रविवार, २९ जानेवारी, २०१७

गाडगे महाराज

अत्यंत ताकदीन बुद्धिप्रामाण्यवाद मांडणारे चमत्कारांना विरोध करणारे संत गाडगे महाराज १९५६ साली वारले. उमाळेगुरुजी (बी.ए.बी.टी.) यांनी गाडगे महाराजांवर पोथी लिहिली. या पोथीमध्ये गाडगे महाराजांनी भरपूर चमत्कार केले आहेत. असे वर्णन पोथीमध्ये जागो जागी पहायला मिळते - गाडगे महाराज सदेह कीर्तनातून अंतर्धान पावत असत -- गाडगे महाराज तुकारामाचा अवतार आहेत -- खरा कळस तर -गाडगे महाराजांसाठी वैकुंठातून पुष्पक विमान आले आणि गाडगे महाराज त्यात बसून वैकुंठात निघून गेले अस लिहिलेली पोथी १९८३ साली लिहिली जाते.
ज्या गाडगे महाराजांना पाहिलेली, त्यांचे कीर्तन ऐकलेली, त्यांच्या अंत्ययात्रेत सामील झालेली माणसे आजही असतांना,प्रबोधनकार ठाकरें सारख्यां व्यक्तीने त्यांचे चरित्र लिहिले आहे. अशा गाडगे महाराजान्बधल अशा स्वरुपाची पोथी १९८३ साली अवघ्या ३० ते ४० वर्षात लिहिली जाऊ शकते मग ३५० वर्षापूर्वीचे संत तुकाराम ७०० वर्षापूर्वीचे ज्ञानेश्वर अशा अनेक संतांचे आम्ही काय करून ठेवले असेल ? विचार करा मित्रांनो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा