा तूं कां करतोस असें मी विचारले, त्यावर त्याचा जबाब पहा. साहेब, हा माझा पिढ्यानपिढ्यांचा धंदा बापाने मला चांगला शिकविला. मास्तरकीनं मला काय मिळते? या टांकमारीच्या धंद्यात मला येथे रोज ३ ते ४ रुपये पैदास होते. शिवाय मी स्वतंत्र. तशात ही कारागिरी आहे. नुसती पोपटपंची नाही. दुसरे एक उदाहरण पाहिले. बारामतीला होतो मी.
सन १९०२ साली पंढरपूरला जाण्यासाठी तुकारामाची पालखी तेथें आली. त्या मेळाव्यांत खाकी ----- पोषाक केलेला एक जंटलमन पालखी पुढे गळ्यांत वीणा अडकवून प्रामुख्यानें चालला होता. चौकशी करता तो तुकारामाचा वंशज असे समजले. मामलतीच्या हुद्यावर होता. पण वडील वारल्यावर सरकारने त्यांना भरपगारी पेन्शन देऊन फक्त या विण्याच्या परंपरेसाठी सेवामुक्त केलें होते. तो गृहस्थ या परंपरेच्या पेशात अभिमान बाळगीत होता. म्हणून सुशिक्षित न्हावी तरुणानें मशाल धरायला कां लाजावे? त्यांत कसला कमीपणा? शिक्षणानें प्रतिष्ठेचे माजलेले असले स्तोमच आज शेंकडो तरुणांच्या हिंमतीच्या आड येत आहे. सीताराम रामू महाजन, निंभोरा. स०- गावांगाव ---दिन थाटामाटाने साजरे करण्याचे कारण काय? ज०- सिनेमा नाटके तमाशांच्या मोठमोठ्या जाहिराती केल्याशिवाय प्रेक्षकानी थेटरे भरतात का? धान्यप्राप्तीसाठी असली जाहिरातबाजी करावीच लागते. स०- भारत स्वतंत्र होऊन ५ वर्षे झाली तरी धान्योप्तादनाची ओरड आहेच. चीन स्वतंत्र होताच अवघ्या दोनच वर्षात सजलां सुफलां झाला. भारताला तांदूळ पुरवतो. काय आहे हे कोडे? ज०- चीनचे शेतकरी आणि नागरीक मूळचेच मोठे उद्योगी आणि हुन्नरी. भारतात एदी आणि दैववादी मूर्खांचा भरणा फार आहे. हातांपेक्षा त्यांचे तोंडच फार काम करीत असते. आत्माराम उखर्डू, खंगार, लोहारी. स०- ज्योतिष्यामुळे समाजाचा काही फायदा होतो काय? ज०- होतो तर, दैववादी लोकानी गजबजलेल्या देशावर हवे तेव्हां परचक्र येऊ शकते. स०- हल्ली कोठे कोणी राक्षस आहेत काय? ज०- लोहारीत कोणी नाहीत याबद्दल आपले अभिनंदन. मुरलीधर सदाशिव साळुंखे, लोहारी. स०- जनतेची आर्थिक परिस्थिति कशी सुधारेल? ज०- जेव्हा प्रत्येक नागरीक रोज १० तास काही ना काही पोट भरण्याचा स्वतंत्र उद्योग करण्यात तरबेज होईल तेव्हां. स०- तरुणाना मार्गदर्शक अशा जिवित अनुभवांच्या टाचणाचे एकादे मार्गदर्शनी पुस्तक आपण आम्हाला द्याल काय? ज०- आत्मविश्वस लेखमाला बातमीदार मधून चालू झाली आहे. गुलाबराव दलपत चौधरी, निंभोरा सूचनाः- प्रश्न थोडक्यात मोजक्या शब्दात असावा. पाल्हाळाने काही उलगडा होत नाही. सध्या आपण वाचनाचे प्रमाण वाढवावे. नारायण दलपत चौधरी, निंभोरा. सूचनाः- जीवनाला पोषक असे प्रश्न असले तर ठीक. उगाच वेदान्ती बडबड कशाला? आकाशातील चंद्र आणि गंगाजलातील चंद्र यात फरक कोणता? या प्रश्नाने आपल्या जीवनाला कसला प्रकाश लाभणार आहे? धर्मा धोंडू कोळी, निंभोरा. खुलासा० – लोहारीप्रमाणे निंभोरा येथे प्रश्नकांची जागृति अभिनंदनीय दिसते. रावेरहि मागे नाहीच. पण महाशय, महागाई दरवाढ आणि स्वस्ताई विषयी नेहमी वर्तमानपत्रे चाळीत असावे. त्यावर माझीच प्रवचन कशाला? प्रश्न विचारावयास लागतो समज. भाऊलाल गणेशमल ओसवाल, नाडगांव. स०- अनंत अत्याचार करणा-या कासिम रझवीचे पुढे काय झाले? ज०- आंधळ्या न्यायदेवतेपुढे उघड्या ताठ डोळ्यानी तो आपली बाजू धिटाईने मांडीत आहे, त्याचे पुढे काय होणार. ते सांगता येणार नाही. कदाचित तो मुक्त होऊन हैदराबादी राज्यात सन्माननीय कौसिलरहि बनेल. रामराज्यात अशक्य काय आहे? सगळे हिंदू संस्थानीक खतम झाले तरी निजामाची प्रतिष्ठा राखलीच आहे ना निर्धोक? सर्व सामान्य सूचना०—एकदा कोणीतरी विचारलेल्या सवालाना दिलेले जबाब. पुन्हा तेच सवाल आल्यास विचारात घेतले जाणार नाहीत. रामचंद्र उखाजी गवळी, मोरफळ. स०- मरणाच्या क्षणाला माणसाला यम दिसतात, हे खरे आहे काय? ज०- स्वता मेल्याशिवाय कसें सांगणार? स०- वाईट घडले तर म्हणे दैवात होते आणि द्रव्य लाभले तरीहि म्हणतात त्याच्या नशिबात ते होते.ही काय भानगड आहे? ज०- दैववादाने पछाडलेल्याना दैवा शिवाय आणखी काय सुचणार? दैववाद हीच भानगड आमच्या पिंडी ब्रम्हांडी घर धरून बसली आहे. चिंधु खंडू ओतारी, जळगांव. स०- हुशार माणसाला व्यवहारांत अडचणी कां? ज०- आपण हुशार कोणाला समजता? हुशार माणूस अडचणींना जुमानीतच नाही. स०- चिंधू या नावाने १९५२ चे भविष्य कसे, ग्रहमान पीडा सांगा. ज०- मी फुकट भविष्य सांगत नाही. शंभराची नोट पाठवा म्हणजे तुमच्या राशीच्या चिंध्या करून त्याची वाकळ

व्हीपीने रवाना होईल. कन्हैयालाल सुरजलाल वाणी, रावेर. सूचना० – आपल्या विचारांत गोंधळ झालेला दिसतो.पांढरपेशा महिलांच्या संघटना आहेत. त्या सरकारी निमसरकारी कचे-यांत कामे करतात. कौन्सिल असेब्ल्यांतहि निवडून येतात. त्या काय महिलावर्गाच्या प्रतिनिधि नव्हेत म्हणता? आपले बाकीच्या दोन प्रश्नांतच आपली उत्तरे आहेत हे पहा कन्हैयालालजी, राजकारणाचे क्षेत्र द्या आता टाकून. जरा आत्मविश्वासाकडे पहा. स्वताचे नाही सावरत आणि बाजारच्या उलाढाली हव्यात कशाला? आपल्या जिज्ञासू वृत्तीचे मात्र अभिनंदन. नामदेव लक्ष्मण चवथे, मौजे, ता. पाचोरे. स०- संतती नियमनासाठी गर्भपात करण्याची कायद्याने सवलत मिळाली पाहिजे, असे परवा एक वक्ते नाशीक येथे म्हणाले. आपले काय मत आहे? ज०- आज संभावीतपणाच्या पांघरुणाखाली जे गुपचूप चालले आहे, त्याला फक्त कायद्याची उघड मान्यता हवी, एवढीच विवंचना त्यात दिसते. स०- संसार सागर तरून जायला गुरू करणेच अगत्य, असे सनातनी म्हणतात, हे खरे आहे काय? ज०- सनातन्यांपुरते ते खरेच असणार. संसार हा सागर आहे, वा कच-याचे आगर आहे, का बाजारातला महाग पण सडका डांगर आहे एवढे एकाद्या सनातन्याला विचारून ठेवा. म्हणजे ऐन वेळी पंचाईत होणार नाही. काय राव, या १९५२ सालातहि असल्या फालतू नि मूर्ख कल्पनांवर विश्वास ठेवता आणि प्रश्नहि विचारता? यशवंत राजाराम पाटील, मुख्याध्यापक, दोघवद. स०- आजच्या जगात माणसाने जशास तसे वागावे की केवळ सहानुभूतिपर वागावे. ज०- ही मेल्याची दुनिया नव्हे. जशास तसे भेटे, तेव्हा मजालसी थाटे, असा रामदासानी कटाक्ष सांगितला आहे. चालू जमान्यात चांगुलपणा मेग्येपणाची निशाणी समजली जाते. आपण सद्वृत्त असावेच, पण दुर्वृताशी गाठ पडली का त्याच्या चलनी नाण्यानेच त्याची पूजा करून वाटेला लावावे. आत्यंतिक सज्जनपणा दोषास्पद ठरतो. शंकरलाल हिरालाल परदेशी. रावेर. स०- केवळ श्री च्या जोरावर दुर्गुण छपवून सद्गुण खरेदी केले जातात. ही परिस्थिति कशी बदलेल? ज०- बदलणार नाही. सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते. व्यवहारात सद्गुण-लेपनाचा काळा बाजार चालतो, हे सर्वाना माहीत असते, हे काय थोडे समाधान मानायचे? पुन्हा देव देवतांचे नि चमत्कारांचे सवाल विचारणा-या पत्रांची संख्या वाढू लागली आहे. अडले आहे का त्यांवाचून? वैयक्तिक नि सामाजिक किती तरी प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभे आहेत. राजकारण तर पाचवीला पूजलेले आहेच. (बातमीदार वाचकांच्या पार्लमेण्टचा पत्र-व्यवहार बराच वाढत चालला आहे. सगळ्याना एकाच हप्त्यात जबाब देणे शक्य होत नाही. क्रमाक्रमाने आणि बातमीदारातल्या जागेच्या सवडीने प्रश्नांचा फडशा पडत जाईल.) स०- जातीयता म्हणजे जातिभेद का धर्मभेद? जातीयतेचा खरा अर्थ काय? ज०- जातीयतेविरूद्ध दातओठ खाणारानाहि तो अजून नीटसा सांगता येत नाही. ब्रिटीश अंमदानीतल्या बाष्कळ नि पोकळ राजद्रोहाच्या आरोपाची जागा सध्या जातीयतेच्या बिनबुड्या फिसाटाने घेतली आहे. स०- तीर्थक्षेत्रावर लग्न लावणे सुधारणेच्या दृष्टीने योग्य का अयोग्य? अशा लग्नाना धर्मशास्त्राची अनुमती आहे काय? ज०- लग्न कोठेही लावता येते. त्यात सुधारणा कसली आणि जागेचे माहात्म्य तरी कसले? मिया बिवी राजी तो क्या करें काजी? तो आणि ती जवळ आली का लागलेच लग्न! स०- नियंत्रणे कोठपर्यंत राहाण्याची शक्यता आहे ज०- हळूंच कानात सांगतो. सांगू नका कोणाला, निघत नाहीत तोंवर बिलकूल रहाणार. स०- खेड्यांतील शेतकरी सुखी कसा होईल निमंत्रणे कोठपर्यंत राहाण्याची शक्यता आहे ज०- सुखाची वाजवी अटकळ त्याला होईल तेव्हा. खुलासा – आपली लघुकथा एकाद्या मासिकाकडे पाठवा. मला त्यात काही समजत नाही. निवृत्ति माधव पाटील, निंभोरा. स०- शब्दकोडी हा बौद्धिक जुगार नव्हे काय? लोकमान्य दैनिक ता. ३१-३-५२ च्या अंकात शब्दकोड्याच्या जाहीरातींत लिहिले आहे की ''महाराष्ट्रातील कुणीही अधम ---- किंवा आचरट लोकमान्य शब्दस्पर्धेत भाग घेत नाही.'' या प्रचाराला काय म्हणावे? ज०- शब्दकोडी हा न--- जुगार आहे. त्यात बुद्धीला जागा नाही. लोकमान्याच्या प्रचाराविषयी म्हणाल तर, जोंवर अशा जाहिरात लेखकाला अथवा संपादकाला चव्हाट्यावर ओढून त्याच्या दोन सणसणीत मुस्काटात0
पद्धतीने. स०- जगांत कोणती नऊ आश्चर्ये आहेत? ज०- नऊ नव्हेत. पण सात आश्चर्ये मानतात. ती अशीः- (१) इजिप्तचे पिरमिड डोंगर, (२) बॅबिलोनचे जुलते बगिचे, (३) मॉसीलसचे थडगे, (४) एफीसस येथील डायना देवीचे मंदिर, (५) –होडस येथील प्रचंड पुतळा, (६) ऑलिम्पिया येथील ज्यूपिटरचा पुतळा आणि (७) अलेक्झांड्रिया येथील फेरोबाचे पुतळे. आपल्या इकडे एकच आश्चर्य आहे आणि ते म्हणजे, सगळे भारतवासी काँग्रेजी सत्तेला विटले असूनहि गेल्या निवडणुकीत त्याच पार्टीला निवडून आणतात. जगातली सगळी राष्ट्रे यावर डोकी खाजवीत आहेत. स०- षड्रिपूची हकालपट्टी कधी नि कशी होईल? ज०- हकालपट्टी झाल्यावर माणसांच्या जिण्यात चोथा उरेल, त्याची वाट काय? स०- विधिलेख कोण लिहितो? तो कळून घेण्याचे साधन काय? ज०- लोकशाहीमध्ये लोकांचे विधिलेख सत्ताधारी पार्टी लिहीत असते आणि वृत्तपत्रे त्यावर भाष्ये करीत असतात. दत्तात्रेय बाजी नांदेडकर, नांदेड. स०- बातमीदारात लेख लिहिण्यापेक्षा आपण निवडणुकीला उभे कां रहात नाही? ज०- खरंच गड्या, लेख लिहिण्याच्या भरात ते विसरूनच गेलो मी. आता ६७ व्या वर्षी या सुचनेचा उपयोग काय? बिब्बीसाथ आये मकानमे, मियासाब चले मसानमें. आता माझे एवढे काम तुम्ही करा. काशीनाथ बन्सी चौधरी, रावेर. स०- साक्षरता आणि ज्ञान यांतील फरक काय? ज०- गहू आणि चपाती किंवा घीवर यांतील फरकाइतका. स०- सर्वात मोठा अपराध आणि पुण्य कोणते? ज०- निरक्षर रहाणे हा मोठा अपराध किंवा प्राप्त विद्या इतराना मुक्त हस्ताने देणे हे पुण्य. स०- मनुष्यप्राणी पूर्वीपेक्षा अधिक सुखी झाला आहे काय? ज०- सुखाची नि दुक्खाची व्याख्या निश्चित ठरवायची कशी? स०- नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतला कोणता पक्ष भारताला तारू शकला असतां? ज०- भारत बुडतो आहे, हे कुणी सांगितले तुम्हाला? पक्षापेक्षा जनताच मायदेशाची तारक मारक होत असते. श्रीकृष्ण श्रीनिवास मिसर, रावेर. स०- राजहंस चातक चक्रवाक वगैरे महाकाव्यांत वर्णिलेले पक्षि कोठेच आढळत नाहीत, हे कसे? का सा-या कविकल्पना? ज०- हे सारे पक्षि आजहि आहेत. फक्त रावेरीत बसून दिसणार नाहीत. स०- आजकालच्या साहित्यकांत (पुण्याचा परिसरातल्या) एकादा साहित्य-सम्राट आढळेल कां? ज०- पुण्याच्या हवेतले सगळे लेखकू साहित्यसम्राटच असतात. हव्या त्या क्षेत्रांतल्या श्रेष्ठत्वाची महाराष्ट्राची मनापली त्यांनीच राखून ठेवलेली आहे. परवा काका गाडगिळांनी लखुनाना भोपटकाराना ‘महाराष्टातले एकमेव श्रेष्ठ पुरुष’ अशी लेखी पदवी नाही का दिली? स०- गांधी नि इतर सनातनी दोघेहि गीतेचे एकनिष्ठ भक्त, मग एकाची जगताकडे पहाण्याची दृष्टी विशाल कां आणि दुस-याची संकुचित कां? ज०- मधुकर कमळातले मधु चाखतो आणि बेडूक तेथला चिखल खातो. पंढरीनाथ भिवसन पाटील, बोरनारकर, म्हसावद. स०- गुरू केला नाही त्याचे तोंड पाहू नये, असे सनातनी म्हणतात. त्यातले गूढ काय? ज०- त्यातले गूढ, त्यांचे पोट. मनुष्य व्यवहारात पदोपदी कितीतरी गुरू करीत असतो. गुरूपदेशाची प्रथा भिक्षुकशाहीने पोट भरण्याची एक युगत म्हणून भोळसटांच्या मागे लावलेली होती. सध्या फक्त मूर्ख नि पोकळडोकेच तेव्हढे या गुरुबाजीच्या फंदात पडत असतात. हिरामण चव्हाण, अंघारी, ता. चाळीसगांव. स०- पृथ्वीराज चव्हाण नि जयचंदादि रजपुतांचे वंशज हल्ली आहेत काय? ज०- असतील बुवा कोठेतरी काहीतरी करून जगत. शिवाजीच्या वंशजाचा तरी पत्ता कुठे आहे? मनोहर उर्फ लक्ष्मण सपकाळे, सावदा. स०- सत्कृत्ये करणारा पुरुष पुढल्या जन्मीं नरजन्मच घेतो, असे हिंदु धर्मातील वेदात सांगितले आहे. ज०- वेद वाचले आहेत का तुम्ही? मग कशावरून सांगता का वेदात सांगितले आहे म्हणून? स०- ता. ७-१-५२ च्या आपल्या लेखांत ‘लेव्हाटेशास्त्री’ म्हणून केलेल्या शब्दप्रयोगाची व्युत्पत्ति काय? ज०- अहो, ते पुण्यातल्या एका काळी जिवंत असलेल्या कट्या बामणेतर द्वेष्ट्या भटजीचे आडनाव आहे. स०- शेतकरी कामकरी पक्षाचे ‘वांग्मय’ मिळवण्याचा पत्ता सांगा? ज०- वांग्मय! केवढा जड शब्द! राजकारणी सत्तेसाठी कोंबडझुंज करणारे पक्ष ‘वांग्मय’ प्रसवू लागल्येचे मला माहीत नाही. स०- व्यं
http://www.prabodhankar.org/node/264/page/0/28

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा