रविवार, २९ जानेवारी, २०१७

इतिहासातील देवळांची लूट व हिंदू राजे, ब्राह्मण व मुसलमान

मुसलमानच देवळे पाडायचे असे म्हणने म्हणजे सुद्धा अडाणीपणाचे लक्षण आहे कारण फ़क्त मुसलमान राजेच देवळे लुटत होते हे सत्य नाही.हिंदू राजे सुद्धा संपत्तीसाठी हिंदूंची देवळे लुटीत असत.काश्मिरचा हिंदू राजा हर्षदेव याने बाराव्या शतकात हिंदूंचीसुद्धा मंदिरे लुटली आहेत.धातूसाठी मुर्ती वितळवी,वितळण्यापुर्वी त्यांच्यावर विष्ठा व मुत्र शिंपडून त्यांचा पवित्रभंग करी इत्यादिचे तपशीलवार वर्णन कल्हणाच्या "राजतरंगिणी" या ग्रंथात आहे.देवाच्या मुर्तीची विटंबना केली म्हणून त्या काळी दंगे झाल्याची नोंद मात्र नाही.मंदिरे तोडून ती लुटण्यासाठी राजा हर्षदेव ने खास देवोत्पतक नायक नावाने अधिकारी नेमला.(११९३ ते १२१०) कॅबी आणि दाभाई येथील जैन मंदिरे उध्वस्त केली.मंदिरातील उत्पनाची जी खाती होती त्यात त्याने "देवोत्पादन" हे खातेच उघडले होते.मंदिरातील लुटलेली संपत्ती या खात्यात जमा होत असत.म्हणजे देव-देवळे पाडण्यामध्ये हिंदू राजे पण काही मागे नव्हते तरीही देवंळाच्या लुटीचा इतिहास सांगताना केवळ मुस्लिमांचाच उल्लेख का केला जातो हे कोणता हिंदुत्वाचा ठेकेदार सांगेल का ?
मुस्लिम राज्याला त्रासदायक ठरू लागले तर मुस्लिम राज्यकर्ते मुस्लिम धर्मगुरुंची,मुल्ला-मौलवींची सुद्धा पर्वा न करता त्यांनाही छळत.महंमद तुघलक याने मुल्ला व सय्यद यांच्या कत्तली केल्याचा आरोप बखरकारांनी नोंदवून ठेवलेला आहे.काही इतिहासकारांनी तर असे लिहिले आहे की,जहांगीर बादशहाला मुल्ला मंडळी एवढी घाबरत की तो आला की ते लपून बसत.म्हणजे देवळे पाडली व लुटली त्याला कारण राज्यच आणि देवळांना इनामे दिली किंवा देवळे दुरुस्त केली त्यालाही कारण राज्यच इथे धर्माचा काडीमात्र संबंध नाही.म्हणुनच मुस्लिमांनी जशी देवळे लुटली तशी हिंदू राजांनी सुद्धा हिंदूंची देवळे लुटल्याचे दाखले आहेत.
 तात्पर्य काय ? त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या द्रुष्टीने राज्य महत्वाचे होते.धर्म महत्वाचा नव्हता. स्वत:चे राज्य स्थापायला आणि स्थिर करायला धर्माचा आधार घेतला पण धर्म मुख्य नव्हता,राज्य मुख्य होते आणि पूर्ण सत्य हे असे आहे.
संदर्भ :
देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे [प्रबोधनकार ठाकरे].
शिवाजी कोण होता ? [गोविंदराव पानसरे].
शिवचरित्र एक अभ्यास [सेतू माधव पगडी].
राजतरंगिणी [कल्हन पंडीत (अनुवाद डॉ.माधव व्यंकटेश लेले)].
छ.शिवाजी महाराज यांचे चरित्र [क्रुष्णराव अर्जुन केळूसकर].
आजच्या हिंदुत्ववाद्यांच्या म्हणण्यानुसार मुस्लिमांनी धर्मद्वेषातून हिंदूंची देवळे पाडली.त्यामध्ये ते पंढरपूर,तुळजापूर या देवस्थानांची उदाहरणे देतात जी अफ़जलखानाने उध्वस्त केली असेही हिंदुत्ववाद्यांचं म्हणनं आहे.पण हेही विसरून चालणार नाही की,अफ़जलखान मराठा स्वराज्यावर चालून येत होता आणि हिंदुत्ववाद्यांच्या म्हणण्यानुसार वाटेतील देवळांची लुट व मोडतोड करत होता तर त्याच्याबरोबर अनेक हिंदू धर्मिय सरदार होते त्यांच्या भावना दुखावल्या नाहीत का ? तसेच तुळजाभवानीचे मंदिर अफ़जलखानाने तोडलं म्हणून हिंदुत्ववादी सांगतात,त्यावेळी अफ़जलखानाबरोबर पिलाजी मोहिते,शंकररावजी मोहिते,कल्याणराव यादव,नाईकजी सराटे,नागोजी पांढरे,प्रतापराव मोरे,झुंझारराव घाटगे,काटे,बाजी घोरपडे(रामदास स्वामींचा प्रिय शिष्य) आणि संभाजीराव भोसले हे उपस्थित होते हेही विचरून चालणार नाही.१७९१ मध्ये हिंदूंकडून लुटीत पतझड झालेलं देवी सारदेचं श्रुगेरीचं मंदिर मुसलमान टिपू सुलतानाने दुरुस्त केलं हे तर सर्वांना माहीत आहेच.
    अफ़जलखान तुळजापूर व पंढरपूर येथील हिंदूंची देवस्थाने फ़ोडत होता,त्यावेळी अफ़जलखानाचा ब्राह्मण वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णी हिंदू असून काय करत होता ? त्याला माहीत नव्हतं का ? की देवळावर आपलेच जातबंधू जगत आहेत,आणि मंदिरे फ़ोडली तर आमच्या जातीची रोजगार हमी योजना बंद होईल,म्हणुन मंदिरे पाडू नका.असे सांगून तरी किमान अफ़जलखानाचे मन परिवर्तन का केले नाही ? तीच गत सोमनाथ मंदिराची,गजनीच्या महंमदने थानेश्वरचा राजा आनंदपाल याच्याशी समझोता करून मग सोमनाथवर हल्ला केला,खरे तर आनंदपालने याची सुचना मंदिरामध्ये का दिली नाही ? महंमदाचे अनेक सेनाधिकारी व सैनिक हिंदू होते.मग तरीही त्या पापाचा वाटेकरी फ़क्त मुसलमान महंमद कसा ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा