रविवार, २९ जानेवारी, २०१७

हिंसा आणि गांधी

गांधीजींची अहिंसा तरी नीट समजून घ्या
ती टोकाची कधीच नव्हती  पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी केल्यावर तेथे भारतीय सैन्य पाठवण्यास सांगणारे गांधीच होते , क्रातीसिंह नाना पाटील जेव्हा महात्मा गांधींना भेटले त्यांना आपल्या ‘पत्रीसरकार’बद्दल सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले होते, की ‘नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली, सातार्याने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय ! नाना, तुम्ही बहादूर आहात. भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा परवडेल असे मानणारा मी आहे
अहिंसा दोन प्रकारची आहे. एक तत्ववेत्यांची. तिला सामाजिक परिमाण नाही. आत्म्याची मुक्ती हे तिचं उद्दिष्ट. समाजातील वाईट बाबी सुधारण्यासाठी, समानतेच्या लढ्यासाठी, परदेशी सत्तेपासून मुक्त होण्यासाठी ती वापरली जात नाही. पॅलेस्टिन त्यावेळी रोमन साम्राज्याखाली होतं, पण तत्ववेत्यांना त्याविषयी काही देणंघेणं नव्हतं. त्याची अहिंसा ही शुध्द, साधी होती. तो अहिंसक प्रतिकार नव्हता. गांधींचं वैशिष्ट्य हे की त्यांनी राजकीय, सामाजिक आणि आथिर्क अन्याय दूर करण्यासाठी साधन म्हणून अहिंसेचा वापर केला.
दुसरं एक उदाहरण देतो. इतर अहिंसक म्हणत असत , 'दुष्टप्रवृत्तीला तसंच प्रत्युत्तर देऊ नका, तुम्हाला एक मैल चालायला सांगितलं तर दोन मैल चाला'.
गांधींनी असं कधीच म्हटलं नसतं. उलट विचारलं असतं, 'का चालू? अगदी पहिला मैलभर चालण्यासाठीही पुरेसं कारण असलं पाहिजे.' जगात न्यायाची स्थापना करण्यासाठी लढण्याचं अहिंसा हे हत्यार आहे.'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा